Sign In New user? Start here.

सवाई एकांकिकेत पुणेकरच ‘सवाई’

 
 

सवाई एकांकिकेत पुणेकरच ‘सवाई’

‘सवाई’ म्हणजे एक मानाची, एक प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धा. वर्षभर होण्या-या महत्वाच्या नाट्स्पर्धात पहिल्या आलेल्या एकांकिकेलाच फक्त सवाई करंडकात सहभागी होऊ शकतात. सगळ्याच स्पर्धकांची नजर असते ती याच स्पर्धेकडे असते. यंदा नाही तो गोली मार दुंगा, लाडी, ऊळागड्डी अशा काही एकांकिकांचा अंतिम फेरीत समावेश झाला होता. स्पर्धेची अंतिम फेरी २५ जानेवारी रात्री ८. ३० वा. रविंद्रनाथ मंदिर येथे पार पडली. सवाई एकांकीका मध्ये पहिल स्थान, एम.आय.टी कॉलेजच्या क ला काना का? या एकांकिके ला मिळालं.

तस पहायला गेल तर जोशी बेडेकर महाविद्यालयाची आय एन टी आणि उंबरठा अश्या दोन्ही स्पर्धेत अव्वल ठरणारी 'ओश्तोरिज' त्या नंतर झेप कलामंचाची 'ई = एम२' या दोन मुंबईतून दमदार समजल्या जाणारया एकांकिका प्राथमिक फेरीतच बाद करून स्पर्धा जवळ जवळ संपलीच असे मानले जात होतं . याच दरम्यान मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयाची 'नही तो गोली मार दुंगा' आणि टी के टोपे ची 'लाडी' हि एकांकिका अंतिम स्पर्धेत धडक मारली, पण या सर्वात सवाई पुणेकरच ठरले.

अभिनयाची प्रथम पायरी म्हणून या एकांकीका कडे पाहिल जात. आज महाविद्यालयीन व खुल्या स्तरावर विविध एकांकिका स्पर्धा घेतल्या त्यातलीच एक मानाची स्पर्धा म्हणजे सवाई. अभिनय व इतर कलाकारांच्या प्रयत्नांची खरी परीक्षा या स्पर्धेत होते. वर्षभर उत्तोमोत्तम कामकरून शेवटी सगळ्याच स्पर्धकांची नजर असते ती याच स्पर्धेकडे. वर्षभर स्पर्धक स्पर्धेची आतुरतेने वाट बघतात. भल्या-भल्या स्पर्धकांना थकवणारी ही स्पर्धा जवळ येताच त्यांच्या मनात आनंदाबरोबर धडकीसुद्धा भरते. सवाई एकांकिका स्पर्धेचं वैशिष्टय़ म्हणजे रात्रभर चालणारी एक स्पर्धा अर्थात कलाकार घडवणारी एक चळवळ समजली जाते.

यंदा इस्लामपूर, पुणे, चिपळूण, अंबरनाथ, वसई, उल्हासनगर, नाशिक व मुंबई येथील २४ संस्थांनी नाव नोंदवून प्राथमिक फेरीत सहभाग दर्शवला होता. प्राथमिक फेरीतील उळागड्डी, चॉकलेटचा बंगला, बेल, फ्लॉवर पॉट, नाही तो गोली मार दुंगा, लाडी या एकांकिकांचा अंतिम फेरीत समावेश झाला असून सतीश राजवाडे, विलास उजवणे, विनोद पवार यांनी प्राथमिक फेरीत परीक्षकांची भूमिका पार पाडली.