Sign In New user? Start here.

रोहन मंकणीरोहन मंकणीअतिशय डिसिप्लिन आणि वर्कोहोलीक‘स्वामी’, ‘त्रिकाल’, ‘शांती’ या मालिकेतील विविध भूमिकांसोबत अनेक चित्रपट आणि नाटकातील भूमिका गाजवणारे अभिनेता रविंद्र मंकणी प्रेक्षकांना चांगलेच लक्षात आहेत. त्यांच्याप्रमाणेच त्यांची मुलेही अभिनय आणि उद्योग क्षेत्रात यशस्वीपणे काम करीत आहेत. रविंद्र मंकणी या प्रसिद्ध अभिनेत्यांद्द्ल त्यांच्या काही जुन्या आठवणी, गमती जमतीं त्यांचा मोठा मुलगा निर्माता-अभिनेता रोहन मंकणी झगमग टीमशी शेअर करतो आहे....

लहानपणापासून आम्ही बाबांना बघत आलो, त्यांचं काम बघत आलो तेव्हा मला हे कळून चुकले होतं की, ते कलाकार आहे. किंवा आपले वडील खूप वेगळं काहीतरी करतात आणि खूप छान करतात हेही खूप आधी मला कळले होते. जसजसा मी मोठा होत गेलो तशी त्यांची ही कलेची मला समजू लागली होती. त्यामुळे ते आमच्यात जास्त नसायचे याचं काही वाटत नव्हतं. सहसा बाबा शूटींग आणि त्यांच्या नाटकांच्या दौ-यात व्यस्त असायचे. त्यामुळे पुण्यात ते फार कमी असायचे. जेव्हाही ते पुण्यात असायचे तेव्हा ते आमच्या सोबतच जास्त वेळ घालवायचे. जेव्हाही बाबा घरी यायचे आणि गप्पा मारायचे तेव्हा खूप काही ते आमच्याशी शेअर करत होते. आमच्यासोबत असताना त्यावेळी कोणतही काम करत नसत. त्यांची एक गोष्ट मला अजूनही आठवते ती म्हणजे, मला वाचनाची खूप आवड असल्याने बाबा जेव्हा कधी मुंबईहून परत यायचे, तेव्हा ते माझ्यासाठी दरवेळी वेगवेगळी पुस्तके घेऊन यायचे.

बाबा जरी कलाकार होते तरी त्यांनी मला कधीच अभिनय क्षेत्रात येण्यासाठी फोर्स केला नाही. आम्ही काय करावं, कोणत्या फिल्डमध्ये काम करावं यासाठी त्यांनी आम्हालाच मोकळीक दिली होती. आज आमच्या कंपनीत मी अॅलज ए एम्प्लॉई काम करतो. तिथे बाबा बॉस आहेत. बाबा खूप स्ट्रीक्ट असल्यामुळे तिथे आम्ही फक्त व्यवहाराच्याच गोष्टी करतो. तिथे मी त्यांचा मुलगा नसतो. बाबा बॉससारखेच वागतात.

बाबांची काही गोष्टी मी खूप फॉलो करतो, त्यातीलच एक म्हणजे ‘विश्लेषण’ करणं. कोणतीही गोष्ट करताना त्या गोष्टींचा सर्व बाजूने विचार करणे, त्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास करूनच त्यावर काम करणे, हा त्यांचा प्लस पॉईंट आहे. ही त्यांची गोष्टी मी माझ्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये अंगीकारतो. तसेच बाबा भयंकर डिसिप्लिन आहेत, कामाचं खूप पॅशन असतं त्यांच्यात...अतिशय वर्कोहोलीक आहेत. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. तसंच चांगल्या गोष्टीचं, चांगल्या कामाचं कौतुक करणं ही त्यांच्यातील खूप चांगली गोष्टी आहे. म्हणजे त्यांना जर एखाद्या कलाकाराचं काम आवडलं, तर ते त्याचा फोन नंबर काढून, त्याच्याशी बोलून त्याला सांगतात की तुझं काम चांगलं झालं. हे फक्त कलाकारांच्याच बाबतीत नाही तर आमच्या बिझनेसमधील प्रतिस्पर्धी लोकांना सुद्धा ते फोन करून त्यांचं काम आवडल्याचं सांगतात. ह्या खरंच त्यांच्याकडून घेण्यासारख्या गोष्टी आहेत.

लहान असताना शाळेत खूप काही गमती जमती व्हायच्या बाबांवरून, मी जेव्हा मित्रांना सांगायचो की, माझे बाबा टिव्हीवर येतात, असं सांगितल्यानंतर काही मुलांना राग यायचा. ते बोलूनही दाखवायचे की, हा उगाच पब्लिसिटी करतो, खूप भाव खातो असं....तसंच टिचर लोकांच्या बाबतीत पण कधी कधी व्हायचं. म्हणजे एखाद्या वेळी केस वाढलेले असायचे तेव्हा टिचर बोलायचे की, ‘ तुझे वडीलही हिरो आणि आता तूही हिरोगिरीच करणार’ असेही टोमणे असायचे कायम...असे काही निगेटीव्ह किस्से जरी असले तरी काही पॉझिटीव्ह गोष्टी पण ऎकायला मिळायच्या. जशा की, अरे बाबांचं हे काम खूप आवडलं. बाबांना निरोप दे..! किंवा पुढे काय होणार आहे मालिकेत असंही उत्सुकतेने विचारायचे.

बाबांच्या अभिनयाचा वारसा तर आम्हाला लाभला आहेच. पण ते एका यशस्वी अभिनेत्यासोबत एक यशस्वी बिझनेसमन सुद्धा आहेत. त्यांच्या त्याही गोष्टी आमच्यात आल्यात. त्यांच्या डिसिप्लिन वागण्याने आम्हाला एक वळण लावल्या गेलं. कामातील प्रामाणिकपणा, सिरीयसनेस हे शिकायला मिळालं.

शब्दांकन - अमित इंगोले

 

झगमगच्या मुख्य पानाकडे

फादर्स डे स्पेशल पानाकडे