मी त्यांच्या प्रश्नाने गारच झालो! खुद्द गुलाम अलि आपल्याला त्यांची खाजगी तालीम पहायला बोलवताहेत यावर माझा विश्वास बसेना. माझ्यासाठी या घडामोडी स्वप्नवत होत्या. मी होकारार्थी मान डोलावली. त्यांनी दुपारी साडे चारला मला बोलावलं. मी ही आनंदाची बातमी माझ्या आई वडिलांना आणि भावाला कळवली. त्या दिवशी मी साडे चार वाजायची जशी वाट पाहिली आहे, तशी मी पुन्हा कधीही पाहिली नाही! शेवटी एकदाचे साडे चार वाजले आणि मी आणि विशाल, माझा भाऊ, आम्ही गुलाम अलिंच्या हॉटेलमध्ये त्यांच्या खोलीवर जाऊन थडकलो. खोलीचं दार बंद होतं. मी बिचकतच दारावरची बेल वाजवली. २ मिनिटं गेली पण दार कुणीच उघडलं नाही. मी आणि विशाल एकमेकांकडे पाहत राहिलो. पुन्हा एकदा बेल वाजवावी का या विवंचनेत आम्ही असतांनाच दार उघडलं. गुलाम अलि झोपेतच होते. आम्हाला ओशाळल्यासारखं झालं. आम्ही ‘सॉरी, सॉरी’ असं काही पुटपुटलो. ते म्हणाले की थकले असल्यामुळे त्यांना जरा जास्त झोप लागली. त्यांनी आम्हाला अर्ध्या तासाने पुन्हा यायला सांगितलं. आम्ही अर्ध्या तासानं पुन्हा वर गेलो. तेव्हा त्यांचे वादकही जमले होते. दिलरूबा वाजवणारे दिल्लीहून आले होते, तबलजी मुंबईचा होता. तो प्रथमच गुलाम अलिंसोबत वाजवत असल्यामुळे त्या खोलीत असलेल्या लोकांमध्ये, तो माझ्यापेक्षाही अधिक नर्व्हस होता! मला फार उत्सुकता लागून राहिली होती की गुलाम अलि रिहर्सल कशी करत असतील. कारण ते प्रत्येक मैफलीत एकच गजल किती वेगवेगळ्या पध्दतीने आणि बारकाव्यांसकट सादर करतात हे ठाऊक होतं. त्यांच्या ‘चुपके चुपके’ या गाण्याचं सतराहून अधिक मैफिलीतलं ध्वनिमुद्रण माझ्याकडे होतं आणि त्या सतराच्या सतरा ध्वनिमुद्रणांमध्ये गाणं तेच असलं तरी त्यांनी ते पूर्णपणे वेगळ्या जागा घेऊन सादर केलं होतं. तेव्हां मी पुढे संगीतकार होईन असा मला पुसटसा अंदाजही नव्हता. पण गुलाम अलिंच्या चालींचं आणि सादरीकरणाचं, एवढंच नव्हे तर त्यांच्या पेटीवादनाचंही मला आकर्षण आणि त्याबद्दल कुतुहल होतं.
गुलाम अलिंनी फक्त काही गजलांचे मत्ले त्या तबलजीला ऎकवले. कधी एखादा शेर. तबलजीने चांगला ठेका धरला की ते कौतुकाने माझ्याकडे पाहत. मला उत्सुकता मी आणि विशाल दोघेही त्यांची तालीम ऎकण्यात इतके रंगून गेलो की एक तास कसा गेला ते आमच्या लक्षातच आलं नाही.
‘तो कैसी लगी आपको हमारी रिहर्सल?" गुलाम अलिंनी आम्हाला प्रश्न टाकला. आम्ही नुसतंच मानेने दर्शवलं. खरं तर मी खूपच हरखून गेलो होतो. इतक्या जवळून रिहर्सल पाहणं हा माझ्यासाठी अभूतपूर्व योग होता. मग त्यांनी रिहर्सल आटोपती घेतली. आम्हीही आमच्या हॉटेलवर परतलो. आता वेध लागले होते ते रात्रीच्या कार्यक्रमाचे!
