Sign In New user? Start here.

‘श्री’ चे पहिलवहिल नाटक

 
 

‘श्री’ चे पहिलवहिल नाटक....

new
new drama of 'shashank ketkarAdd Comment

तुमचा लाडका ‘शंशाक केतकर’ म्हणजे ऒळखल नाही का? होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतला ‘श्रीरंग गोखले ची’ भूमीका करणारा ‘श्री’ आता व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करतोय. निर्माता नंदू कदम यांचे सोनल प्रॉडक्शन्स आणि नाट्यसुमन या संस्थांची संयुक्त निर्मिती असलेल्या ‘गोष्ट तशी गमतीची’ या मिहिर राजदा लिखित अद्वैत दादरकर दिग्दर्शित नव्या नाटकात शशांक मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. हे नाटक ३ ऑगस्टला रंगभूमीवर येत आहे. मालिकेत शशांकला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे आता त्याच्या या नाटकाला प्रेक्षक किती पसंती देतायत हे लवकरच कळेल.

या नाटकाचा विषय दोन पिढ्यांमधील अंतर हा आहे.एकाच गोष्टीकडे बघण्याचे दोन पिढ्यांचे दोन वेगवेगळे दृष्टीकोन असतात आणि या दृष्टीकोनांमधला फरक दोन पिढ्यांमधलं अतंर वाढवतो. नेमका हाच विषय एकाहून एक विनोदी प्रसंगांच्या चढत्या मांडणीतून या नाटकात दाखवण्यात आला आहे. हीच मुळ संकल्पना असलेली लेखक मिहिर राजदा आणि दिग्दर्शक अद्वैत दादरकने सादर केलेली 'रिश्ता वही सोच नयी' ही हसरी खेळकर पण विचार करायला भाग पाडणारी एकांकिता दोन वर्षांपूर्वी प्रचंड लोकप्रिय ठरली होती. त्याचेच हे विस्तारित नाट्यरुपांतर आहे.

या नाटकात शशांक सोबत मुख्य भूमिकेत लोकप्रिय अभिनेते दिग्दर्शक मंगेश कदम आणि अभिनेत्री लीना भागवत ही खऱ्याखुऱ्या आयुष्यातली जोडी पहिल्यांदाच एकत्र रंगभूमीवर येतेय. आजच्या काळातला एक गंभीर विषय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडणारे हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास या नाटकाच्या टीमला आहे.

 

----------