Sign In New user? Start here.

संगीतकार संमेलन २०११

 
 
 
रंग संगीतकार संमेलनाचे

आजच्या तरुण मराठी संगीतकारांनी आधीच वेगळ्या उंचीवर असलेल्या मराठी संगीत विश्वाला आणखी एका वेगळ्याच क्षितीजावर नेऊन ठेवले आहे. याच तरुण संगीतकारांच संगीत विश्वातील काम जगाला माहिती व्हावे, संगीतकारांमध्ये त्यांच्या विचारांची देवाण- घेवाण व्हावी, या उद्देशाने गेल्या तीन वर्षांपासून दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र आणि मनसा तर्फ़े दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे संगीतकार संमेलन आयोजित करण्यात आले होते. ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान या संगीतकार संमेलनाचे सुर-ताल छेडले गेले. संगीतकारांनाच नाही तर नवोदित गायक, गीतकार, संगीत संयोजक यांच्यासाठीही या संमेलनात वेगवेगळ्या विषयांवर गप्पा केल्या गेल्या. अनेक अनुभवी संगीतकार त्यांच्या अनुभवांची देवाण-घेवाण सुद्धा या संमेलनातून करण्यात आली. या चौथ्या संगीतकार संमेलनाचे तीनही दिवसांचा लिखित आणि ऑडीओ स्वरूपातील आढावा श्रोत्यांना ऎकायला मिळणार आहे.

३, ४ आणि ५ नोव्हेंबरला या संगीतकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उदघाटन केले. पहिल्या दिवशी गुंफल्या जाणा-या पुष्पात जेष्ठ संगीतकार पद्मभूषण कै. श्रीनिवास खळे यांना आदरांजलीचा देण्यात आली. या कार्यक्रमात मा.सुरेश वाडकर, संगीतकार अजित परब आणि कमलेश भडकमकर यांचा समावेश होता. तर दुपारी ज्येष्ठ तबला वादक माधव पवार यांचा ‘तालयात्रा’ हा तबला वादनावर अनुभवपर कार्यक्रम झाला. त्यानंतर पहिल्या दिवसाचा शेवट ‘चळवळीतील गाणी’ या संगीतरजनीने करण्यात आली. यात युवराज मोहिते, कृष्णकांत जाधव आणि शाहीर संदेश गायकवाड यांचा सहभाग होता.

तीन दिवस रंगलेल्या या संगीतकार संमेलनाच्या दुस-या दिवशी सकाळी ‘मिक्सिंग- मास्टरींग’ या विषयावर गप्पा केल्या गेल्या. यात विजय दयाळ आणि प्रसाद साष्टे यांचा सहभाग असणार होता. तर दुपारी ‘स्वत:च्या म्युझिक अल्बमची निर्मिती’ या विषयावर वैशाली सामंत, वर्षा भावे, अनुजा वर्तक आणि जयदीप बगवाडकर ह्या प्रसिद्ध कलाकारांनी गप्पा केल्या. त्यानंतर सायंकाळी ‘इंटरनेट संगीतकारांसाठी एक वरदान’ या विषयावर संगीतकार कौशल इनामदार यांनी गप्पा केल्या.

या संमेलनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ५ नोव्हेंबरला सकाळी ‘बंदिशीतील सौंदर्यस्थळं’ या विषयावर पं.सत्यशील देशपांडे यांनी संवाद साधला. त्यानंतर ‘9x झकास’ पहिली मराठी संगीत वाहिनी यावरही गप्पा केल्या गेल्या. यात योजना बहाळकर-भावे आणि नानूभाई सिंघानिया हे सहभागी झाले होते. त्यानंतर या संमेलनाचा शेवट ‘पाश्चिमात्य संगीत- एक अदभूत श्रवण यात्रा’ या विषयावर ऋषिकेश कामेरकर आणि मिथिलेश पाटणकर यांनी संवाद साधला.

या चौथ्या संगीतकार संमेलनाचे तीनही दिवसांचा लिखित आणि ऑडीओ स्वरूपातील आढावा श्रोत्यांना ऎकायला मिळणार आहे. लवकरच फक्त झगमग डॉट नेटवर....

 
 
 
 
संगीतकार संमेलनाचे आयोजक आणि कलाकारांचे मनोगत

कमलेश भडकमकर (संगीत संयोजक) मनोगत ऎकण्यासाठी येथे क्लिक करा

 

कौशल इनामदार (संगीतकार) मनोगत ऎकण्यासाठी येथे क्लिक करा

 

मिथिलेश पाटणकर (संगीतकार) मनोगत ऎकण्यासाठी येथे क्लिक करा

 
 
 
 
 
संगीतमय सत्रांचा लेखी आढावा
पहिला दिवस
संगीतकारांचे संगीतकार श्रीनिवास खळे
चौथ्या संगीतकार संमेलनामराठी-हिंदी संगीत क्षेत्रातील अनेक संगीतकारांना संगीत निर्मिती करतांना अनेक अडचणी येत होत्या आणि येत असतात. Read more...

 
‘तालयात्रा’
चौथ्या संगीतकार संमेलनाचं पहिलं सत्रं संपलं. त्यानंतर संगीतकार संमेलनाच्या रिवाजाप्रमाणे दुसरे सत्रं सुरू होण्याआधी नवीन गायकांकडून नवीन रचना सादर करण्यात आली. Read more...

 
संगीतकार संमेलनातून चळवळीचे सूर संगीतकारांना एकत्र आणणा-या या संगीतकार संमेलनाची मूळ संकल्पना ही संगीतकार मिथिलेश पाटणकर याची असून संगीत संयोजक कमलेश भडकमकर आणि संगीतकार कौशल इनामदार Read more...