कार्यक्रम गोगटेंच्या घराच्या अंगणात होता. डिसेंबर-जानेवारीचे दिवस होते. थंडीचे दिवस. आकाश तारकांनी भरलेलं होतं. वातावरण भारलेलं होतं. गुलाम अलि रंगमंचावर आसनस्थ झाले. कार्यक्रमाची सुरवात त्यांनी एका ठुमरीने केली. ठुमरी झाल्यावर त्यांच्या पेटीतून यमन कल्याणचे सूर निघाले आणि दुसरीच गजल ते गायले - ‘आ गयी यास शाम ढलते ही!’ माझी फर्माईश! मी चौथ्याच रांगेत बसलो होतो. गुलाम अलि माझ्याकडे पाहून पुन्हा हसले. त्यानंतरचे अडीच तास हे एका वेगळ्याच, रम्य दुनियेत ते आम्हाला सफरीला घेऊन गेले. ‘चुपके चुपके रातदिन ऑंसू बहाना याद है’ सारख्या ओळखीच्या गजलपासून ‘देखना भी तो उन्हें दूर से देखा करना’ सारख्या अनवट गजलांपर्यंत ते आपल्या पोतडीतून चिजा काढतच होते! त्यांची पोतडी म्हणजे त्यांची डायरी ज्यात त्यांनी गाणी लिहून घेतली होती. ‘पारा पारा हुआ पैराहने जॉं’ ही त्यांची अतिशय कठीण पण अप्रतिम आणि त्यावेळी फारशी प्रचलित नसलेली अशी गजल ते गात असतांना वा-याची झुळुक आली आणि डायरीची पानं फडफडली आणि उलटली. आणि नेमका पुढचा शेर गात असतांना त्याचा दुसरा मिस्रा ते विसरले. ‘ना ना...ला..ला...’ मध्ये गुणगुणू लागले. पण मला ती गजल पाठ असल्यामुळे मी चटकन उठून उभा राहिलो आणि दुसरा मिस्रा त्यांना सांगितला. लोकांच्याही नजरा माझ्याकडे कौतुकाने वळल्या.
गुलाम अलिंनी मला स्टेजवरूनच आदाब केलं आणि पुढची गजल गायले. मला आजही तो शेर लक्षात आहे.
कोई आहट, न इशारा, न सराब,
कैसा वीरॉं है ये दश्ते इम्कॉं..
गजलांच्या राज्यात रात्रीचे सव्वा दोन कधी वाजले हे कळलं नाही. कार्यक्रमाचा शेवट जवळ येऊ लागला. गुलाम अलिही दिवसभराच्या प्रवासाने थकले होते. एक शेवटची फर्माईश ते घेतील असं त्यांनी जाहीर केलं. मला आठवतंय, पहिल्या रांगेत भारती आचरेकर, वंदना गुप्ते आणि राणी वर्मा बसल्या होत्या. त्यांनी तिघींनीही एकत्रच ‘पता लगा मैंनू हुदी की जुदाई’ या पंजाबी गीताची फर्माईश केली आणि त्याच वेळी मी उठून ‘दिल मी इक लहर सी उठी है अभी’ या गजलची फर्माईश केली. या गजलेमध्ये गुलाम अलि - ‘लहर’ हा शब्द खूप वेगवेगळ्या त-हेने रंगवून म्हणायचे आणि त्याचं मला फार आकर्षण होतं. नासिर काज्मींची फार अप्रतीम अशी गजल आहे. पण माझा आवाज बहुतेक नंतर पोहचला आणि त्यांनी ‘पता लगा मैंनू हुदी की जुदाई’ हे गीत सुरू केलं. ते संपलं तशी त्यांनी हार्मोनियम बंद केली. मग त्यांची दॄष्टी माझ्यावर पडली आणि काय आश्चर्य!! त्यांनी त्यांची हार्मोनियम पुन्हा उघडली! मग ते म्हणाले -
"ये बच्चा मुझसे और मेरे मौसिकी से बहुत प्यार करता है, और जो संगीत से प्यार करता है, उसका दिल दुखाना नहीं चाहिये!" असं म्हणत त्यांनी ‘दिल में इक लहर सी उठी है अभी’ ही गजल तब्बल पाऊण तास रंगवून गायली! मला कॄतार्थ वाटलं! आजही त्या मैफलीच्या आठवणीने अंगावर शहारा येतो.
