Sign In New user? Start here.

सौ. अदिती मोहिलेAditi Mohileप्रिय बाबाआभार या computer चे कारण मी इतक्या प्रस्तावना सुरु केल्या आणि परत खोडल्या की कागदावर लिहित बसले असते तर खूप कागद फुकट गेले असते. (हातात पेन घेऊन लिहायची सवय गेलीये ही गोष्ट निराळी). बाबा, तुमच्याबद्दल लिहायला योग्य न्याय देईल अशी सुरुवातच सापडत नाहीये आणि याला एकाच कारण आहे की तुम्ही इतके dynamic आहात की तुमच्या कुठल्या एका गोष्टीबद्दल बोलले तर तो दुसऱ्या खुबीवर अन्याय होईल. या आधी बाबांवर लिहायची अशीच एक संधी मला मिळाली होती जेंव्हा मी अमेरिकेत माझी "Multimedia Designer " ची degree पूर्ण होण्यासाठी शेवटच्या दिवशी शेवटचं भाषण देत होते. ४ तासानंतरच मला भारतात येण्यासाठीच विमान पकडायचं होत आणि विषय होता "the most amazing personality in your life ".अर्थात मी बाबांवर लिहिले होते आणि त्यात बरेचसे मी बाबांच्या शिक्षणावर बोलले होते की कशी शिक्षणाची त्यांना तळमळ आहे. आणि गरिबीत पण शिकले आणि PhD केलीये.. कसे स्वतःवर कमीत कमी खर्च करून दुसर्यांसाठी वाट्टेल ती मदत करतात.. मला या सगळ्या गोष्टींचा नितांत अभिमान आहे आणि तोच मी त्या भाषणातून प्रतीत केला. पण नंतर माझे प्राध्यापक मला म्हणाले की हे तू personality म्हणून लिहिल्यास पण तुला तुझे बाबा तुझ्या नजरेतून कसे दिसतात ते समजून लिहायचा प्रयत्न कर. आता मला ती संधी पुन्हा चालून आलीये तर छोट्या छोट्या तुकड्यांमधून मी तेच व्यतीत करणार आहे.

"बाबा, तुम्हाला उशीर होतोय, मी पटकन scooty वरून सोडून येते नाहीतर तुमची ट्रेन चुकेल”. पण १० पैकी ९ वेळा बाबा माझ्यावर वैतागायचे आणि रोज आमच्यात एकाच प्रेमसंवाद व्हायचा. "अजिबात नाही. तू मला सोडणार आणि तशीच रिकामी परत येणार यात तुझे दुप्पट पेट्रोल फुकट जाणार, काहीही गरज नाहीये". शेवटी आमची मांडवली व्हायची की मी त्यांना अर्ध्या अंतरावर सोडायचे. रिक्षा बाबांनी कधी वापरली नाही. मला लहानपणी वाटायचे की मी जेंव्हा कमवायला लागेन तेंव्हा आई बाबांना काही नाही तर रिक्षासाठी pocket money देईन म्हणजे त्यांना तो वापरावाच लागेल. गम्मत नं?

Fashion Parade

Baba me and Dada on my Birthday

लहानपणी मी सगळ्यात जास्त भाव खाल्ला बाबांच्या वरचेवर होणार्या "foreign trips " मुळे. नवीन कानातले, नवीन फ्रॉक, नवीन बूट, नवीन bag , नवीन गॉगल, नवीन घड्याळ इत्यादी गोष्टी मला शाळेत असताना फक्त बाबांमुळे मिरवायला मिळायच्या जेंव्हा बाकीच्या माझ्या मित्र मंडळींना यातल्या अर्ध्या गोष्टी सुद्धा कधी वापरायला मिळाल्या नाहीत. शिवाय imported म्हणून जास्त भाव मिळायचा तो वेगळाच. त्यामुळे बाबा परदेशातून परत आले की आधी मी त्यांची bag उपसून बघायचे मला काय काय आणलाय ते. एकदा बाबा माझ्या वाढदिवसाच्या दिवशी परत यायचे होते ट्रीप वरून. माझे सगळे मित्र मैत्रिणी येऊन गेले तरी बाबा नाही आले.. ११.३० वाजून गेले. मी आतुरतेने बाबांची वाट बघत होते. आई, दादा कपडे बदलून झोपायला जात होते पण मी कपडे बदलले नव्हते कारण मला बाबांना आईने माझ्यासाठी खूप मेहनत घेऊन शिवलेला सुंदर फ्रॉक दाखवायचा होता. आणि मला १००% खात्री होती की जग इकडचे तिकडे झाले तरी बाबा १२ च्या आत घरी येणार. आणि बाबा ११.५० ला घरी आले. तेंव्हा विमान वेळेवर यावे लागते आणि आपल्या हातात काही नसते अशी अक्कल नव्हती. दिलेला शब्द कायवाट्टेल ते झाले तरी बाबा पाळणारच हा माझा ठाम विश्वास होता.

शाळेत मी खूप हुशार नव्हते. अभ्यास करायचे, चांगले मार्क्स पण मिळायचे पण खूप आवडीने करायचे अशातला भाग नव्हता. पण तुझे बाबा काय करतात"? असा कोणी प्रश्न विचारला की मी सगळ्यात पहिले उत्तर द्यायचे "माझे बाबा शास्त्रज्ञ आहेत". अभिमानाने मान उंचावायची आणि अजूनही मी एकही संधी सोडत नाही हे सांगायची. मी इतकी हवेत असायचे की त्यानंतर "मग तू कशी हुशार नाही" हे लोकांच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह मला कधीच दिसले नाही.

