Sign In New user? Start here.

कसबा गणपती

 
 
 
सोनाली कुलकर्णी
सोनाली कुलकर्णी
सुबोध भावे
प्रसाद ओक
संतोष जुवेकर
अमॄता खानविलकर
अमॄता सुभाष
भुषण प्रधान
चिन्मय मान्डलेकर
शर्वरी जेमिनीस
श्रृती मराठे
सिद्धार्थ चांदेकर
सुशांत शेलार
तेजस्विनी पंडीत
उपेंद्र लिमये
विभावरी देशपांडे
सुजय डहाके
 
     
 
 
 
       
     
 

कवयित्री संगीता जोशी यांच्या 'प्रथमेशा' अल्बममधील गाणी...

 
     
     
 
 

कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. इतर पाच मंडळांसह या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकीत मानाचे स्थान आहे. हा गणपती मिरवणुकीत सगळ्यात पहिला असतो. कसबा हे पुण्याचे ग्रामदैवत. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून मूळची ती तांदळाएवढी होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फूट उंचीची झाली आहे, असे मानतात. शहाजी राजे यांनी १६३६ मध्ये लालमहाल बांधला. त्यावेळी जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचे दर्शन घेऊन जात असत. गणेशोत्सवात श्रींची चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढली जाते. या गणपतीपासून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो. पुण्याच्या प्रसिद्ध शनिवार वाड्याला लागूनच कसबा गणपतीचे प्राचीन भव्य व देखणे मंदिर आहे. शहाजी राजांनी पुण्याला राजवाडा बांधला होता. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष भरत राठोड यांनी दिली.

ब्रिटीशांच्या काळात जेव्हा समाजात नैराश्य आलं होतं, ते १८९३ साली लोकमान्य टिळकानी समाजात लोक जागृती करण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्याचे ठरवले. हे करत असताना त्यानी जे मुख्य गणपती म्हणजे कसबापेठ गणपती व तांबडी जोगेश्वरी हे पुण्याची ग्रामदेवता आहेत. आणि अशा स्वरुपात सार्वजनिक गणपती स्थापना करण्याची पध्दत सुरु झाली. त्यावेळी टिळकांनी बैठक घेतली आणि त्यात त्यांनी निश्चित केले की, कसबा गणपती हा त्या उद्देशाने पहिला मानाचा गणपती ठरवण्यात आला. तेच उद्देश आणि तिच परंपरा तेच कार्य आपण पुढे ठेवले आहे. म्हणजे लोकजागृतीचं कार्य म्हणा, परीसंवादाच्या मार्फत म्हणा, अशा विविध माध्यमातून आम्ही कार्य करतो. कसबा गणपती मंडळाची विद्यार्थी दत्तक योजना देखील आहे. पाचवी ते बारावी पर्यंतच्या विध्यार्थांसाठी ती योजना आहे. रक्त दान शिबिरं गेली ८-१० वर्षापासून घेतली जातात. हा पहिला मानाचा गणपती आहे की ज्यानी सार्वजनिकरीत्या पहिल्यांदा 'हिंदु नववर्ष दिन' साजरा करण्याचं ठरवलं. आणखी एक वैशिष्टय म्हणजे आम्ही महिला दिन सुद्धा साजरा करतो.

ह्या वर्षी श्रीं ची प्राण-प्रतिष्ठापणा ही विजयजी भटकर (परम संगणककार) यांच्या हस्ते होणार आहे. तसेच पुण्यनगरीच्या नावलौकिकात भर घालणार्याा ५ मान्यवरांना 'श्री कसबा गणपती पुरस्कार' विजयजी भटकर यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. यंदा सर्वश्री कॉटन किंग चे प्रदिप मराठे, सनई वादनकार ज्यांनी सनई वादना मध्ये पि. एच. डी. संपादीत केलेले प्रमोद गायकवाड, एव्हरेस्ट सर करणारे (गिरीप्रेमी) अरुण झिमझिमे, सामाजिक कार्यकर्ते संजय नाहर आणि पाचवे खडीवाले वैद्य यांनाही हा पुरस्कार देण्यात येईल. यावर्षी मंडळातर्फे देखावा म्हणून कलादिग्दर्शक श्री. गिरीश कोळपकर यांच्या सादरीकरणातून 'मेघ नंबरी मध्ये गणेश महाल' सादर केला आहे. मात्र मागील वर्षापासुन खड्डे विरहीत मांडव आम्ही उभा करतो. आणखी एक म्हणजे आम्ही देखाव्या मध्ये नेहमी ज्वलंत विषय मांडतो त्याचप्रमाणे यंदा आम्ही "स्त्री भ्रुणहत्या" हा विषय निवडला आहे.

शहरात गणपती स्थापनेच्या काळात ध्वनिप्रक्षेपणास बंदी असल्या कारणाने आम्ही गणपती विसर्जना नंतर तीन दिवस संगीत महोत्सव सुद्धा साजरा करतो. कसबा गणपती हा खाद्यावरच्या पालखीतुनच आणला जातो हे या गणपतीचे विशेष आहे. या मुर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे सिंहासनावर गणपती विराजमान आहेत. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष भरत राठोड यांनी दिली.

स्नेहा मुथा