Sign In New user? Start here.

तांबडी जोगेश्वरी

 

उपेंद्र लिमये

खरंतर माझ्याकडे आता गणपती बसत नाही. तरीही श्री गणेशा सोबत असलेलं नातं तूटत नसतं Read More..

 

अमॄता सुभाष

माझ्या सासुरवाडीला खूप चांगला गणेशोत्सव साजरा केला जातो. मेघना कुलकर्णी या माझ्या Read More..

 

सिद्धार्थ चांदेकर

आमच्याकडे गणेशोत्सवाची एक चांगली गंमत आहे ती म्हणजे आमच्या परिवारातील चौघाही Read More..

 

शर्वरी जमेनिस

खरंतर मी लहान असताना माझे बाबा भारताबाहेर त्यांच्या कामासाठी निघून गेले होते. Read More..

     
 

कवयित्री संगीता जोशी यांच्या 'प्रथमेशा' अल्बममधील गाणी...

 
     

     
 
 
     
   
       

तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. इतर पाच मंडळांसह या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकीत मानाचे स्थान आहे. श्री तांबडी जागेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता आहे. हा मानाचा दुसरा गणपती आहे. येथील गणेशोत्सवाला १८९३ पासून प्रारंभ झाला. या गणपतीच्या मूर्तीचे दरवर्षी विसर्जन केले जाते. त्यानंतर नवीन मूतीर्ची स्थापना करण्यात येते. विसर्जन मिरवणुकीत श्रींची मूर्ती चांदीच्या पालखीमध्ये असते. कसबा गणपती व तांबडी जोगेश्वरी ही ग्रामदेवता म्हणून ओळखली जाते. म्हणून ह्यास मानाचा पहिला व दुसरा असे स्थान देण्यात आले आहे. यंदा या मंडळाचा गणपती १२० व्या वर्षात पदार्पण करत आहे.

आमच्या येथील गणपती हा १२० वर्षापासून गोविंदकर घराण्यात बनतो. यावर्षीचा गणपती हा या घराण्यातील चौथ्या पिढीच्या कलाकाराने तयार केली आहे. ह्या मुर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मुर्ती हाताने रचली जाते. त्याचा कुठलाही साचा नाही. ही मुर्ती ३३ इंच उंच असते. आणि विशेष म्हणजे गणपती पालखीत असतो. अशी माहिती मंडळाचे विश्वस्थ कार्यकर्ते विश्वास गाडगीळ यांनी दिली.

ही मुर्ती कायमस्वरुपी नसून मंडळाचा गणपती हा दर वर्षी विसर्जीत केला जातो. मात्र दर वर्षीच्या मुर्तीत एवढी सदृष्यता आहे की एकच मुर्ती नेहमी ठेवल्याप्रमाणे भासते. पुण्यातील गणपती विसर्जनातील ढोल ताशे पथक हा नेहमीच कुतूहलाचा विषय... कोणत्या मानाच्या गणपती समोर कोणतं ढोल ताशे पथक वाजवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं आणि या गोष्टीला वेगळच महत्व सुद्धा असतं. यंदाच्या वर्षी आमच्याकडे 'शिवमुद्रा' हे ढोल पथक वाजवणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमात यंदा नेहमी प्रमाणे अथर्वष्याचे पठण केले जाते. मंडळाच्या परीसरातील प्रतिष्ठीत लोकांच्या हस्ते त्रिकाल पुजा केली जाते. अशी माहिती मंडळाचे विश्वस्थ कार्यकर्ते विश्वास गाडगीळ यांनी दिली.

स्नेहा मुथा