Sign In New user? Start here.

बदलता गणेशोत्सव

 

उपेंद्र लिमये

खरंतर माझ्याकडे आता गणपती बसत नाही. तरीही श्री गणेशा सोबत असलेलं नातं तूटत नसतं Read More..

 

अमॄता सुभाष

माझ्या सासुरवाडीला खूप चांगला गणेशोत्सव साजरा केला जातो. मेघना कुलकर्णी या माझ्या Read More..

 

सिद्धार्थ चांदेकर

आमच्याकडे गणेशोत्सवाची एक चांगली गंमत आहे ती म्हणजे आमच्या परिवारातील चौघाही Read More..

 


शर्वरी जमेनिस

खरंतर मी लहान असताना माझे बाबा भारताबाहेर त्यांच्या कामासाठी निघून गेले होते. Read More..

     
   
       

कसबा पेठ

कसबा पेठ

कसबा पेठ

   

कसबा पेठ

कसबा पेठ

     
 

कवयित्री संगीता जोशी यांच्या ‘प्रथमेशा’ अल्बममधील गाणी...

 
     
     
 
 
 

सर्व जनतेने एकत्र येण्यासाठी, समाजप्रबोधन करण्यासाठी टिळकांनी सुरू केलेल्या गणेश उत्सवाचं रूप आज पार बदललेलं दिसून येतं. आज एकाच शहरात शेकडोंनी मंडळे तयार झालीत. मात्र हे सर्व करीत असताना आपण मागे वळून कधी बघतो का ? ज्या उद्देशाने सार्वजनिक उत्सवाची सुरवात करण्यात आली, तो उद्देश मंडळॆ किती लक्षात ठेवतात ? ज्या विचारांसाठी या उत्सवाचा अंगीकार करण्यात आला ते आपण किती पाळतो ? आज भारतीय जनता एकत्र आणण्यासाठीच हा उत्सव साजरा होतो का ? अशी कितीतरी प्रश्ने समोर उभी ठाकली आहेत. खरंतर असे प्रश्न पडणारी परिस्थीती आज तयार झाली आहे.

गणेशोत्सव म्हटला की ९ ते १० दिवस पूजा आणि विविध कार्यक्रम सध्याच्या परिस्थितीत होत असतात. आधीपेक्षा हा उत्सव साजरा करण्याचं प्रमाण आज अधिक झालेलं आहे. इतकच काय तर ह्या उत्सवाचे ग्लोबलायझेशन झाले आहे. आधी हा उत्सव फक्त भारतभूमीवरच साजरा केला जायचा. मात्र आता हा उत्सव भारताबाहेरील अनिवासी भारतीयांकडून अनेक देशांमध्येही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र तिथल्या गणेश उत्सवात आणि भारतीय गणेश उत्सवात खूप फरक असल्याचं दिसून येतं. आज अमेरिका, लंडन, फ्रान्स, इंग्लंड, मॉरिशिअस या देशांमध्ये भारतीय लोक मोठ्या प्रमाणात वास्तव्य करीत आहेत. त्यांना एकत्र आणण्यासाठी अनेक संस्था आणि मंडळे तेथे कार्यरत आहेत. याच मंडळांपैकी एका मंडळातर्फ़े हिंदू मंदिरात गणेश मुर्तीची स्थापना केली जाते. आणि त्यात इतर मंडळे मदत करतात. पारंपारिक पद्धतीने सर्व पूजा-अर्चा केली जाते. अनेक मंडळे जरी असली तरी प्रत्येक मंडळात गणेश मुर्तीची स्थापना केली जात नाही. एकाच ठिकाण सर्वांना एकत्र आणण्याचा हा एक उत्तम प्रयोग आहे. या दरम्यान अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि भक्तांना प्रसाद वाटण्याचा कार्यक्रम सुद्धा असतो. हा उत्सव कुठे १ दिवस, कुठे ४ दिवस तर कुठे पूर्ण १० दिवस साजरा केला जातो.

