Sign In New user? Start here.

गजेंद्र अहिरे लिखित आणि दिग्दर्शित ‘शेवग्याच्या शेंगा’ नवीन नाटक रंगभूमीवर

 
 

गजेंद्र अहिरे लिखित आणि दिग्दर्शित ‘शेवग्याच्या शेंगा’ नवीन नाटक रंगभूमीवर

गजेंद्र अहिरे लिखित आणि दिग्दर्शित ‘शेवग्याच्या शेंगा’ हे नवीन नाटक रंगभूमीवर आले असून त्या नाटकाची निर्मिती लता नार्वेकर यांनी केली आहे. या नाटकात संजय मोने, स्वाती चिटणीस, अतिशा नाईक, कादंबरी कदम, निखिल राउत, सीमा पारकर या कलाकारांनी भूमिका केल्या आहेत, नाटकाचे नेपथ्य नितीन नेरुरकर, प्रकाश योजना शीतल तळपदे यांची असून नाटकातील गाणी गजेंद्र अहिरे यांनी लिहिली असून त्याला संगीत नरेंद्र भिडे यांनी दिले आहे.

आज काल होत चाललेली लहान कुटुंब पद्धती, त्यातून एका वळणावर होणारी एकटे पणाची भावनाया विषयावर ‘शेवग्याच्या शेंगा’ या नाटकाचा विषय आधारित आहे. नाते संबंधावर भाष्य करणारे हे नाटक विनोदी पद्धतीने सादर होते. ह्या नाटकात नेमके काय आहे तर आजच्या युगामधले हे नाटक असून एकटेपणाचे जीवन जगणारी जी माणसे असतात मग ती माणसे विविध वयोगटातील किंवा विविध परिथिती मधली असोत स्त्री असो किंवा पुरुष असो, त्यांच्या जीवनात एकटेपणा जेंव्हा येतो त्यावेळी त्यांची मानसिकता अशी असते किंवा कशी होते त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा परिणाम त्यांच्या जीवनावर चालण्या – बोलण्यावर कसा होतो हे सारे विनोदाच्या माध्यमातून सांगितले आहे.

माणूस एका काही विशिष्ठ परिस्थिती मध्ये काही निर्णय घ्यायला सुरवात करतो ते त्याचे निर्णय बरोबर कि चूक हे पाहणे नंतरचे आहे, सुरवातीला ह्या व्यक्तीरेखा एकमेकाशी अनोळखी वातावरणात असतात, निर्णयाच्या बाबतीत ह्या व्यक्तिरेखा समान होत जातात पण त्यांच्यातील असलेले भावबंध जे आहेत तेव्हढेच राहतात पण तरीही त्या व्यक्तिरेखा एकमेकात गुंतत जातात, आणि हे जे गुंतत जाणारे जे काही आहे ते हळू-हळू उलगडत जाते.

या नाटकात ६ व्यक्तिरेखा असून प्रत्येकाची भूमिका / विचार वेगळे असून प्रेक्षकांना जी भूमिका भावेल / समजेल तो ती भूमिका मनात घेऊन जाणार आहे म्हणजेच प्रत्येकाला या नाटकाकडून काहीतरी वेगळे मिळणार आहे. यात नितीन नेरुरकर यांच्या नेपथ्याची कमाल दिसून येते. गजेंद्र अहिरे लिखित, दिग्दर्शित ‘शेवग्याच्या शेंगा’ हे नाटक निर्मात्या लता नार्वेकर ह्यांच्या श्री चिंतामणी ची वेगळी नाटयकृती आहे.

 

----------