Sign In New user? Start here.
 
 

संजय नार्वेकर आणि भूषण कडू पहिल्यांदाच एकत्र रंगमंचावर

new
sanjay narvekar and bhushan kadu new marathi dramaAdd Comment

गौतम जोगळेकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘सर्कीट हाऊस’ हे विनोदी नाटक येत्या 2 नोव्हेबरला मराठी रंगभूमीवर दाखल होत आहे.या नाटकामध्ये संजय नार्वेकर आणि भूषण कडू हे कलाकार पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. मयुरा रानडे आणि हेमांगी वेलणकर मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत अनिल कामत, प्रमोद कदम, राहुल कुलकर्णी, अंकुर वाढवे, श्वेता घरत सहकलावंत आहेत.

नाटकाच कथानक या प्रकारे...एक सत्ताधारी नेता, विरोधी पक्षातील नेत्याच्या सेक्रेटरीला घेऊन ‘सर्कीट हाऊस’मध्ये येतो. हे दोघे जेव्हा त्या सर्कीट हाऊसमध्ये जाऊन पोहोचतात तेव्हा तिथे वेगळेच काही घडलेले असते, तिथले दृश्य पाहून ते हबकूनच जातात. सत्ताधारी नेता स्वत:ला आणि त्या सेक्रेटरीला तिथून सोडवण्यासाठी आपल्या पी.ए.ला बोलवतो. त्या नेत्याला वाटते की, पी.ए. आला म्हणजे गुंता सुटणार. मात्र गुंता सुटण्याऐवजी तो वाढत जातो आणि एकापाठोपाठ एक हास्यस्फोटक प्रसंगाची मालिकाच निर्माण होते.

 

----------