Sign In New user? Start here.

गणपती संबंधी विशेष माहिती

 
     
 
* यातील पुण्याचा पहिला मानाचा गणपती कोणता ?
१) कसबापेठ २) गुरूजी तालीम ३) केसरीवाडा ४) तांबडी जोगेश्वरी ५) तुळशीबाग

योग्य पर्यायावर क्लिक करा.

 
     
     
 
 
 
       
     
 

कवयित्री संगीता जोशी यांच्या 'प्रथमेशा' अल्बममधील गाणी...

 
     
     
 
 

गणपती संबंधी विशेष माहिती

१.दुर्वा: दुर्वा ही देवता असून तिला ब्रह्म देवाने निर्माण केली असून, ती लावण्यवती होती. एकदा तिने पार्वतीच्या अपमान केला. तेव्हा क्रोधित होऊन पार्वतीने तू तृन होशील असा शाप दिला. तिला पश्चाताप झाल्यामुळॆ तिने पार्वतीची क्षमायाचना केल्यामुळे पार्वतीने तिला उ:शाप दिला की तू तृण झालीस तरीही गणपतीला प्रिय होशील.म्हणूनच गणपतीच्या मस्तकावर दुर्वांचा अभिषेक केला जातो.

२. मंदार व शमी: और्वऋषी कन्या शमी हिचा विवाह धौम्यपुत्र मंदार यांच्याशी झाला असताना, त्यांना भृगुंडी ऋषी आले. त्यांचे विद्रुप रूप पाहून शमी व मंदारने त्यांची चेष्टा केली. तेव्हा ते क्रोधीत हॊऊन त्या दोघांना झाडे व्हाल, असा शाप दिला व मंदारवर गणपतीचे प्रेम असल्यामुळे मंदार झाड त्याचे निवासस्थान झाले आणि शमी प्रिय झाली.

३. उंदीर: उंदीर प्राणी हा कामप्रतिक आहे. काम ही तीव्र उर्जा असल्यामुळे तिच्यावर स्वार होणे कठीण असलेली तिला गणपतीने काबूत आणले, तरी ख-या अर्थाने उंदीर चिन्ह असलेला ध्वज धारण करणार गणपती आहे, असे अथर्वशीर्षात सांगितले आहे.

४. मोदक: ऒंकार हा भक्त म्हणजे भात या अंशरूपाने पृथ्वीवर अवतीर्ण झाला. भात म्हणजे तांदळाची उकड आणि गुळ खोबरे हाच नैवेद्य गणपतीला अर्पण करायचा असतो. मोद म्हणजे आनंद व क म्हणजे करणारा असा अर्थ अभिप्रेत आहे. म्हणून गणपतीला जो नैवेद्य दाखवला जातो त्याला मोदक असे म्हणतात.

५. चतुर्थी: योगमायेने गणपतीची अनुष्ठाने केल्याने गणपतीने तुझा जन्म कालमापनासाठी झाल्याचे सांगून तिला आशीर्वाद दिला. मग तिने तीथीरूप देह धारण केला असता देहाचा उजवा भाग गोरा व डावा काळा होता. उजव्या देहाला कृष्ण चतुर्थी व डाव्या बाजूच्या देहाला संकष्टी असे नाव पडले. शुध्द पंधरवड्यातील येणा-या चतुर्थीला विनायकी व वद्य पंधरवड्यातील येणा-या चतुर्थीस संकष्टी म्हटले जाते.