Sign In New user? Start here.

     
 
 
 
       
 
     
 

कवयित्री संगीता जोशी यांच्या 'प्रथमेशा' अल्बममधील गाणी...

 
     
 
सोनाली कुलकर्णी
सोनाली कुलकर्णी
सुबोध भावे
प्रसाद ओक
संतोष जुवेकर
अमॄता खानविलकर
अमॄता सुभाष
भुषण प्रधान
चिन्मय मान्डलेकर
शर्वरी जेमिनीस
श्रृती मराठे
सिद्धार्थ चांदेकर
सुशांत शेलार
तेजस्विनी पंडीत
उपेंद्र लिमये
विभावर देशपांडे
सुजय डहाके
 
     
 
 

गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हा मानाचा तिसरा गणपती आहे. प्रारंभी हा गणपती तालमीमध्ये बसवला जात असे. सध्या तालीम अस्तित्वात नाही. लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा हा गणपती आहे. विसर्जन मिरवणूकीत पहिल्यांदा या मंडळाकडून गुलालाची उधळण केली जाते. या मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी माहिती दिली.

गुरुजी तालीम या मंडळाची स्थापना १८८७ साली झाली. यंदा हे मंडळ १२६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. आम्ही गेल्या २६ वर्षापासून वर्गणी न काढता उत्सव साजरा करत आहोत. यंदाच्या वर्षी 'स्त्रीभ्रूणहत्या' व 'पर्यावरण रक्षण' या विषयावर जनजागृतीचेही उपक्रम आयोजित केले आहेत. यावर्षी आमच्या कडे 'शिवगर्जना' हे ढोल पथक असून त्यात यंदा ४० टक्के तरुण महिलाचा सहभाग आहे. या वर्षी 'राजमहाल' हा देखावा साकारण्यात आला आहे. हा देखावा नितीन रांका यांनी साकारला आहे.

पुण्यात सर्वात पहिली जुनी आणि मोठी तालीम त्यावेळेस होती. त्यावेळेस तालमीला मानाचा गणपती म्हणून गुरुजी तालीम या गणपतीची निवड लोकमान्य टिळकांनी केली होती. पहिले दोन ग्रामदैवत म्हणून मानाचे गणपती कसबा गणपती व ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी व मोठी तालीम म्हणून गुरुजी तालीम व पुण्यातील मोठी बाजारपेठ म्हणून तुळशीबाग आणि लोकमान्य टिळकांचा केसरी वाडा अशा पाच मानाच्या गणपतींना मान्यता दिली.

पुण्यात या मंडळाच्या गणपतीची एकमेव अशी मुर्ती आहे जी 'मुशक बालगणेश मुर्ती ' आहे. मागील वर्षी शतकोत्तर रौप्यमहोत्सव (१२५) वर्ष साजरे करत आम्ही कार्यकर्त्यानी दीड कोटी रुपयांचा रत्नजडित सोन्याचा मुकुट गणेश मुर्तीला चढविला आहे. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात जास्त युवक कार्यकर्त्याचा सहभाग यात असतो. विसर्जनासाठी रथातुन गणपती जातात. आणि ती सजावट गुरुजी तालीमची असते हे विषेश. आमच्या येथे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अथर्वशीर्षाचा व भजनमंडळाचे कार्यक्रम आम्ही जास्त प्रमाणात करतो. आम्ही धार्मिक विधीना जास्त प्रमाणात महत्व देतो. रुग्णांना सहाय्य, क्रीडा क्षेत्रातील युवकांना प्रोत्साहन, गरजू विद्यार्थ्यांना मदत, कार्यकर्त्यांकडून प्रत्यक्ष रुग्णांना रक्तदान असे उपक्रम वर्षभर राबविले जातात.

स्नेहा मुथा