Sign In New user? Start here.

अखिल भारतीय मराठी गजल संमेलन २०१२

 
 
 
 
 
 
 
 
 
 
marathi gazal sammelan

मराठी गझल संमेलनात झगमगची भूमिका

गझल सागर प्रतिष्ठान तर्फ़े घेण्यात येणा-या सहाव्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाचे पणजी(गोवा) येथे १४ व १५ जानेवारी २०१२ रोजी आयोजन करण्यात आले आहे. पहिल्यांदाच हे संमेलन गोवा कला अकादमीच्या सहाय्याने महाराष्ट्राबाहेर होत असून याआधी मुंबई, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, वाई येथील संमेलने अतिशय जोरदार प्रतिसादात संपन्न झाले. त्यामुळे सर्वच गझल दर्दींचा विचार करून पहिल्यांदाच या गजल संमेलनाचे ऑनलाईन प्रमोशन करण्यात येणार आहे. www.zagmag.net या मनोरंजन वेबसाईटच्या माध्यमातून गोव्यातील या संमेलनाचा आनंद श्रोत्यांना घेता येणार आहे. या संमेलनाच्या प्रत्येक सत्राचे ऑडिओ या वेबसाईटवर संमेलन संपल्यावर रसिकांना ऎकता येणार आहे. त्यामुळे जे रसिक गोव्याला जावू शकणार नाहीत त्यांना काळजी करण्याची किंवा नाराज होण्याची काही एक गरज नाहीये.

marathi gazal sammelan

www.zagmag.net ही महाराष्ट्रातील मनोरंजनाची अग्रगण्य वेबसाईट असून प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी नवीन देण्याच्या प्रयत्नात असते. या वेबसाईटवरून अनेक महोत्सवांच्या ऑनलाईन प्रमोशन सोबतच मराठी चित्रपटांचंही प्रमोशन केल्या जातं. सोबतच अनेक सेलिब्रिटींचे ब्लॉगही रसिकांसाठी यावर देण्यात येतात. त्यामुळे मराठी गझलच्या प्रसारासाठी कार्य करणा-या गझल सागर प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला प्रसिद्धी देण्यासाठी झगमगने पुढाकार घेतला आहे. आज मराठी गझल तरूणाईच्या जास्त जवळची आहे. या गझलच्या प्रवासाला आणखी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी झगमग प्रयत्न करणार आहे. ऑडिओ सोबतच या संमेलनाच्या अध्यक्षांची, गझलनवाज भीमराव पांचाळे यांची आणि अनेक मान्यवरांच्या ऑडिओ मुलाखती तुम्हाला वेबसाईटवर ऎकता येणार आहेत. सोबतच अनेक कलाकारांच्या लेखी व ऑडिओ प्रतिक्रियाही ऎकता आणि वाचता येणार आहेत.