Sign In New user? Start here.

‘सुरूची आणि सुयश' यांच्या नाटकांच बोल्ड पोस्टर

 
 

‘सुरूची आणि सुयश' यांच्या नाटकांच बोल्ड पोस्टर

सुरूची अडारकर आणि सुयश टिळक या जोडीने छोट्या पडद्यावर आपली वेगळी छाप सोडली आहे. आता ही जोडी दुरावा दूर करत स्ट्रॉबेरी या नाटकाच्या निमीत्ताने प्रेक्षकांना लवकरच भेटायला येणार आहे. नुकतच या नाटकाच एक बोल्ड पोस्टर सोशल मिडीयावर शेअर करण्यात आलं.

येत्या १४ एप्रिलपासून हे नाटक रंगमंचावर उतारणार असून या नाटकाच्या पोस्टरमुळे याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. का रे दुरावा या मालिकेला चांगली प्रसिद्धी मिळाल्यामुळे या दोघांचे खास असा चाहत वर्ग निर्माण झाला आहे.

suruchi and suyash's new drama strawberry

दत्ता पाटील यांनी लिहिलेल्या या नाटकाला अभिजीत झुंजारराव यांनी दिग्दर्शीत केले आहे. नरेन चव्हाण, अभिजीत साटम, रूजूता चव्हाण अशा त्रिमूर्तींनी या नाटकाची निर्मीती केली आहे. १४ एप्रिलपासून हे नाटक नाट्यगृहात येत असल्याने त्याची जोरदार जाहीरात सध्या सुरू आहे.

मालिकेमध्ये या जोडीला अनेक प्रेक्षकांचे भरपूर प्रेम लाभले होते. मालिकेत भावलेल्या या जोडीला नाटकाच्या रंगमंचावरपण तेवढंच पसंत करतील का हे नाट्क आल्यावरच कळेल.

----------