Sign In New user? Start here.


आदिनाथ कोठारे-उर्मिला कानेटकर-कोठारे

आमच्यासाठी प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन डे


   - मराठी इंडस्ट्रीला मिळालेले दोन नवीन चेहरे म्हणजे अभिनेता आदिनाथ कोठारे आणि त्याची पत्नी अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे हे दोघेही नुकतेच लग्नाच्या निर्मळ आणि पवित्र बंधनात बांधले गेलेत. जरी ते दोघेही एकत्र आले असतील पण दोघेही चित्रपटांच्या शूटींगमध्ये खुप बिझी आहेत. मात्र अशातच व्हॅलेंटाईन साठी ते कसा वेळ काढतात, कशा पद्धतीने व्हॅलेंटाईन साजरा करतात किंवा ते लग्नाआधी कसा साजरा करायचे, शूटींगमधे दोघेही बिझी असूनही ऎकमेकांसाठी ते काय प्लॅन करताहेत, अशा काही रोमॅंटिक गप्पा दोघांनीही आमच्याशी शेअर केल्यात....

   व्हॅलेंटाईन डे बद्दल बोलतांना दोघेही सांगतात की, " व्हॅलेंटाईन डे हा आपलं प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असून जगात खुप काही वाईट चालू आहे. त्यांनाही प्रेमाचा संदेश या दिवसाच्या माध्यमातून देता येईल. 'Its a golden day'. खरंतर आपल्या आयुष्यात आपण व्हॅलेंटाईन डे कधीही साजरा करू शकतो. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी १४ फेब्रुवारीची गरज नाहीये. पण हा डे साजरा करण्याबद्दल आमचा विरोध वगैरे नाहीये". असंच काहीसं उत्तर उर्मिलाने सुद्धा दिलं. "I don't belive in one as valentine day!". इतर लोकं या दिवसाचं सेलिब्रेशन करतात म्हणून आम्हालाही कधी कधी वाटायचं. पण Not in rule' की, हा दिवस साजरा करण्यासाठी बसुन खुप काही प्लॅनिंग केलंय. जसा आपण मदर्स डे, फादर्स डे साजरा करतो, तसाच हा एक दिवस सुद्धा साजरा करण्यात काहीच हरकत नाहीये. १४ फेब्रुवारी ऎवजी मला १७ फेब्रुवारीला काही करावं वाटेल आदिनाथसाठी...असं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी एक दिवसच का निवडायचा?".


   लग्नाआधी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याबद्दल आदिनाथ सांगतो. "लग्नाआधी रोजच आमचा व्हॅलेंटाईन डे असायचा आणि आजही तसंच आम्ही व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी १४ फेब्रुवारीची वाट बघत नाही. जेव्हा आम्ही एकत्र असतो, जेव्हा आम्हाला सुट्टी असते तोच आमच्यासाठी व्हॅलेंटाईन डे असतो. एरवी आम्ही सोबत तेव्हाही आम्ही एन्जॉय करतच असतो. शिवाय मला नाही आठ्वत की, उर्मिलाने कधी या दिवसाला घेऊन काही अपेक्षा केल्या असतील".

   लग्नानंतरचा पहिलाच व्हॅलेंटाईन डे असल्याने काही खास प्लॅन करणार का? यावर उर्मिला म्हणते" लग्नानंतरचा पहिलाच व्हॅलेंटाईन डे असल्याने कदाचित आम्ही तो कुठे बाहेर जाण्यासाठी राखीव ठेवू. पण हे काही अजून ठरलेलं नाहीये. सध्या आम्ही दोघेही शूटींगमध्ये खुप बिझी आहोत. शिवाय या विषयावर अजून आमचं बोलणं सुद्धा झालेलं नाहीये. तसंही आम्ही आधीच काही प्लॅन करून ठेवत नाही. जे काही ठरतं ते आधल्या दिवशी ठरतं. तेही वेळ मिळाला तरंच...!".

   अमित इंगोले

Romantic Song