Sign In New user? Start here.

Modak and Churma ladoo Recipes

     
   
       
 
 
 
     
 
 
 
       
     
 

कवयित्री संगीता जोशी यांच्या 'प्रथमेशा' अल्बममधील गाणी...

 
     
     
 
ganpati modak karji
 
उकडीचे मोदक

साहित्य

४ वाट्या किसलेला ओला नारळ
२ वाट्या कुटलेला अथवा किसलेला गुळ
१/२ चमचा वेलदोडे पुड अथवा जायफळ पुड
३ वाट्या तांदुळाचे पीठ
३ कप पाणी
३ चमचे लोणी
१/२ चमचा मीठ

कृती

एका भांड्यात खोवलेला ओला नारळ, गुळ, वेलदोडे पुड अथवा जायफळ पुड एकत्र करा व ते मिश्रण बर्याापैकी कोरडे व मोकळे होई पर्यंत गरम करा व नंतर बाजुला ठेवा. हे मिश्रण गरम होई पर्यंत , दुसर्याव बाजुला एका भांड्यात पाणी गरम करा. त्या पाण्यात चिमुटभर मीठ आणी थोडेसे लोणी टाका. हळुहळू त्या पाण्यात तांदुळाचे पीठ सोडा व ढवळत रहा. पीठ सोडत असताना पीठाच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. दहा मिनीटे भांड्यावर झाकण ठेऊन मंद आचेवर गरम होऊ द्या.

ही उकड गरम असतानाच चांगली मळुन घ्या. मळताना हाताला थोडेसे तेल लावा म्हणजे उकड हाताला चिकटणार नाही. उकड मळुन झाल्यावर लिंबा एवढे गोळे करा व गोळे पुरीच्या आकारात लाटा किंवा हातावर सपाट करा. नारळ आणी गुळाचे मिश्रण उकडीत भरा. उकड भरुन झाल्यावर सर्व बाजुने बंद करा व मोदक टोकदार करा. मोदक तयार झाल्यावर एका भांड्यात पाणी ते भांडे गॅस वर ठेवा. त्या भांड्यावर चाळणी अथवा पातळ सुती कापड ठेवा. त्या चाळणीत अथवा कापडावर मोदक ठेऊन चाळणी अथवा कापड झाका. २० मिनीटे मोदक वाफेवर उकडुन घ्या. ही क्रिया तुम्ही ईडली पात्रात सुध्दा करू शकता.