Sign In New user? Start here.

छ.संभाजी महाराजांच्या आयुष्यावरील "छावा" 1 मार्च पासून रंगमंचावर

 
 

छ.संभाजी महाराजांच्या आयुष्यावरील "छावा" 1 मार्च पासून रंगमंचावर

Sambhaji The Chhava
jyoti-savitri new marathi dramaAdd Comment

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा वादळी जीवनपट उलगडून सांगणारे छावा हे नवीन नाटक येत्या 1 मार्च रोजी रंगमंचावर येत आहे. गणेश कला, क्रीडा, मंच पुणे येथे सकाळी 10.30 वाजता या नाटकाचा शुभारंभ पार पडणार आहे. अशी माहिती शिवसुर्य परिवाराचे संस्थापक अध्यक्ष रामदास हरगुडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला छ.संभाजी ही प्रमुख भूमिका साकारणारे डॉ.अमोल कोल्हे, ज्येष्ठ कलाकार रवी पटवर्धन, ;लेखक, दिग्दर्शक महेंद्र महाडिक, गायिका किर्ती पाठक, सत्यशिल दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी शिवसुर्य परिवार निर्मित, राजदीप प्रॉडक्‍शन प्रस्तूत छावा या दोन अंकी ऐतिहासिक नाटकाच्या ध्वनीफितीचे प्रकाशन करण्यात आले. सात्विक ठकार यांनी हे गीतलेखन केले असून देवेंद्र भोमे यांनी संगीत दिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेनंतर आता संभाजीराजांच्या भूमिकेत काम करताना वाटलेल्या बदलाविषयी बोलताना डॉ.कोल्हे म्हणाले की, छत्रपती शिवाजी व संभाजी या दोन्ही भूमिका प्रचंड आव्हानात्मक आहे. आवाज, शरीरयष्टी, संवाद, देहबोली, हालचाल, यासाजया गोष्टींमध्ये त'ावत आढळते. तरुणांनी एका युथ आयकॉनला सामोरे ठेवून वाटचाल करण्यासाठी संभाजीराजांचे विचार प्रत्येक तरुणापर्यंत पोहचविणे गरजेचे वाटते.छावा च्या निमिताने नाटयगृहात सादर होणाऱ्या नाटकात प्रथमच दुमजली किल्ल्‌याची व जहाजाची प्रतिकृती तयार करण्यात आल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगीतले.

 

----------