Sign In New user? Start here.

पद्मश्री नामदेव ढसाळ स्मृतीप्रीत्यर्थ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धां - २०१४

 
 

पद्मश्री नामदेव ढसाळ स्मृतीप्रीत्यर्थ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धां - २०१४

पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भव्य राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांचे आयोजन व्योम प्रतिष्ठान या मुंबईतल्या सामाजिक संस्थेतर्फे करण्यात आले आहे. नामदेव ढसाळांच्या साहित्याचे पारायण करणारी, कलाक्षेत्रात विशेषत: नाट्यक्षेत्रात वावरणारी तरुण मंडळी एकत्र यावीत आणि ढसाळ सरांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न म्हणून व्योम प्रतिष्ठानने ही स्पर्धा आयोजित केल्याचे संचालक तुषार कदम यांनी सांगितले.

या स्पर्धेचे स्वरूप व्यापक आणि भव्य असून स्पर्धेच्या पहिल्या वर्षातच नागपुर, लातूर, औरंगाबाद, जळगाव, सांगली,कणकवली, पुणे, देवगड या विभागातल्या एकांकिका स्पर्धेत सहभागी होणार आहेत. प्रथम पारितोषिक 75,000, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय पारितोषिक 25,000 अशी रोख रक्कम विजेत्यांना मिळणार आहे. तसेच वैयक्तीक चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कमही विजेत्यांना देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी स्पर्धकांकडून प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही.

स्पर्धेची प्राथमिक फेरी पु.ल.देशपांडे अकादमी, प्रभादेवी येथे 3 ते 6 फेब्रुवारी दरम्यान होत आहे,तर अंतिम फेरी ही स्वा. सावरकर स्मारक सभागृह, शिवाजीपार्क येथे 14 फेब्रुवारी रोजी पार पडेल.  सध्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून स्पर्धा विशेष चर्चेत असून स्पर्धेसाठी सर्व स्तरातुन खुप चांगला पाठींबा मिळत आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी तुषार कदम-9773567511 व विरेन परब-9773861170 या क्रमांकावर स्पर्धकांनी संपर्क करण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.