Sign In New user? Start here.

केसरीवाडा गणपती

 
 
 

उपेंद्र लिमये

खरंतर माझ्याकडे आता गणपती बसत नाही. तरीही श्री गणेशा सोबत असलेलं नातं तूटत नसतं Read More..

 

अमॄता सुभाष

माझ्या सासुरवाडीला खूप चांगला गणेशोत्सव साजरा केला जातो. मेघना कुलकर्णी या माझ्या Read More..

 

सिद्धार्थ चांदेकर

आमच्याकडे गणेशोत्सवाची एक चांगली गंमत आहे ती म्हणजे आमच्या परिवारातील चौघाही Read More..

 

शर्वरी जमेनिस

खरंतर मी लहान असताना माझे बाबा भारताबाहेर त्यांच्या कामासाठी निघून गेले होते. Read More..

     
 
 
 
       
     
   
       
     
 
 

मानाचा पाचवा गणपती म्हणजे केसरीवाडा गणपती. टिळक पंचांगानुसार यंदा पुण्यातील मानाच्या पाच गणपती मधील या मानाच्या पाचव्या गणपतीची स्थापना टिळक परीवारातर्फ़े २१ ऑगस्ट २०१२ रोजी पुण्यात करण्यात आली आहे. त्याबाबत केसरी मराठा ट्रस्ट चे रोहित दीपक टीळक यांनी या मानाच्या गणपतीची माहिती दिली.

सार्वजनीक गणेशोत्सवाचे रुप जे लोकमान्य टिळकांनी दिले, त्यात सर्वांना एकत्र आणण्याचा मुळ उद्देश होता. म्हणजे त्या काळात ब्रिटीशांकडून भारतीयांची जी पिळवणूक व्हायची, तेव्हा कुठेतरी सर्वधर्म-समभाव या मांडणीतून एक शक्ती उभी करायची आणि मग लढा द्यायचा. त्यासाठी हे सार्वजनिक रुप लोकमान्यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून दिलं. कारण, शेवटी भारत देश बघितला तर देव-धर्मावर आधारीत आहे. त्यावेळी किर्तने व्हायची, समाजप्रबोधन व्हायचे आणि त्या माध्यमातून लोकांना शिक्षित करणं, ब्रिटीशाविरुद्ध लोकांना जागृत करणं हा एक ऎतिहासिक निर्णय लोकमान्यांच्या हातून झाला. त्यांच्यावर कुठलाही खटला भरता यायचा नाही. तेव्हा जमावबंधी एकिकडे जाहीर झाली होती. तेव्हा धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून तो कायदा मोडून पाडला जायचा. तीच परंपरा पुढे चालू ठेवण्याचा केसरी गणेशोत्स मंडळाने हा प्रयत्न सातत्याने चालू ठेवला आहे.

अर्थातच आत्ताच्या विचारसरणी नुसार जे विविध सामाजिक प्रश्न असतात त्यावर चर्चासत्र व परीसंवाद घडवून आणणे व लोकांच म्हणनं ऎकून घेणे व समाज प्रबोधनाचे अनेक कार्य केसरी वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्ही करत असतो. म्हणूनच लोकमान्यांनी देखील 'केसरी' हा एक ट्रस्ट केलाय. राष्ट्रीय शिक्षणाचे आव्हान देखील लोकमान्यांनीच दिले होते, म्हणून शिक्षणाला हे प्राधान्य आम्ही ट्रस्ट च्या माध्यमातुन देत असतो.

आम्ही एक वेगळी परंपरा राबवण्याचा प्रयत्न ही २००२ मध्ये केला होता. आम्ही टिळक रस्त्या वरुन मिरवणूक काढू लागलो. म्हणजे लक्ष्मीरोड वरुन ज्या सर्व मानाच्या गणपतीची मिरवणूक आधी जाते. त्यामुळे मिरवणुकीला फार उशीर व्हायला लागला. ती व्यवस्थित पार पडेना, पोलिसाची खुप बंधनं येऊ लागली, वेळेच बंधन आलं त्या सगळ्या गोष्टीत मिरवणुक चांगली वाजत-गाजत व्हावी, उत्साहात व्हावी, म्हणून आम्ही टिळक रोडने जायला लागलो. म्हणजे प्रत्येक रस्त्याला तुम्ही तोच मान द्या. मुळ उद्देश तुमचा एकत्र वाजत-गाजत गणेशाची मुर्ती घेऊन जाणे हाच आहे. मग हे सर्वांनी मान्य सुद्धा केलं. पण आम्ही अलका टॉकीजला थांबतो आणि चार मानाचे गणपती गेल्यावरच आम्ही पुढे जातो. ती परंपरा आम्ही ठेवलेली आहे. कारण लोकमान्यांचा दृष्टीकोन हाच होता, की तुम्ही लोकांबरोबर राहायला पाहीजे.

लोकमान्याचा हा उत्सव साजरा करण्यामागचा उद्देश आज सार्थ पुर्ण झाला, असं मला वाटतं. कारण आज हा उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो. आणि या उत्सवात ढोल पथकामध्ये महिलांची संख्या ही मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहे. म्हणजे हा सामाजीक दृष्टीकोन आज खुप चांगल्या प्रकारे तरुणाच्या मनात घर करुन आहे. केसरी गणेशोत्सवात आम्ही तीन वर्षांआधी य़ेथे कायमची एक मुर्ती स्थापन केली. कारण की, १० दिवस गणपती असायचा आणि विसर्जन व्हायचे. मग लोकांचं असं मत होतं, की लोकमान्यांनीच ही परंपरा चालु केली आहे तर त्यांच्या वास्तुत गणेशाचं एक मंदीर असावं. म्हणून आम्ही तीन वर्षापुर्वी एक कायमची मुर्तीची स्थापना केली. ज्ञानेश्वरीत ज्याप्रमाने उल्लेख झाला होता. तसा 'सहा हात' म्हणजे 'सहा वेध' या भुमिकेवरती आम्ही ती मुर्ती स्थापन केली. देश- राज्य - शहर हे एक करायचे असेल तर एकी फार महत्वाची आहे.

या वर्षी गणॆश भक्तांना एक वेगळाच अनुभव मिळणार आहे, तो म्हणजे, भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे थोर सेनानी लोकामान्य टिळक यांचा आवाज ९२ वर्षांनी पुन्हा एकदा पुण्यात घुमणार आहे! लोकमान्यांचा आवाज असलेले ध्वनी मुद्रण नुकतेच उजेडात आले. केसरी गणेशोत्सवात यंदा लोकमान्याची छायाचित्रे, केसरीतील ग्रंथस्वरुपातील त्यांचे विचारधन उपलब्ध आहे. ब्रिटीश सत्तेला हादरा देणा-या या युगनिर्मात्याच्या प्रेरक आठवणी आजही कोट्यावधी भारतीयांच्या मनात जाग्या आहेत. लोकमान्यांच्या आवाजाची ही ध्वनिफित २१ सप्टेबर १९१५ रोजी मास्टर कृष्णराव, बालगंधर्व, 'देवगंधर्व' भास्करबुवा बखले यांच्या गानमैफलीमधील आहे. अशी माहिती रोहीत टिळक यांनी दिली.

स्नेहा मुथा