Sign In New user? Start here.
 
 

मधुकर तोरडमल लिखीत ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ पुन्हा रंगभूमीवर

मधुकर तोरडमलांनी आपल्या लेखणी द्वारे अजरामर करून ठेवलेली कलाकृती म्हणजे ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ आता पर्यंत या कलाकृतीचे तब्बल ५ हजाराहून अधिक प्रयोग झाले असून ६ निर्मात्यांनी सदरहू नाटक रंगमंच्यावर आणले आहे व तेही ५०० ते ५५० प्रयोग करूनच थांबले आहेत, आता राजन पाटील यांच्या दिग्दर्शना खाली व निमिष सावे यांची निर्मिती असलेले हे नाटक रंगभूमीवर नुकतेच आले असून त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.यात प्राध्यापक बारटक्केंची भूमिका करताहेत प्रदीप पटवर्धन तर थत्तेंची भूमिका करताहेत अशोक शिंदे, गौरव सावें बंड्याची भूमिका करत असून, वैभव सारंग प्यारे तर ढमी मृणालिनी जांभळे करत आहेत, देशपांडे बाई अश्विनी चव्हाण झाल्या आहेत डेप्यूटी झालेत रत्नाकर देशपांडे.

या नाटकात प्रदीप पटवर्धन व आशिक शिंदे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. त्याबद्दल बोलताना प्रदीप पटवर्धन म्हणाले मामा अर्थात मधुकर तोरडमल यांनी अजरामर केलेली भूमिका मला करायला मिळणे हे मी माझे भाग्य समझतो त्याचे दडपण तर शेवट पर्यंत राहणारच पण मनाला वेगळे काहीतरी केल्याचा आनंद आहे. रसिकांचा लाफ्टर आला की बरे वाटते मी माझ्यापरीने नाटकात प्राध्यापक बारटक्के उतरवायचा प्रयत्न केला आहे. गाभा कायम ठेवून थोडे बदल केले आहेत.दिग्दर्शक राजन पाटील म्हणाले या नाटकाचे यश हे वादातीत आहे. जेव्हा सुयोग तर्फे हे नाटक केले तेव्हा नाटकाचा गाभा तसाच ठेवून काही बदल केले त्याच प्रमाणे वेळही कमी केली.

अशोक शिंदे म्हणाले, “ जनरेशन प्रमाणे बदलले पाहिजे ५२ वर्षाचा माणसाला उगीचच म्हातारा दाखवण्यात काहीही हशील नाही मी स्वत ५२ वर्षाचा असून मी म्हातारा दिसतो का ? मी खरा असा दिसत असीन तर नाटकात मी का म्हणून केसाला पांढरे लावून व वाकून चालायचे हे आमच्या दिग्दर्शकाला पटले व त्यांनी ताबडतोब याला होकार दिला.बंड्याची भूमिका करणारा गौरव सावे म्हणाला मी बीटेक केले असून खूप दिवसां पासून मराठी नाटक करायची उर्मी होती ती मी माझा भाऊ व मित्र निमिष ला सांगितली व त्यानेही बॉलीवूड मध्ये न जाता मराठी नाटक करायचे ठरवले त्याच्या मुळेच मला हि भूमिका मिळाली नाहीतर माझे मराठी उच्चार ऐकून दिग्दर्शक राजन पाटलांनी दमच दिला होता आता रोज मराठीचे वाचन करून उच्चार सुधारले आहेत.निर्माता निमिष सावे म्हणाले तरुण तुर्क म्हातारे अर्क हे सदाबहार नाटक असून ते मनाला आजही भिडते.

 

----------