Sign In New user? Start here.

भरतची मोरूची मावशी एकदा तरी पहावी

 
 

भरतची मोरूची मावशी एकदा तरी पहावी!

गलगले, श्रीमंत गंगाधर पंत, गोंद्या अशा अनेक भूमिके नंतर भरतला मोरूची मावशी मध्ये पाहणं म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणीच आहे.सुयोग प्रकाशित रसिकांजन निर्मित मंगेश कदम दिग्दर्शित 'मोरूची मावशी' पुन्हा बालगंधर्वच्या रंगमंचावर अवतरल. विजय चव्हाण म्हणजे मोरूची मावशी, सतीश तारे यांनी सुद्धा ती स्त्री भूमिका अजरामर केलेली होती, पण हे शिवधनुष्य भरतने सहजतेने पेलल.

त्याला मुळात स्त्री वेशात पाहण आणि रंगमंचावरील स्त्री वेशातील वावर बायकांना सुद्धा लाजणारा होता. भरतची मावशी मुद्दाम जाऊन पहावी अशीच आहे. हसायच असेल आणि दुसऱ्याला सुद्धा हसवायच असेल तर हे नाटक जाऊन एकदा तरी पहावच.

भरतला खूप वेगवेगळ्या भूमिका केल्या आहे. पण विजय चव्हाण,सतीश तारे सारख्या कलाकांरानी गाजवलेली भूमिका स्वीकारणे हे प्रेक्षकांना पण कठीण होते. पण भरतने कनकलक्ष्मी ऑफ कांदा ऊर्फ कांदा संस्थानची राणी ऐटीत रंगवलेली आहे. बाकी इतर कलाकारांनी सुद्धा मावशीला मोलाची साथ दिली आहे.