Sign In New user? Start here.

Ganpati special-aricle by subhag oak

 
 
सोनाली कुलकर्णी
सोनाली कुलकर्णी
सुबोध भावे
प्रसाद ओक
संतोष जुवेकर

अमॄता खानविलकर
अमॄता सुभाष
भुषण प्रधान
चिन्मय मान्डलेकर
शर्वरी जेमिनीस
श्रृती मराठे
सिद्धार्थ चांदेकर
सुशांत शेलार
तेजस्विनी पंडीत
उपेंद्र लिमये
विभावरी देशपांडे
सुजय डहाके
 
     
 
* गणेश चतुर्थी दरम्यान कोणता गोड पदार्थ प्रसिद्ध आहे ?
१) बेसनाचा लाडू २) मोदक ३) बासुंदी ४) शिरा

योग्य पर्यायावर क्लिक करा.

 
     
     
 
 
 
       
     
 

कवयित्री संगीता जोशी यांच्या 'प्रथमेशा' अल्बममधील गाणी...

 
     
 
     
 
 

 

बाप्पा तुम्ही या हो खूप-खूप राहायला ... पुढच्या वर्षी यायचेच तर जायचे कशाला?

माझ्या जन्माबरोबरच आमच्याकडे (ओकांकडे) गणपती बाप्पा आणायला सुरवात झाली आणि म्हणून की काय, माझी आणि बाप्पाची विशेष गट्टी जमली! दर वर्षी मी बाप्पाची आतुरतेने वाट बघतो. लहानपणी बाप्पा येणार म्हंटल्यावर सारं घर धुवायची आई, for once - आम्ही हि कचरा कमीच करायचो, मग "मूर्ती" ची नोंदणी करायची ... अजूनही "पी-पी-ला-शे" (पिवळा पितांबर लाल शेला) हे घोकून ठेवलेले "स्पेसिफिकेशन" आठवते. बाप्पाला गोड-धोड यायचे माझ्या मित्राच्या दुकानातून, श्री-कृष्ण दुघ्दालय (लाल-बाग) इथून. ती ऑर्डर मी त्याला शाळेतच द्यायचो; कौस्तुभ फणसे त्या माझ्या मित्राचे नाव. मग देवाची आरास करायची. आम्ही कधीच थर्माकोलची आरास नाही केली कारण आमच्या कडे एक सुंदर "फोल्डिंग" मंदिर होते लाकडाचे. मग ते लावायचे कोणी ह्यावर भांडण .... त्यानंतर ते पाठी फिरणारे चक्र, त्याची न-चालणारी battery, त्या दिव्यांच्या-माळा आणि त्यातले फुटलेले बल्ब.... सगळं सगळं अजूनही ताजे-टवटवीत आहे मनात. मग आई बरोबर दादरच्या फुल मार्केट मध्ये जाणे, फुले विकत घेणे, त्या फुलांचा तो घमघमाट, ती रानडे रोड वरची गर्दी, सगळीकडे "बाप्पाच्या" अगमनासाठी लावलेली गाणी, ती "कोहिनूर सिनेमा" समोरची लस्सी, येता-येता 'प्रकाश' मध्ये खाल्लेला "साबुदाणा वडा" आणि ते आनंदी-उत्तेजित करणारे वातावरण, अहाहा .... आजही सगळं कसं अगदी डोळ्यासमोर आहे कारण.... कारण "गणपती" हा नुसता सण नाही आहे तो एक "संस्कार" आहे, मनावर घडलेला.

