Sign In New user? Start here.

गणेशोत्सवाच्या खास आठवणी

 
     
 
* यातील पुण्याचा पहिला मानाचा गणपती कोणता ?
१) कसबापेठ २) गुरूजी तालीम ३) केसरीवाडा ४) तांबडी जोगेश्वरी ५) तुळशीबाग

योग्य पर्यायावर क्लिक करा.

 
     
 
सोनाली कुलकर्णी
सोनाली कुलकर्णी
सुबोध भावे
प्रसाद ओक
संतोष जुवेकर
अमॄता खानविलकर
अमॄता सुभाष
भुषण प्रधान
चिन्मय मान्डलेकर
शर्वरी जेमिनीस
श्रृती मराठे
सिद्धार्थ चांदेकर
सुशांत शेलार
तेजस्विनी पंडीत
उपेंद्र लिमये
विभावरी देशपांडे
सुजय डहाके
 
     
 
 
 
       
     
 

कवयित्री संगीता जोशी यांच्या 'प्रथमेशा' अल्बममधील गाणी...

 
     
     
 
 

खरंतर माझ्याकडे आता गणपती बसत नाही. तरीही श्री गणेशा सोबत असलेलं नातं तूटत नसतं. गणेशोत्सवाच्या अनेक आठवणी आहेत ज्या अजूनही मनात तशाच ताज्या आहेत. मी पुण्यात असताना आमचं एकत्र कुटूंब होतं तेव्हा माझ्या मोठे बाबांकडे गणपती बसायचा. तो दिड दिवसाचा असायचा त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात साजरा करता येत नव्हता. मात्र पुण्यातीलच माझ्या आजोळाला दहा दिवसाचा गणपती असायचा तिकडे खूप मज्जा यायची. गणपती येण्यापासून विसर्जनपर्यंतची सर्व तयारी करण्यात एक वेगळा उत्साह आणि आनंद मिळायचा.

आता माझ्या सासुरवाडीला गणपती बसतो त्यामुळे माझ्या मुलांना त्याचं खूप आकर्षण असतं. त्यांच्याबरोबरच मी सुद्धा गणेशोत्सव एन्जॉय करतो. पण पुण्याच्या गणेशोत्सवाबद्दल ब-याच आठवणी आहेत. तिथले ढोल-ताशे पथक, मानाचे गणपती, शिस्तीत निघणारी मिरवणूक, विविध कार्यक्रम खूप धमाल असायची. आजही ते तसंच डोळ्यांसमोर उभं राहतं. पण तेव्हा खूप वेळ असायचा गणेशोत्सव एन्जॉय करण्यासाठी...आता प्रॅक्टीकली ते शक्य होत नाही. पण पुण्यातील गणेशोत्सवाच्या असंख्य आठवणी नेहमीच सोबत असतात. ढोल ताशांच्या मोठ्या पथकात सहभागी व्हावं अशी खूप इच्छा होती. पण कधी तसं करता आलं नसल्याची खंत मनात आहे. पण आम्ही रात्री उशीरापर्यंत मिरवणूक खूप एन्जॉय करायचो..
सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा....!

 
 

आमच्या काकांकडे गेली १११ वर्ष पंडीतांचा नवसाचा गणपती बसतो जो दिड दिवसाचा असतो. यासाठी प्रत्येक व्यक्ती त्याच्या त्याच्या कुवती नुसार गणपतीसाठी सोन्याच्या दुर्वा करतो. आणि त्या सर्व दुर्वांचे मिळून आम्ही आमच्या गणपतीसाठी सोन्याचे मोदक करतो. या उत्सवा दरम्यान सारस्वत पद्धतीचं खास जेवण आम्ही करतो. या दिवसात आम्ही कांदा-लसूण सुद्धा जेवणात खात नाही. या उत्सवाची एक खासियत म्हणजे वेगवेगळ्या डिशेस बनवायला मिळतात आणि खायला मिळतात. मला या उत्सवाची आवडणारी गोष्ट म्हणजे दिवाळीत आम्ही जितके जण एकत्र जमत नाही, तेवढे या उत्सवाला आम्ही जमतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या भेटी गाठी होतात. जरी आमच्याकडे दिड दिवसाचा गणपती बसत असला तरी हा दिड दिवस आमच्यासाठी खूप उत्साहाचा आणि चैतन्याचा असतो.

पुण्याच्या गणेशोत्सवाची बातच काही और आहे. ती भव्य मिरवणूक पाहण्यासाठी जमलेली हजारोंची गर्दी, ढोल-ताशे या सर्वांचं एक वेगळच आकर्षण मला नेहमीच आहे. पाचही मानाच्या गणपतींचं मला विशेष कौतुक आहे. पुण्यात मिरवणूकी दरम्यान ढोल-ताशे पथकांची जी धमाल असते ती पुणे सोडून कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही असं मला वाटतं. त्या ढोल ताशांचा आवाज कानावर पडला की, त्यात हरवल्यासारखं होतं स्वत:ला...एक वेगळीच गंमत असते ती....मी कधी ढोल वाजवले नाही पण माझी बेस्ट फ्रेंड पूजा गुजर ही ढोल वाजवते. त्यामुळे त्यांची तालीम बघायला मी ब-याचदा गेली आहे. तशी संधी मिळालीच तर मी सुद्धा नक्की ढोल वाजवेन. जगभरातले लोक पुण्यातली मिरवणूक बघायला येतात याचं खूप कौतुक वाटतं. पूर्वी ऎवढ्या गर्दीतूनही मिरवणूक बघायला मी जायचे. पण आता त्या गर्दीत जायला मिळत नाही याची खंत आहे. गणेशोत्सव माझ्यासाठी खूप महत्वाचा असल्याने आज कितीही काम असलं तरी मी दोन दिवस गणपतीसाठी बाजूला काढून ठेवते.
सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा....! गणपती बाप्पा मोरया....!