Sign In New user? Start here.
 
 

नाट्यसंपदा" राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा शुभारंभ ९ डिसेंबरपासून गोव्यात!

यंदाच्या सुवर्णजयंती वर्षापासून ‘नाट्यसंपदा’ने एका नव्या पर्वाला सुरुवात केली आहे. नाट्यंसस्थेच्या ५०व्या वर्षाचा योग साधून कांही नव्या नाटकांची घोषणा करणे ही मळलेली वाट सोडून, सामान्यपणे व्यावसायिक मराठी नाट्यसंस्था जे करण्याच्या फंदात पडत नाहीत असा एक वेगळा उपक्रम नाट्यसंपदाने सुरु केला आहे. संस्थापक नटश्रेष्ठ् प्रभाकर पणशीकर यांनी आपली नाटकं महाराष्ट्रू आणि इतरही राज्यांत गावोगावी जाऊन केली. नाटकांची नवनवीन केंद्रे निर्माण केली. छोट्या गावांमध्ये नाटकांची आवड आणि गरज निर्माण करण्याचे मोठे कार्य प्रभाकरपंतांनी केले. ते कार्य पुढे चालू रहावे, तरुण पिढीमधून नवीन कलाकार, लेखक, दिग्दरर्शक, तंत्रज्ञ निर्माण व्हावेत याकरिता ‘नाट्यसंपदा सुवर्णजयंती पुरस्कार’ आणि 'राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धा' सादर करीत असून प्राथमिक फेरीची सुरुवात येत्या ९ डिसेंबरपासून गोवा केंद्र येथे सुरु होत आहे.

९ डिसेंबर २०१३ ते ११ जानेवारी २०१४ असा महिन्याभराहून जास्त चालणारा हा नाट्यजागर आहे. महाराष्ट्राच्या सर्व विद्यापीठातील अंदाजे २५०० महाविद्यालयांशी संपर्क साधून मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सांगली, नागपूर, कणकवली आणि गोवा या आठ केंद्रांवर होणारी प्राथमिक फेरी, भरत नाट्य मंदिर, पुणे येथे २४ एकांकिकांची उपांत्य फेरी आणि दिनांक ११ जानेवारी २०१३ रोजी यशवंत नाट्यगृह, माटुंगा येथे ६ एकांकिकांची अंतिम फेरी असा हा भरगच्च कार्यक्रम आहे. ‘नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर फिरता चषक’, हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य तर राहीलच त्याशिवाय पहिल्या तीन एकांकिकांसाठी अनुक्रमे रु. ५०,०००/-, रु. ३५,०००/- आणि रु. २०,०००/- अशी रोख बक्षीसे व अनेक वैयक्तिक पारितोषिके आणि स्मृतिचिन्हे असा असणार आहे. इंडियन ऑईल, एलआयसी, युनियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एनकेजीएसबी बँक या प्रायोजकांचा या स्पर्धेला असलेला प्रतिसादही उत्साहवर्धक आहे.

मराठी रंगभूमी आणि मराठी, हिंदी मालिका आणि चित्रपट यांमध्ये आघाडीवर असणारे कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, लेखक या स्पर्धांचे परीक्षक असणार आहेत. अंतिमफेरीचे परीक्षक सई परांजपे, रोहिणी हतंगडी, प्रदीप मुळ्ये, भरत दाभोळकर, डॉ. गिरीश ओक असतील.