Sign In New user? Start here.

"हसवा फसवी"

 

"हसवा फसवी"

English
झगमग अता पर्यंत अनेक कार्यक्रमाचे यशस्वी रित्या परदेशात आयोजन केले आहे आणि त्यास तुंम्ही रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या ही वेळेस झगमग आपल्य परदेशी वाचकांसाठी खास लोकाग्रहास्तव पुष्कर श्रोत्री यांच्या 'हसवा फसवी' नाटकाचे आयोजन करत आहेत.

'हसवा फसवी' या नाटकाच नाव घेताच आपल्या डोळ्या समोर उभ राहतात ते दिलीप प्रभावळकर यांच्या लेखन आणी अभिनयाने त्यांनी या नाटकाला एका उंचीवर नेऊन ठेवले. त्यामुळे या नाटकात प्रेक्षक दुस-या कोणाला इमॅजिन नाही करू शकत पण जसा काळ बदलत असतो त्या प्रकारे काही जुन्या गोष्टी आपली कात टाकून नविन रूपात आपल्या समोर उभं राहातात. अशाच प्रकारे या गोष्टीला पुन्हा नविन टच देण्याच शिवधनुष्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणी अभिनेता पुष्कर श्रोत्री उचललेले आहे . यामुळॆच हे नाटक पाहण ही प्रेक्षकांनां एक वेगळा आणि सुखद अनुभव देवून जातो.

'हसवा फसवी' चा डोलारा आहे तो एकाच अभिनेत्याच्या खांद्यावर. सहा अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायच्या त्यात एक स्त्री भूमिकाही यासाठी या भूमिकांची समज हवीच; पण त्याचबरोबर हवा प्रचंड स्टॅमिना आणि उपलब्ध असलेल्या अगदी काही मिनिटांत स्वत:ला अंतर्बाह्य बदलण्याची चपळाई. पुष्कर श्रोत्रीने हे कसब आपल्याकडे आहे, हे सिध्द केले आहे. अलीकडे काही नाटके बरीच जुनी असल्याने ती आजच्या ब-याच प्रेक्षकांनी पाहिलेली नाहीत. 'हसवा फसवी' तसे नाही. दिलीप प्रभावळकरांनी या नाटकाचे सुमारे ७५० प्रयोग केले. याच्या सीडीही उपलब्ध आहेत. साहजिकच, या नाटकातला त्यांचा अभिनय बहुतेकांच्या ऒळखीचा आहे. मात्र प्रभावळकरांची आणि पुष्करची कुणी तुलना करू पाहील, तर योग्य होणार नाही. कारण या दोन्ही अभिनयाची शैली जशी वेगळी तसाच त्यांच्या अनुभवातही खूप फरक अहे. त्यामुळे कसलीही तुलना न करता या नाटकाकडे पाहणे महत्वाचे ठरते. कारण, या दोन्ही अभिनेत्यांची अभिन्याची शैली जशी वेगळी आहे. तसाच त्यांच्या अनुभवातही खूप फरका आहे त्यामुळे कसलीही तुलना न करता या नाटकाकडे पाहणे महत्वाचे ठरते.

चंद्रकांत कुलकर्णी हे दिग्दर्शक म्हणून उत्तम आहेत, हे आता वेगळे सांगायची गरज नाही. नाही. याही नाट्कावर त्यांची छाप आहेच,पुष्कर श्रोत्रीच्या क्षमता ऒळखून त्याला या भूमिकांमधे करण्याचे श्रेय त्यांचेच. त्याचबरोबर केवळ तीन पात्रे आणि अगदी मोजके नेपथ्य असुनही त्यांनी प्रयोग उत्कृष्ट बांधला आहे. आधीच्या प्रयोगानंतर काही वर्षाचा कालावधी उलटून भान ठेवत त्यांनी मोबाईलचा, नवीन गाण्यांचा वापर आवर्जून केला आहे.

सतीश जोशी आणि वैखरी पाठक यांनीही आपल्या भूमिकेची नस अचूक सापडली आहे. प्रदीप मुळेयेंचे नेपथ्य, प्रतिमा जोशी आणि भाग्यश्री जाधव यांची वेशभूषा विषयाला साजेशी न पाहिलेल्यांनी आवर्जून पाहावे आणि पाहिलेल्यांनाही आवर्जून पाहावे आणि पहिलेल्यांनाही पुन:प्रत्ययाचा आनंद मिळावा, असाच हा 'हसवा फसवी' चा नवीन प्रयोग आहे.

नाटकाची कथा कृष्णराव हेरंबकर हे जुन्या पिढीतले प्रसिध्द संगीत नट, वयाची ऎंशी उलट्लेल्या या कलाकरच सत्कार समारंभ आयोजित केला आहे. पण काहींना काही अडचण सतत उभी राहिल्याने ते कार्यक्रमाच्या ठिकाणी अजून पोहचू शकलेले नाहीत. आयोजकांपैकी वाघमारे(सतीश जोशी) आणि मोनिका (वैखरी पाठक) ही दोघे ते येईपर्यंत किल्ला लढवताहेत. यातून होणारे गोंधळ आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचणारे अनाहूत पाहुणे यातून एक वेगळेच नाटक रंगते. चिमणराव, चिंगपॉंग देशाचा प्रिन्स वाटुंघ पिन पिन, नाना पुंजे उर्फ कोंबडीवाला, पूर्वी श्रोत्री-पटेल-लुमंबा, बॉबी मॉड हे ते पाहुणे, अखेरीस कृष्णरावही सत्काराच्या ठिकाणि हजर होतात. या सहाही व्यक्तीरेखा वय, पार्श्वभूमी, स्वभाव यांत एकमेकांपासून पूर्ण भिन्न, प्रिन्स मराठी बोलत असला, तरी तो मोठ्या प्रयत्नाने समजून घ्यावे लागावे, अशी त्याची त-हा.

या सगळ्यांचे वेगळेपण आणि त्यांची स्वभाववैशिष्टेही आपल्या अभिनयातून पुष्कर श्रोत्रीने अतिशय प्रभावीपणे दाखविली आहेत. मुख्य म्हणजे कसलेही दडपण न घेता आपल्य अश शैलीत त्याने हे केले आहे. प्रिन्स, कोबंडीवाला, पूर्वी आणि कृष्णराव यांचा विशेष उल्लेख या संदर्भात करावा लागेल. त्याच्या अभिनयाचीं रेंज खूप मोठी आहे, हेच यातून दिसून येते अत्तपर्यंतच्या कारकिर्दीत पुष्करला अव्हानात्मक भूमिका खप कमी मिळाल्या. पण हे नाटक त्याच्या कारकिर्दीसाठी खूप महत्वाचे ठरले. Chat conversation end