Sign In New user? Start here.

 

 
 

     
 
* सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरवात कोणत्या वर्षी झाली ?
१) १८९१ २) १८९३ ३) १८९५ १९००

योग्य पर्यायावर क्लिक करा.

 
     
 
सोनाली कुलकर्णी
सोनाली कुलकर्णी
सुबोध भावे
प्रसाद ओक
संतोष जुवेकर
अमॄता खानविलकर
अमॄता सुभाष
भुषण प्रधान
चिन्मय मान्डलेकर
शर्वरी जेमिनीस
श्रृती मराठे
सिद्धार्थ चांदेकर
सुशांत शेलार
तेजस्विनी पंडीत
उपेंद्र लिमये
विभावर देशपांडे
सुजय डहाके
 
     
 

कवयित्री संगीता जोशी यांच्या 'प्रथमेशा' अल्बममधील गाणी...

 
     
     
 
 

तसा गणपती उत्सव कुणी कुणी दिड दिवस, कुणी पाच दिवस तर कुणी दहा दिवस साजरा करतात. त्यानुसार माझ्या घरी दिड दिवसाचा गणपती येतो. त्यामुळे आमच्याकडे अतिशय उत्सवाचं वातावरण असतं. गणेश उत्सव माझ्यासाठी नेहमीच महत्वाचा आहे. त्याची कारणही तशीच आहेत. अनेक वर्षांपासून मी एका गोष्टीचं निरीक्षण करतोय. ती म्हणजे मला दरवर्षी गणेशोत्सवाच्या दोन दिवसांमध्ये नवीन काम मिळतं. २००३ साली या उत्सवा दरम्यान मला 'वादळवाट' सिरीयल मिळाली आणि तेव्हापासून प्रत्येक वर्षी काहीना काही काम मिळतच गेलं. माझ्यावर ही बाप्पांचीच कृपा असल्याचा माझा विश्वास आहे.

मी मुंबई राहतो पण मुंबईतील गणेशोत्सवात आणि इतर शहरातील गणेशोत्सवात खूप फरक दिसून येतो. तसा गणपती उत्सव सर्वींकडेच खूप जल्लोषाचा असतोच पण पुण्याच्या गणेश उत्सवाचं एक वेगळंच महत्व आहे. त्याची अनेक वैशिष्ट्ये सुद्धा आहेत. त्यातीलच एक विशेष आकर्षण म्हणजे ढोल-ताशांची पथके. प्रत्येकाला या पथकांमध्ये सामील होऊन ढोल वाजवण्याची इच्छा असते. माझीही तशीच इच्छा होती आणि लकीली गेल्या वर्षी एका मानाच्या गणपतीसाठी मला ढोल वाजवायची संधी मिळाली होती. हा अनुभव माझ्यासाठी खूप महत्वाचा आणि मला भारावून सोडणारा होता. त्या संधीमुळे पुण्यातील ती धमाल मिरवणूक खूप जवळून पाहता आली. असं वातावरण मुंबईत बघायला मिळत नाही. पुण्यातल्या ढोल-ताशे पथकांची शिस्त अतिशय चांगली आहे. त्यामुळे तरुणांना काहीतरी चांगलं करण्याचा ध्यास लागतो. त्यात दारू पिऊन तुम्हाला त्यात सामिल होता येत नाही, थिल्लरपणा करता येत नाही. त्यामुळे त्याचं मह्त्व लोकांनाही आहे. सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!

 
 

माझ्या सासुरवाडीला खूप चांगला गणेशोत्सव साजरा केला जातो. मेघना कुलकर्णी या माझ्या जाऊबाईंकडे..आमच्याकडच्या गणेशोत्सवाची खासियत म्हणजे आमच्याकडे अनंताची पूजा असते. ज्यासाठी आम्ही सगळे वेळातला वेळ काढून एकत्र येतो. इतर वेळी आमच्या भेटी गाठी फार कमी होतात पण या उत्सवासाठी आम्ही खास वेळ राखून ठेवतो. संदेशचा मोठा भाऊ, त्यांची मुलं, सासु सासरे आणि सोनाली आम्ही सर्व एकत्र येतो.

गणेशोत्सव म्हटला की, वेगवेगळी खाद्य पदार्थ बनवण्याची खूप मजा असते. आधी मला मोदक बनवण्याची फार गती नव्हती. पण माझ्या सासूबाई, मेघना आणि सोनाली ह्या तिघीही सुगरण आहेत. त्यांच्यामुळे चांगले मोदक मी पण करायला लागले. आम्ही एकत्र बसून मोदक तयार करण्याचा अनुभव माझ्यासाठी खूप आनंदाचा असतो. माझी गणपतीबाबतची एक खास आठवण आहे. मी एकदा हरीद्वारला गेले होते तेव्हा मी नदीच्या पात्रात उतरली असताना माझ्या पायाशी एक गणेशाची मुर्ती वाहत आली. ती मूर्ती माझ्या पायाजवळ येणं माझ्यासाठी आशिर्वाद आहे असं सर्वांना वाटतं आणि मलाही...खरंतर मला गणेशोत्सव साजरा करण्याची वेगळी गरजच पडत नाही. कारण माझ्या घरात अनेक ठिकाणी गणपतीची मुर्ती आणि फोटो ठेवलेले आहेत. इतकंच काय तर माझ्याकडे गणपतीचा टेडी सुद्धा आहे. माझ्यासाठी प्रत्येक दिवशीच गणेशोत्सव असतो. माझ्या दिवसाची सुरवात घरातील गणपतीच्या दर्शनानेच होते. या उत्सवा दरम्यान देखाव्यांचं खास आकर्षण मला आहे. समाजातील ज्वलंत विषयांवर देखावे जे केले जातात ते खरंच खूप कौतुकास्पद असतात. पण रात्रंदिवस जी चित्रपटांची घाणेरडी गाणी वाजवली जातात ती गोष्ट मला खूप खटकते. पारंपारिक ढोल-ताशे पथकांची जादू काही वेगळीच आहे. माझा मित्र दरवर्षी ढोल-ताशे वाजवतो तो मलाही बोलवत असतो. पण जाणं शक्य होत नाही. या ढोल ताशांमुळे एक जादूई वातावरण तयार होतं ज्यात आपण आपोआप नाचायला लागतो. हे श्रेय जातं त्या वाजवणा-या कलाकारांना...त्या वाजवणा-या सगळ्या कलाकारांना माझा सलाम...!
गणपती बाप्पा मोरया, सगळ्यांशी चांगलं वागूया अशीच इच्छा....!