Sign In New user? Start here.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव 2014

   

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा "सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव" या वर्षी ११ ते १४ डिसेंबर २०१४ या काळामध्ये न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग मैदानावर होणार असून या प्रतिष्ठेच्या महोत्सवाचे यंदाचे ६२ वे वर्ष आहे. या महोत्सवमध्ये सहभागी होणा-या कलाकारंची नावे आणि महोत्सवाचे वेळापत्रक आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी जाहीर केले.यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन मध्ये २५ कलाविष्कार आणि जवळजवळ २५ हून अधिक नामवंत तसेच युवा पिढीतील कलाकार सहभागी होणार आहेत. या कलाकारांमध्ये देशाच्या विविध भागातील आतंरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार तसेच नवे प्रतिभावंत कलाकार आपली कला रसिकांसमोर सादर करणार आहेत. या कलाकारांमधील काही कलाकार या महोत्सवामध्ये प्रथमच आपली कला सादर करणार आहेत.

महोत्सवाच्या पहिल्या तिन्ही दिवसांची (११-१३ डिसेंबर) सुरवात दुपारी ३.३० वाजता होणार असून तो रात्री १०:०० वाजेपर्यंत चालणार आहे. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे रविवार दि. १४ डिसेंबर रोजी पहिले सत्र सकाळी ८:०० ते दुपारी पर्यंत तर दुसरे सत्र दुपारी ४:०० ते रात्री १०:०० या वेळेमध्ये चालेल.