Sign In New user? Start here.

“मराठी रंगभूमीवर पहिल्यांदाच नाट्यविषयक जाणीवा प्रगल्भ करणारा अभिनव ऑनलाईन उपक्रम"

 
 

“मराठी रंगभूमीवर पहिल्यांदाच नाट्यविषयक जाणीवा प्रगल्भ करणारा अभिनव ऑनलाईन उपक्रम"

new
Sambhaji Bhagat in mayboli e natya choupal - uniqueAdd Comment

रंगभूमीवरचे दिग्गज लेखक- दिग्दर्शक,अभिनेते,नाट्यअभ्यासक,समीक्षक यांचा जगभरातल्या प्रेक्षकांशी थेट संवाद व्हावा,चर्चा घडावी याहेतूने प्रयोगशील नाट्यसंस्था ‘अस्तित्व आणि संकेतस्थळ ‘मुंबई थिएटर गाईड’ यांनी गुगलच्या सहकार्याने ‘ई-नाट्यचौपाल’ हा उपक्रम हाती घेतला आहे.

संपूर्णपणे ऑनलाईन असलेल्या या उपक्रमांतर्गत मोबाईल,लॅपटॉप पासून घरच्या संगणकावर जिथे जिथे इंटरनेट असेल त्या माध्यमाद्वारे नाट्यरसिक या संवादात सहभागी होऊ शकतील. यामुळे रंगभूमी संदर्भात सुरु असलेल्या चर्चेला एक वेगळा आयाम मिळेल,तसेच हा संवाद यु-ट्यूब क्लिपच्या माध्यमातून जतन केला जाणार असून त्यामुळे त्याला येणाऱ्या काळात संदर्भमूल्य ही प्राप्त होणार आहे.

या उपक्रमातली साहित्य अकादमी विजेते प्रख्यात नाटककार महेश दत्तानी यांच्या लेखनप्रक्रीयेसंदर्भातली चर्चा, राहुल डाकुन्हा यांच्या राईटरस ब्लॉक संदर्भातले विवेचन,शेखर सेन यांची नाट्यनिर्मिती प्रक्रिया उलगडणारी कार्यशाळा आणि एनसीपीएच्या 'प्रतिबिंब' महोत्सवातल्या कलाकृतींचा परिचय करून देणाऱ्या प्रख्यात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि वीरेंद्र प्रधान यांच्यासोबतचा ‘कर्टन रेझर’ नंतर ‘ई – नाट्यचौपाल’मध्ये येत्या गुरुवारी २८ ऑगस्टला संध्याकाळी ७ वाजता ww.youtube.com/enatyachaupal या संकेतस्थळावर सध्या विशेष चर्चेत असलेले प्रसिद्ध नाटककार संभाजी भगत यांच्याशी नाटककार रामू रामनाथन संवाद साधणार आहेत.

 

----------