बाबांच्या माझ्याकडून नक्की काय अपेक्षा होत्या आणि त्या मी पूर्ण केल्या का हा प्रश्न मी त्यांना कधी विचारला नाही कारण विचारायची कधी हिम्मत नाही झाली. धोपट मार्गाने जाऊ नकोस हे लहानपणापासून इतके बिंबलेले होते आणि चित्रकलेत मी बर्यापैकी चांगले होते तर उगीच डॉक्टर, इंजिनेर बनून एक सीट कशाला फुकट घालवा हे माझे धोरण. तेंव्हा मात्र बाबा मला कुठेतरी सारखे वाटायचे की का तुम्ही मला पुढे येऊन नाही सांगत की माझ्यासारखी काहीतरी PHD कर. दादाच्या मागे बाबा सारखे लागायचे आणि त्याच्याकडून त्यांनी नेहमीच अपेक्षा ठेवल्या पण चित्रकला हा त्यांचा प्रांत नसल्यामुळे बाबा कधीच माझ्या शिक्षणाच्या आड आले नाहीत. प्रत्येकाचा एकाच प्रश्न, तुझे बाबा एवढे मोठे शिकलेले आणि तू निदान १२ वी तरी करायची (माझा course १०+५ असा होता) मला लोकांना तोंड द्यायला नाकी नऊ यायचे की या degree साठी १२ वी ची गरज नाहीये मग कशाला करू १२वी. मला खात्री आहे की बाबांना पण त्या वेळेस खूप प्रश्नान तोंड द्यावे लागले असेल पण आई माझ्या पाठीशी ठाम उभी होती त्यामुळे बाबांनी मला पूर्णपणे आईवर सोपवले होते.

काही प्रश्नांवर बहुतेक माणसांची कशी समान प्रतिक्रिया असते नं? माझे बाबा शास्त्रज्ञ आहेत हे ऐकल्यावर याच्या पुढचा प्रश्न खूपच गमतीशीर असतो. थोडे विषयांतर कारण मला हे लिहिल्याशिवाय राहवत नाही.. जेंव्हा दादाने वाहिनीला officially आपली जोडीदारीण म्हणून घोषित केले तेंव्हा दादाच्या आवडी निवडी माहित असलेला प्रत्येक जण अध्यारुत धरून विचारायचा..

"गोरी असेल नं "? - "नाही" (sorry वहिनी पण तेंव्हाचे उत्तर दादाचे हेच असायचे)
"घारी असेल नं "? - "नाही" ,"खूप उंच आहे"? - "नाही"

दादाच्या अपेक्षित यादीमधले तिच्यात यातले काही नव्हते पण माझी वहिनी मला खूप खूप जास्त आवडायची आणि आवडते.. आणि या घिस्यापिट्या गोष्टींपेक्षा तिच्यात वेगळीच चमक आहे जी तिला इतर गोर्या-घार्या-उंच मुलींपेक्षा खूप खूप उंचावर नेऊन ठेवते. ओके ओके.. so मी परत मुद्यावर येते.. बाबा शास्त्रज्ञ आहेत हे म्हटल्यावर १००% लोकांचा पहिला प्रश्न असायचा.. मग ते अगदी पुस्तकी किडा असतील नं? ते एकाच गोष्टीत रमत असतील आणि खूप बोरिंग असतील नं? अगदी काही लोक विचारायचे की त्यांचे खूप मोठे केस आणि दाढी मिशी असेल नं.. हाहा! बाबा अजिब्बात बोरिंग नाहीत. बाबा share मार्केट खूप जवळून follow करतात. बाबांना कॅसिनो मध्ये जाऊन roulette खेळायला खूप आवडतं. अमेरिकेत जाऊन बाबांना कुठल्या दुकानात काय चांगले "deal" आहे ते बघायला भयंकर आवडतं. त्यांच्यात ते सगळे गुणधर्म आहेत जे एका "living life to the fullest" व्यक्तीकडे असावेत.

Baba, gifiting me Wine for my birthday

एक मस्त किस्सा सांगते जो मला नाही वाटत कुठल्याच मुलीकडे असेल. माझे कॉलेज चे दिवस होते. बाबा एकदा अमेरिकेहून आले होते आणि रविवार ची दुपार होती. आई छान कोंबडी वडे बनवत होती. आणि बाबांची मला हाक आली. अदिती, मार्गारिटा घेणार का? मी डोळे फाडून "काय"????? त्यावर बाबा आणखीन मूड मध्ये येऊन म्हणाले, "मार्गारिटा mix आणलाय अमेरिकेहून. चल आपण एक ड्रिंक बनवून बघूया .. मस्त रविवार दुपार आहे". त्यानंतर आम्ही आईचा mixer आमचे ड्रिंक बनवून "बाटवला". आणि अशा तर्हेने मी माझ्या आयुष्यातले पहिले ड्रिंक घेतले आणि ते पण माझ्या बाबांबरोबर!
मज्जा नं?

 

झगमगच्या मुख्य पानाकडे

फादर्स डे स्पेशल पानाकडेबाबांसाठी कविता

दमलेल्या बाबाची कहाणी

दूरदेशी गेला बाबा

Kavita