Sign In New user? Start here.

गणेशोत्सवाच्या खास आठवणी

 
सोनाली कुलकर्णी
सोनाली कुलकर्णी
सुबोध भावे
प्रसाद ओक
संतोष जुवेकर
अमॄता खानविलकर
अमॄता सुभाष
भुषण प्रधान
चिन्मय मान्डलेकर
शर्वरी जेमिनीस
श्रृती मराठे
सिद्धार्थ चांदेकर
सुशांत शेलार
तेजस्विनी पंडीत
उपेंद्र लिमये
विभावरी देशपांडे
सुजय डहाके
 
     
 
 
     
     
 

कवयित्री संगीता जोशी यांच्या 'प्रथमेशा' अल्बममधील गाणी...

 
     
 
     
 
 

खरंतर माझ्या घरी गणपती येत नाही. पण आमच्या बिल्डिंगमध्ये पाच दिवसाचा गणपती बसवला जातो. त्यामुळे गणेशोत्सवाची धमाल काय असते ती मला चांगलीच माहिती आहे. खास आठवण सांगायची म्हणजे मी पाचव्या-सहाव्या वर्गात असतांना माझ्या डान्सची सुरवात ही श्री गणेशाच्या गाण्यानेच झाली होती आणि तेही गणेशोत्सवा दरम्यानच...खरंतर आज जे काही यश मला मिळालंय ते बाप्पांमुळेच....त्यांच्यावर माझी खूप श्रद्धा आणि विश्वास आहे.

आज गणेशोत्सवाचं रूप खूप ग्लोबल झालंय. जगभरात हा उत्सव बघायला मिळतो. मात्र पुण्यातील गणेशोत्सवाची रौनक वेगळीच आहे. दहा दिवस अतिशय धमाल चालू असते. गल्ली-गल्लीत जल्लोष सुरू असतो. एक वेगळंच वातावरण असतं. तसं वातावरण तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. मला आठवतं आम्ही कॉलेजमध्ये असताना गणपती बघण्यासाठी स्पेशली सुट्टी काढायचो. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या गणपतींचं दर्शन घ्यायचो, रात्री उशीरापर्यंत गणपती बघत बघत खूप धमाल करायचो. पण आता तसं करता येत नाही. मात्र गेल्या वर्षी आदित्य सरपोतदार आणि आमच्या टीमने मिरवणूकीत सहभाग घेतला होता. पण ढोल वाजवण्याची संधी मिळाली नाही. प्रत्येक मुलीची इच्छा असते की तिला कधीतरी ढोल वाजवायला मिळावा. तशीच माझीही इच्छा आहे. मला ढोल वाजवायला खूप आवडतं. मला ते शिकायचं सुद्धा आहे. बघूया ते कितपत शक्य होतं ते....ढोल-ताशांच्या पथकातील सर्वच मुलं-मुली खूप लकी आहे की त्यांना बाप्पासाठी वाजवायला मिळतं. खरंच खूप एक्सायटींग असतं ते सर्व....गणपती बाप्पा मोरया...!

 
 

आमच्याकडे गणेशोत्सवाची एक चांगली गंमत आहे ती म्हणजे आमच्या परिवारातील चौघाही भावंडांकडे वेगवेगळे गणपती असं न करता आमच्या मोठ्या काकांकडेच फक्त गणपती बसवला जातो आणि त्यांच्याकडे आम्ही सर्वजन जमतो. या एकत्र येण्याला एक महत्व आहे. गणेशोत्सवा दरम्यान मला आणखी एक चांगली गोष्ट करायला मिळते ती म्हणजे माझ्या आईच्या एड्स नियंत्रण संस्थेच्या कार्यात मी वेळ मिळेल तसा सामिल होत असतो. त्याचंही एक वेगळंच समाधान माझ्या मनाला मिळतं.

गणेशोत्सवाच्या प्रत्येकाच्या मनात अनेक आठवणी असतात. तशाच माझ्याही काही आठवणी आहेत. लहानपणापासून मी पथकांमध्ये ढोल वाजवायचो. पण जेव्हा मी चित्रपटांमध्ये काम करायला सुरवात केली त्यानंतर खूप वर्षांनी मला मिरवणूकीत ढोल वाजवण्याची संधी मिळाली. माझ्या मित्राच्या एका पथकात तेव्हा त्याने मला ढोल वाजवण्यासाठी बोलवलं होतं. तब्बल सात तास मी ढोल वाजवत होतो, खूप पाय दुखायला लागले होते. त्यानंतरचे पुढचे तीन दिवस मी झोपूनच होतो. तालमीला न जाता ढोल वाजवण्याचा हा परिणाम होता. दुसरी गोष्ट म्हणजे पुण्यातला गणेशोत्सव हा फक्त दहा दिवसच नसतो तर वर्षभर सतत काहीना काही चालूच असतं. ढोल-ताशे पथकांचा सराव चार महिन्या आधीपासून चालू होतो. अनेक मंडळांच्या सजावटीचं काम वर्षभर चालू असतं. हे खरंच भारावून सोडणारं आहे. गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!