आदल्या दिवशी संध्याकाळी बाप्पा घरी येताच.... घरात जुना हवा-हवासा पाहुणा आल्यासारखे वाटायचे (ते आजहि वाटते). बाप्पांना झाकून ठेवून आम्ही "गणेश चतुर्थीची" (उद्याची) वाट बघत बसायचो. बाबांना, भावाला आणि मला, सगळ्यांनाच पहिली पूजा करावीशी वाटे... मग काय आई ठरवायची कोणाचा नंबर. एरवी सकाळी उठायला कंटाळा करणारा मी बाप्पाच्या वाढदिवशी मात्र एकदम तत्पर. सकाळच्या जेवणाला काका-काकू, मावशी-काका आणि त्यांची मुलं हि असायचीच. माझ्या भावाच्या मित्राचे आईवडील हि असायचे, शेजारचे असायचे... घर एकदम भरून जायचे. पंगत असायची.....काय धम्माल ... कसली मजा! आमच्या कडे ५ दिवसाच्या भेटीला यायचे गणराज.... तेव्हा पहिल्या दिवशी संध्याकाळी आम्ही "१ १/२" दिवस वाले गणपती करायचो. मग काय फुल टू धम्माल... प्रत्येक घरी प्रसाद, चिप्सची प्लेट, समोसा, उपमा एक-न-दोन! माझ्या आणि माझ्या भावाच्या कॉलेज मधले, नाटकातले, शिवाय इतर मित्र खूप यायचे घरी.... एक सोहळाच असे घरी. आई-वाहिनी आणि आम्ही सगळे खूप खूप मदत करून सगळे manage करायचो. त्याशिवाय सहस्त्रावर्तन, कीर्तन हे असायचेच. कॉलोनीचा गणपतीही असायचाच. त्यात खूप धम्माल असायची....नाटकं बसवायचो, गाणी आणि जादूचे प्रयोग करायचो.

थोडं मोठं झालो, स्वतःची "बालनाट्य" संस्था काढली आणि सतत ३ वर्ष आम्ही गणपतीचे ८ दिवस "बुक" झालो होतो. दर दिवशी रात्री आमच्या "बालनाट्याचा" प्रयोग असे. कधी टिळक-मंदिर पार्ला, तर कधी आर्-सी-इफ चेम्बुर, तर कधी केशवजी नाईक चाळ (पहिला सार्वजनिक गणपती) गिरगाव तर कधी जी-एस-बी वडाला.. आम्हा मुलांची टोळी मुलांचे मनोरंजन करायला तयार!!! घरातला गणपती दुरावला .... पण बाहेरचे अनेक गणपती अनुभवायला मिळाले. चाळीतले गणपती, रस्त्यावरचे सार्वजनिक गणपती, मोठे गणपती तर काही छोटे गणपती. ती सामुहिक पूजा आणि ती "वाजत-गाजत' केलेली आरती!

बाप्पानी मला खूप काही शिकवले, अवघ्या छोट्याश्या वयात. प्रयोग ठरवायचा कसा, त्या जागेत सेट लावायचा कसा, मुलांना सांभाळायचे कसे, रात्री त्यांना जबाबदारीने सोडायचे कसे? आयुष्यात "practical on job training" हे तिथेच सुरु झाले. "अहो, तुम्ही प्रयोग अर्धा तास उशिराने सुरु करा... आमच्याकडे ९ वाजता पाणी येते", असे म्हणाऱ्या त्या केशवजी नाईक चाळीतल्या आज्जी अजूनही आठवता.... त्यांनीच आमच्यासाठी छान "आमटी-भात आणि पुरी-भाजी" केली होती. शिस्त आणि का-कु न करता समोरचा जे देईल ते सुखाने खायचे, प्रयोगासाठी तयार व्हायचे (ग्रीन रूम्स सुद्धा नसायच्या) आणि रात्री १० वाजता नाटक करायचे, मग रात्री दोन वाजता मुलांना सोडून घरी परतायचे ... हे कुठे शिकायला मिळणार? आज टी-व्ही आणि कॅबेल च्या जमान्यात गणेशोत्सवातली रात्रीची बालनाट्य बघायला मिळत असतील का मुलांना?