मात्र, भारतातील गणेश उत्सवाचं सर्व रंगरूप आता बदलून गेलं आहे. गणेश उत्सव साजरा करण्याची आजच्या शेकडो मंडळांची पध्दत पाहण्यासाठी जर आज टिळक हयातीत असते, तर घरातील देव सार्वजनीक ठिकाणी आणल्याचा त्यांना पश्चाताप झाला असता. सार्वजनिक गणेश उत्सवाचा टिळकांचा हेतु वेगळाच होता.

भारतीय क्रांतीकारक स्वातंत्र्य प्राप्तीकरीता लढत होते. ह्या सर्वांच्या हालचालींवर इंग्रजांचे बारीक लक्ष होते. क्रांतीकारकांचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी इंग्रज रोज त्यांच्यावर नविन कलम लावत होते. दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ति एका ठिकाणी दिसली तरी त्यांना तुरूंगात टाकत. त्यांनी फक्त भारतीय धर्मव्यवस्थेत हात घातला नव्हता व लोकमान्य टिळक यांनी ही बाब चांगल्या प्रकारे ओळखली होती. स्वातंत्र्य प्राप्तीकरीता सर्व जातिधर्माच्या लोकांना एकत्रित आणण्यासाठी त्यांनी धर्माचा आधार घेतला आणि गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिले. ह्या सर्व कार्यांमुळे अप्रत्यक्षरित्या आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यास मदत झाली. पण आता या सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप काळानुरूप बदलत आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तर गणेशोत्सवात लोक जागृतिकरिता सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ लागले. त्यात भजन किर्तनांच्या साह्याने जनजागृति करण्यात येवू लागली. जसजसा काळ बदलत गेला जनजागृति व लोकशिक्षाणाचे कार्यही संपले आणि आजच्या काळात केवळ मनोरंजनाचे कार्य उत्सवाच्या माध्यमाने केली जाते. गणपती स्थापना होते त्या दिवसापासून पाश्चात्य संगीत कानावर रोज पडायला लागते ते शेवटच्या दिवसापर्यंत..

गणेशोत्सव जसजसा जवळ येतो तशी मंडळाच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होते ती वर्गणी गोळा करण्यासाठी...गल्लीतील प्रत्येक घर, गल्लीतील प्रत्येक दुकान, रिक्षा स्टॅंड आदी जागांवरून भरगच्च वर्गणी गोळा केली जाते. कधी कधी तर जबरदस्तीनेही वर्गणी गोळा केली जाते. इतके नाही तितके हशी हुज्जत घातली जाते. यातून अनेक वादही निर्माण होतात. मला नाही वाटत की, गणेशोत्सवाची सुरवात या सर्वासाठी करण्यात आला होता. ध्वनीप्रदुषण, विजेचा अपव्यय, वर्गणीचा गैरउपयोग, विनाकारण फटाक्यांची आतषबाजी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पोटभर दारू पिऊन नाचणे, भांडणे आदी गोष्टी आजच्या गणेशोत्सवाचा महत्वाचा भाग झाल्याचं दिसून येतंय. सोबतच शहरातील किंवा नगरातील दुस-या मंडळापेक्षा आपल्या मंडळाचं डेकोरेशन अधिक कशी चांगली दिसेल अशी स्पर्धाही आज रंगात आलेली पहायला मिळते. चांगल्या देखाव्यांची बक्षीसे देण्याची आज प्रथा सुरू झाली असून ते बक्षीस मिळवण्यासाठीही स्पर्धा लागलेली असते. एक समजत नाही की, बक्षीत मिळतं म्हणूनच देखावा चांगला ठेवायचा का ? गणेशोत्सवाकडे नुसती स्पर्धा म्हणून बघणा-यांनी त्यांनी ही दुकानदारी बंद करायला हवी आणि गणेशोत्सवाचा मुळ उद्देश जोपासायला हवा ही अपेक्षा सर्व गणेश भक्तांकडून केली जाईल.

अमित इंगोले