Sign In New user? Start here.

तुळशीबाग


 
 
सोनाली कुलकर्णी
सोनाली कुलकर्णी
सुबोध भावे
प्रसाद ओक
संतोष जुवेकर
अमॄता खानविलकर
अमॄता सुभाष
भुषण प्रधान
चिन्मय मान्डलेकर
शर्वरी जेमिनीस
श्रृती मराठे
सिद्धार्थ चांदेकर
सुशांत शेलार
तेजस्विनी पंडीत
उपेंद्र लिमये
विभावरी देशपांडे
सुजय डहाके
 
     
 
 
 
       
     
 

कवयित्री संगीता जोशी यांच्या ‘प्रथमेशा’ अल्बममधील गाणी...

 
     
     
 
 

तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळच्या गणपतीची सन १९०१ या वर्षी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत स्थापना करण्यात आली. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींमध्ये हा मानाचा चौथा गणपती आहे. तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या वर्षी ११२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मी स्वतः सन १९३८ सालापासून एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय याचा मला खूप आनंद होतोय. गणपतीसमोर आपली सेवा रुजू करीत पुढे गणपतीची आरास वेगळी व विषयानुसार वास्तववादी असावी म्हणून १९५२ साली जी मूर्ती केली ती हलती व वास्तववादी होती. त्याचे खूप कौतुक झाले व नंतर उत्सवाचे स्वरूप धार्मिक व सांस्कृतिक होत गेले. सजावटीची प्रथा सुरु झाली. पौराणिक देखावे असलेल्या मूर्ती तयार झाल्या. यशोदा कृष्ण - विश्व दर्शन, अंगद शिष्टाई, नृसिंह अवतार, बराह अवतार, किचक वध, विश्वामित्र तपोभंग, गोकर्ण महाबळेश्वर असे कितीतरी भव्य दिव्य देखावे केले. महाराष्ट्रातील गणपती उत्सवात हा मानाचा ४ था गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. ११ फूट उंचीच्या या बैठी मूर्तीवर चांदीचे लाखो रुपयांचे अलंकार आहेत. यंदा हा गणपती सबंध चांदीचा झाला आहे. मुर्तीच्या अंगावर जवळ-जवळ ३०-४० किलो चांदी आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रा. डी. एस. खटावकर यांनी दिली.

ते पुढे सांगतात की, मी १९६३ मध्ये पुण्याच्या भारतीय अभिनव कला प्रसारिणी या संस्थेच्या अभिनव कला विद्यालयात सुमारे २९ वर्ष कला प्राध्यापकाचे काम करुन १९८९ साली निवृत्त झालो. महाराष्ट्रातील सुमारे १५० कला विद्यालयात कला निरीक्षक म्हणून मला काम मिळाले. हे सर्व काम साभांळून मी माझा छंद जोपासायचो. जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा मी अहोरात्र मेहनत करुन सजावट करायचो. “मनुष्याजवळ ज्यावेळी काहीच नसतं, तेव्हा तो काहीतरी करण्यासाठी हलचाल करतो आणि ते कसं मिळवायच ते बघतो.” मी श्रींमत दगडुशेठ हलवाई गणपतीच्या परीक्षण मंडळात काम करायचो. पुण्यात लहान-मोठे जवळपास तीन हजार मंडळे आहेत. यातील २००-३०० मंडळं आम्ही बघतो. त्याच्या कार्यासाठी आम्ही त्यांना लाखो रुपयाचे बक्षीस वाटप करतो. यंदा च्या वर्षी आम्ही शुक्रवार पेठेच्या “सेवा मित्र मंडळा”स एक लाख रुपयाचे बक्षीस देणार आहोत. “चिमन्या गणपतीला” प्रदुषण मुक्त विषयावर देखावा सादर करणा-या मंडळास आम्ही एक लाख रुपये रोख बक्षीस वाटप करणार आहोत. अशीही माहीती त्यानी दिली. या स्पर्धामध्ये पुण्यातील मोठे गणपती भाग घेत नाहीत. ते नुसती आरास करतात धार्मिक विधी पार पाडतात. ही सभ्यता पुण्यात आहे.

मी लोकाना कलेची दृष्टी दिली. कला काय आहे हे लोकांच्या समोर मांडली आणि सामान्य माणसाला सुद्धा कलेचं रुप समाजायला लागलं. आज साधा हातगाडीवाला त्याने सुद्धा आपली कलाकृती पाहिली की दोन्ही हात जोडायचे अन नमस्कार करावा एवढी सुबकता या कलेत आहे. माझे गुरु बाबासाहेब पुंरदरे यांच्यासोबत लहानपणापासुन मी काम केले. ते म्हणायचे की “पंत आपण वेड लागेपर्यंत काम केलं पाहीजे जेव्हा तुम्हाला परीपुर्णपणे वेड लागेल, तेव्हाच इतिहास घडतो’. हे लक्षात ठेवा असं ते म्हणत. आणि मी ते वाक्य लक्षात ठेऊनच आज यश संपादन करु शकलो. आजपर्यंत माझ्या हाताखाली अनेक मोठे मोठे कलाकार, शिल्पकार, चित्रकार माझ्या तालीमीत तयार झाले. त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. मी जी नवीन माध्यम निर्माण केली ती लोकापर्यंत पोहचवण्याचं कार्य मी यशस्वीरीत्या करु शकलो. याचा मला फार आंनद आहे. आणि या आनंदातच मी जगणं पंसद करतो.

स्नेहा मुथा