२००० साली मी अमेरिकेत आलो आणि पहिल्याच वर्षी "वर्जिनिया" मध्ये आमच्या घरी मी गणपती ठेऊन, माझ्या आणि बाप्पाच्या नात्याला "international" बनवले. बाप्पा माझा घरी आलाच पाहिजे हा माझाच हट्ट. सण तोच, पण पद्धत थोडीशी बदलली. माझे सगळे मित्र आले होते...अगदी सगळेच. कोणी तमिळ होता, तर कोणी पंजाबी तर कोणी गुजराती... आरती हि वेग-वेगळ्या भाषेत म्हटली गेली आणि प्रसाद हि अगदी वय-विद्यपूर्ण होता. "गणपती" चे "सार्वजनिक" आणि "सामुहिक" महत्व त्या दिवशी समजले. मला अजूनही आठवते की त्या गणपतीला "फिजा" नावाची एक पाकिस्तानात राहणारी पण आमच्या working group मध्ये असणारी एक मुलगीही आली होती.... बाप्पा हे बाप्पा आहेत. जो देव मानतो .... मग तो मूर्त किवा अमूर्त स्वरुपात असो ... तो त्या कडे खेचला जातोच! सीआटल मध्ये आलो आणि आजही गणेशोत्सवाची परंपरा चालूच आहे. आज माझ्याकडे तशीच मूर्ती आहे, अगदी पूर्वीसारखी - पी-पी-ला-शे, तेवढ्याच आकाराची. आता स्वतःचे घर आहे, बायको आहे, मित्र-परिवार आहे तेव्हा सण हि अगदी पूर्वी सारखाच साजरा करतो मी. सकाळी उठून देवाची पूजा, मग संध्याकाळी फुल-टू तार-सप्तकात आरती आणि मग प्रसाद! माझी "आरती" म्हणण्याची "style" हि माझीच आहे, वेगळीच आहे ... देवापर्यंत आवाज पोहोचला पाहिजे J असे मला वाटते. मी "ओरडतो" असे काही लोकं म्हणतात पण मी त्यांना न-जुमानता देवाशी माझा संपर्क साधतो, असे म्हणायला हरकत नाही!! सीआटलचे महाराष्ट्र मंडळ हि गणेशोत्सव साजरे करते. बाप्पांची प्रती-स्थापणा, मग पूजा-आरती , नंतर दर्शन. ह्या दिवशी फक्त लहानामुलांचे कार्येक्रम होतात. २००३ साली मी मंडळाचा अध्यक्ष असताना सुरु केलेला उपक्रम आजही इथे चालू आहे. २००२ साली हा कार्येक्रम सर्वांसाठी असे. मान्य तेव्हा मुलं हि कमी होती ... पण २००३ साली १७ कार्येक्रमातून ७० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला होता... हा एक त्या काळचा उचान्कच होता. आधी मी मुलांच्या नाटुकल्या बसवत असे. "करीमचाचा आणि माकडे", "अकबर-बिरबल", "भाज्यांच्या राज्यात" ह्या "सुधाताईंकडे" शिकलेल्या नाटुकल्या "अमेरिकन मराठी" मुलांकडून त्यांना कळतील अश्या पद्धतीने, मी बसवून घेत असे. मग माझी बायको मुलांचे "dances" बसवू लागली. गेली दोन वर्षे मी "ग्रिप्स" पद्धतीचे नाटक बसवतोय.... शेवटी बाप्पा समोर आपली कला सादर करण्याची ओढ अजूनही आहे आणि ती तशीच राहणार आहे!

आज बाप्पा माझ्यासाठी नुसता "देव" राहिला नाही... तर तो माझ्या बालपणीचा, माझ्या आई-बाबांचा, माझ्या दादा-वाहिनीचा, माझ्याच अंतर-मनातला एक निरोप्या झाला आहे. तो येतो तेव्हा हि सगळी मंडळी येतात ... त्या जुन्या आठवणी येतात, ते संस्कार येतात असेच मला वाटते. तो खरच माझा नातेवाईक किंबहुना माझ्याच घरातला एक म्हणून येतो, माझी विचार-पूस करायला. मला समजवायला, माझ्याशी बोलायला, रागवायला सुद्धा. येतो फक्त दीड दिवस, असतो फक्त सुपारी एवढा (सुपारीची पूजा करतो ममी), पण सांगतो खूप काही. जेव्हा येतो तेव्हा घर वेगळं वाटतं मला, एक उल्हास, एक चैतन्य, एक गोडवा असतो घरात. माझा हा देव-कम-मित्र माझी खुशाली पाहतो आणि पुढचा वर्षी पुन्हा येतो, न विसरता. जाताना सुद्धा हेच पटवून देतो की आयुष्याचे हेच चक्र आहे ... जाणे-येणे-परत जाणे, ते कोणाला टळले आहे?

पण मला त्याच्या शिवाय करमत नाही..... तेव्हा सख्या ... का रे जातोस? इथेच रहा ना.... कायमचा....