Sign In New user? Start here.

लग्नाच्या पहिल्या अ‍ॅनिव्हर्सरीचं अट्रॅक्शन


उमेश प्रिया

लग्नाच्या पहिल्या अ‍ॅनिव्हर्सरीचं अट्रॅक्शन


   रंगभूमी, मालिका आणि चित्रपटांतील एक लोकप्रिय अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट-कामत यांचं नुकतंच लग्न झालं. मराठी मनोरंजन विश्वातील एक यशस्वी ऑन स्क्रिन-ऑफ स्क्रिन जोडी...प्रेमी युगुलांबरोबरच प्रत्येक नवीन जोडीलाही व्हॅलेंटाईन डेचं आकर्षण असतंच..मात्र उमेश आणि प्रियाच्या बाबतीत तसं नाहीये..त्यांना व्हॅलेंटाईन डे पेक्षा त्यांच्या लग्नाच्या पहिल्या अ‍ॅनिव्हर्सरीचं जास्त अट्रॅक्शन वाटतंय.

   गप्पांना सुरवात झाली ती व्हॅलेंटाईन डेबद्द्ल दोघांनाही काय वाटतं यावरून. " खरंतर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी वर्षातील एक दिवस का निवडायचा हा प्रश्न मला पडतो. मला वाटतं ३६५ दिवसही आपण आपल्या व्हॅलेंटाईन बरोबर प्रेम व्यक्त करू शकतो. मुळात आम्ही कधी व्हॅलेंटाईन डे साजरा केला नाहीये". प्रियाही असंच काहीसं बोलली. "अ‍ॅक्च्युअली व्हॅलेंटाईन डे कधी साजरा करावा वाटलं नाहीच...मी उमेशला खुप वर्षांपासून ओळखते. शाळेत असतांना असा कधी विचारही कधी केला नव्हता की, आपला कुणी व्हॅलेंटाईन असेल...पण डेफीनेटली एक गोष्ट होती. ती म्हणजे मी आणि माझी मैत्रीण आम्ही शाळेत असतांना या दिवशी सकाळी उठल्या उठल्या आपापल्या आयांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा द्यायचो आणि आमचे आई-बाबा आम्हाला गिफ्ट सुद्धा द्यायचे. व्हॅलेंटाईन म्हणजे फक्त आपला प्रियकर किंवा प्रेयसी एवढंच नसून सर्वच प्रिय व्यक्तींना आपण या दिवशी शुभेच्छा देऊ शकतो".


   इतरांसारखा आपणही हा व्हॅलेंटाईन डे साजरा करावा असं वाटलं नाही का कधी? "You know every day spent with umesh is a valentine day!". जेव्हा जेव्हा आम्ही भेटलो, तेव्हा ते Special आहे म्हणून आम्ही भेटलो. त्यामुळे माझ्या काहीच अपेक्षा नाहीये. त्यात उमेशने काही प्लॅन केलं असेल तर मला माहिती नाही". यावर उमेशचं उत्तर, "प्रिया मला चांगली ओळखते. तिनेही कधी अशी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची अपेक्षा केली नाही. जर काही अपेक्षा असेलच तर याच व्हॅलेंटाईन डेला आम्ही सोबत नाटकाचा प्रयोग करतोय. मला वाटतं हेच तिच्यासाठी या व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट असेल", असं प्रिया सांगते.

   लग्नानंतर कोणत्या डेजचं जास्त अट्रॅक्शन वाटतं? यावर प्रिया म्हणते."व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट कसा करणार यापेक्षा मला आमच्या लग्नाच्या पहिल्या अ‍ॅनिव्हर्सरीचं जास्त अट्रॅक्शन आहे. लग्नानंतर हाच एक दिवस आहे ज्याकडे मी डोळे लावून बसले आहे. कदाचित त्याचं प्लॅनिंग मी जोरदार करेन".

   अमित इंगोले

Romantic Song