Sign In New user? Start here.
 
 

“चुळबुळ” सेक्सोलॉजिकल विनोदी नाटक लवकरच रंगभूमीवर

new
sexolgical drama" chulbul" now in marathiAdd Comment

गेली २५ वर्ष सातत्याने नाट्य रसिकांचे मनोरंजन करणार्‍या “किरण थिएटर्स” हया नामांकित नाट्यसंस्थेचे यंदा २५ वे वर्ष असून हया रौप्य महोत्सवी वर्षात किरण थिएटर्स “चुळबुळ” हे नवं सेक्सोलॉजिकल विनोदी नाटक रंगभूमीवर घेऊन येत आहे. निर्माते किरण कामेरकर यांच्या “किरण थिएटर्स” हया नाट्यसंस्थेने आतापर्यंत विविध ३६ यशस्वी नाटकांची निर्मिती केली असून त्यात ‘प्रतिकार’, ‘सेक्सी’, ‘नो टेन्शन’, ‘डेंजर डेंजर’, ‘पटली तर बायको’ या नाटकांचा विशेष उल्लेख करावा लागेल. डॉ. शैला म्हात्रे प्रस्तुत, गिरीश साळवी लिखित – दिग्दर्शित ‘चुळबुळ’ ही त्यांची ३७ वी नाट्य कलाकृती असून हया रौप्य महोत्सवी वर्षांत अनेक मनोरंजक नाट्य कलाकृती रंगभूमीवर आणण्याचा निर्माते किरण कामेरकर यांचा मानस आहे.

‘चुळबुळ’ ही लहान थोरांपासून प्रत्येकाच्या मनात चालूच असते. माणसाची साठी ओलांडली की ती अधिक सक्रिय होते. त्यात ‘सेक्स’ हा विषय असेल तर हीच चुळबुळ अधिक प्रकर्षाने जाणवते. ‘चुळबुळ’ या नाटकाच्या शिर्षकावरुन तसा काही अर्थबोध होत नसला तरी हे अतिशय विचार प्रवर्तक नाटक असून माणसाची काम भावना अर्थातच ‘सेक्स’ सारखा संवेदनशील विषय प्रभावी कथानकाच्या माध्यमातून विनोदाची झालर देऊन प्रेक्षकांसमोर आणला आहे.

माणसाला जन्मत: निसर्गाने ज्ञानाबरोबर इतर अनेक भाव - भावनांची देणगी दिलेली आहे. या भाव – भावनांपैकी किती फायद्याच्या आहेत आणि किती नुकसानीच्या आहेत हया संभ्रमात माणूस जगत आहे. असाच संभ्रम माणसाला ‘सेक्स’ या बाबतीत आहे. आपल्याला सेक्स मधील सर्व ज्ञान आहे असं मानणारा आणि मिरवणारा माणूस तोंडघशी पडलेला आपल्याला दिसतो. ‘सेक्स’ बाबत वेगळ्याच भ्रमात असणारे अनेकजण आपल्यातच आहेत. अशांच्या लैंगिक आयुष्यावर रोखठोक भाष्य म्हणजे ‘चुळबुळ’. यात अभिनेता संदेश उपशाम, प्रदीप डोईफोडे, समीर पेणकर व श्रद्धा चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 

----------