Sign In New user? Start here.

 
 
 
 

उपेंद्र लिमये

खरंतर माझ्याकडे आता गणपती बसत नाही. तरीही श्री गणेशा सोबत असलेलं नातं तूटत नसतं Read More..

 

अमॄता सुभाष

माझ्या सासुरवाडीला खूप चांगला गणेशोत्सव साजरा केला जातो. मेघना कुलकर्णी या माझ्या Read More..

 

सिद्धार्थ चांदेकर

आमच्याकडे गणेशोत्सवाची एक चांगली गंमत आहे ती म्हणजे आमच्या परिवारातील चौघाही Read More..

 

शर्वरी जमेनिस

खरंतर मी लहान असताना माझे बाबा भारताबाहेर त्यांच्या कामासाठी निघून गेले होते. Read More..

     
 
 
 
       
     
 

कवयित्री संगीता जोशी यांच्या 'प्रथमेशा' अल्बममधील गाणी...

 
     
 

     
 
 

खरंतर मी लहान असताना माझे बाबा भारताबाहेर त्यांच्या कामासाठी निघून गेले होते. त्यामुळे आमच्या घरी गणपती बसत नव्हता. मात्र गणपती उत्सवाच्या जल्लोषात सामील होण्याची संधी मला मिळतच होती. कारण आमच्या बिल्डिंगमध्ये गणपती यायचा. तेव्हा त्या उत्सवात मी आनंदाने सामील व्हायचे. बाप्पाच्या देवळाची सजावट करायचे. लहानपण असं होतं. मात्र आता लग्न झाल्यापासून माझ्या सासरी गणेशोत्सव खूप चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो. आमच्याकडे दिड दिवसाचा गणपती असतो. त्यामुळे ख-या अर्थाने मी आता गणेशोत्सव साजरा करते आहे, अनुभवते आहे असं मला वाटतं.

एक कलाकार म्हणून गणेशोत्सव माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण, मी एक शास्त्रीय नॄत्यांगना आहे. गेली ८ वर्षे मी पुण्यातील प्रसिद्ध पुणे फेस्टीव्हलमध्ये नृत्याचं सादरीकरण करते. मला वाटतं मी आणि हेमा मालिनी आम्ही दोघींनीच सलग इतके वर्ष पुणे फेस्टीव्हलमध्ये कला सादर केली आहे. या दरम्यान होणा-या अनेक कार्यक्रमांमध्येही मला सादरीकरण करता येत असल्याने मला माझ्या कलेचाही प्रसार करता येतो. श्री गणॆश हा देव आमच्यासाठी कलाकार म्हणून इतका प्रिय आहे की, त्यावर अनेकांकडून अनेक बंदीशी तयार केल्या गेल्या. त्यावर सादरीकरण करून एक वेगळंच चैतन्य मिळतं. त्यामुळे हा उत्सव मी सर्वच प्रकारे खूप चांगला एन्जॉय करते. दरवर्षी न विसरता पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचं दर्शन घेते. पुण्यातील गणेशोत्सवाची खासियत म्हणजे कुठल्याही चित्रपटांची थिल्लर गाणी न वाजवता पारंपारिक ढोल-ताशांचं सादरीकरण...आणि त्यात असलेली एक नियमबद्धता...यामुळेच मलाही बाप्पासाठी ढोल वाजवण्याचा मोह मला आवरता आला नाही. गेल्या वर्षी मानाच्या तुळशीबाग गणपती समोर ढोल वाजवायला मिळाला. हे ढोल वाजवण्यासाठी खूप ताकद तुमच्यात असावी लागते. सलग कित्येक तास वाजवूनही थकल्यासारखं न होता त्या ढोलांच्या नादाने आपला उत्साह आणखी वाढतो. एक वेगळाच आनंद मला तेव्हा मिळवता आला. गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा...!

 
 

मी लहानपणापासून गणपती उत्सव साजरा करण्यासाठी रायगडमधील गोरेगाव या माझ्या आजीच्या गावाला जातो. किती काम असली तरी तिथे मी पहिल्या दिवसाला तरी तिकडे जातोच. माझ्या घरी आता गणपती बसवत नाही. मी अगदी खूप लहान होतो तेव्हा असायचा. अशी आशा करतो की, लवकरच गणपती बाप्पा माझ्या घरीही पुन्हा येतील. पण सध्या आजीकडे जाऊनच हा उत्सव मी एन्जॉय करतो.

गणेश उत्सवाची आठवण सांगायची झाली तर मला एरवी गोड खायला अजिबात आवडत नाही. पण या उत्सवाच्या दहा दिवसात उकळीचे मोदक खाण्याची गंमत काही औरच आहे. इतर कुठलाही गोड पदार्थ आवडत नाही पण उकळीचे मोदक मला खूप आवडतात. या मोदकांवरूनच एक चांगली आणि वाईट गोष्ट घडली होती. माझ्या मामाची आणि माझी स्पर्धा लागली होती की, कोण जास्त मोदक खाणार. त्यात मामाने आठ-दहा मोदक खाल्लेत आणि दुस-या दिवशी त्याची तब्येत बिघडली. तो आंघोळ करून शकला नाही. त्यामुळे त्या दिवशीची पूजा लकीली मला करायला मिळाला. एकीकडे मामाला बरं नसल्याचं दु:खंही होतं आणि पहिल्यांदा घरच्या गणपतीची पूजा करण्याची संधी मिळाली त्याचा आनंदही होत होता. त्यानंतर मामाने कधीच आठ-दहा मोदक खाल्ले नाहीत. पुण्यात आम्ही सर्व परीवार एकत्र गणपती बघायला बाहेर पडायचो. खास आकर्षण असतो दगडूशेठ गणपतीचा देखावा. मी आताही प्रयत्न करीत असतो की, मला तिथे जायला मिळावं. पुण्याच्या ढोल ताशा पथकात सामील व्हायचं बराच काळ डोक्यात होतं. पण कामामुळे ते शक्य होत नाही. ढोल वाजवणं ही सुद्धा एक कला आहे. जेव्हाही तो आवाज कानावर पडतो तेव्हा शरीरातील रक्त उसळायला लागतं. इतकं ते धमाकेदार असतं. या पथकांची खासियत म्हणजे यात तरूणांबरोबरच मुली सुद्धा सहभागी होतात आणि तितक्याच ताकदीने त्या ढोल वाजवतात. आणि हजारोंच्या संख्येने जमलेले नागरीक त्यांना कमालीचं प्रोत्साहन सुद्धा देतात. हे खरंच खूप कमी बघायला मिळतं.
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!
गणपती बाप्पा मोरया, सगळ्यांशी चांगलं वागूया अशीच इच्छा....!