Sign In New user? Start here.

ती फुलराणी .. नाबाद ५०

 
 

ती फुलराणी .. नाबाद ५०

मराठी रंगभूमीच्या इतिहासातील सोनेरी पानं म्हणजे ती फुलराणी हे नाटक. प्रत्येक पिढीतल्या निर्मात्या–दिग्दर्शकाला भुरळ घालणाऱ्या या अजरामर कलाकृतीला आजवर उदंड प्रेक्षकवर्ग लाभला. रविवारी सायंकाळी शिवाजी मंदिर नाट्यगृहाचा पडदा उघडला गेला तो राजेश देशपांडे दिग्दर्शित ती फुलराणी या नव्या संचातील नाटकाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग सादर करण्यासाठी.. आजवर या नाटकाचे प्रयोग केलेल्या सर्व कलाकार, तंत्रज्ञ, निर्माता-दिग्दर्शकांना मानाचा मुजरा करीत ती फुलराणी च्या पन्नासाव्या प्रयोगाचे सादरीकरण दणक्यात करण्यात आले.

हेमांगी कवीने साकारलेल्या फुलराणीचा दरवळ आणि डॉ.गिरीश ओक, विजय पटवर्धन, सुनील जाधव यांच्यासह सर्व कलाकारांच्या अभिनयाची अदाकारी उपस्थित सर्व मान्यवर आणि रसिकांना पुर्नप्रत्ययाचा आनंद देणारी ठरली. कमी अवधीत पन्नास प्रयोगाचा टप्पा गाठलेल्या ‘अष्टगंध एंटरटेण्मेंट’ आणि एॅडोनिस मल्टीमिडिया अॅण्ड एण्टरप्रायजेस प्रा.लि’ निर्मित ती फुलराणीच्या पुढील वाटचालीस नाट्यरसिकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी नाटकाच्या संपूर्ण टीमने धमाल सेलिब्रेशन करीत फुलराणीची पन्नाशी उत्साहात साजरी केली.

----------