दोन वर्षांपूर्वी पुन्हा गुलाम अलिंचं गाणं एका खाजगी बैठकीच ऎकण्याचा योग आला. त्यांचा आवाज आता त्यांच्या विचाराला साथ देत नाही पण अजूनही पेटीवर बोटं अशी फिरतात की त्याला तोड नाही. ते सूर अशा ठिकाणी जातात जिथे आपली कल्पनाही जात नाही! योगायोगाची गोष्ट अशी की त्या मैफिलीतही त्यांच्या बरोबर दिलरूबावर तेच वादक होते हे बेळगांवला होते आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्यांनी मला ओळखलं!
गुलाम अलि फॉर्म मध्ये असतांना इतकं जवळून त्यांचं गाणं ऎकता आलं की मला भाग्याची गोष्ट वाटते. कधी कधी वाटतं की फाळणी झाली नसती तर क्रिकेट, हॉकी आणि गाणं या ती प्रांतात आपण जगात सर्वात श्रीमंत असतो.
कौशल इनामदार
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
चाल करतांना याकडे विशेष लक्ष दिलं की निरागसपणा आणि साधेपणा ठेऊनसुद्धा चालीत उथळ सोपेपणा वाटणार नाही. वाद्यमेळामध्ये सुद्धा ‘बेल्स’चा उपयोग केला. Read More...
मराठी चित्रपट आणि भावगीतांमध्ये प्रेमाच्या वेगवेगळ्या विभ्रमांना जे स्थान आहे, कदाचित तेच स्थान निसर्गाला आहे. अनेक निसर्गगीतं आपल्या परिचयाची आहेत. ब-याच निसर्गगीतांमध्ये निसर्ग हा मानवी भावनांसाठी रूपक म्हणून वापरल्याचं आपल्याला आढळतं. निसर्गाच्या रूपकांमधून मानवी संबंधांचा व्यवहार काव्यात्म पद्धतीने मांडलेला दिसतो. Read More...
संगीतक्षेत्रात मी पाऊल ठेवलं तेव्हां वेगवेगळ्या निमित्ताने अनेक दिग्गज कलाकारांच्या भेटीचा योग आला. हे सगळेच थोर कलावंत होते पण क्वचितच एखादा कलावंत मला समाधानी दिसला. बहुतेकजण अतृप्त, बेचैन... सुरुवातीला मला या दृश्याची भीति वाटायची. इतकी वर्ष काम करून... Read More...
८४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनाचा प्रारंभ मराठी अभिमानगीताने होणार असल्याची बातमी प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाली. आणि पुन्हा एकदा यूट्यूबवर असलेल्या मराठी अभिमानगीताकडे लोकांचा ओघ वाढला. मराठी लोकांचा या गीताला भरभरून प्रतिसाद मिळाला. कौतुकाचा वर्षाव जसा या गीतावर झाला तसेच काही प्रश्नही उपस्थित केले गेले. Read More...
प्रभात फिल्म कंपनीचा पहिला बोलपट करायचा ठरला तेव्हा संगीतकार गोविंदराव टेंबे यांनी माझे आजोबा, शंकरराव बिनीवाले यांना या चित्रपटासाठी व्हायोलिन वाजवण्याकरता बोलावून घेतले..... Read More...
प्रभात फिल्म कंपनीचा पहिला बोलपट करायचा ठरला तेव्हा संगीतकार गोविंदराव टेंबे यांनी माझे आजोबा, शंकरराव बिनीवाले यांना या चित्रपटासाठी व्हायोलिन वाजवण्याकरता बोलावून घेतले..... Read More...
नागपूरला एका कार्यक्रमानिमित्त जाण्याचा योग आला होता. रेणुका देशकर यांनी तीन वेगवेगळया क्षेत्रातील व्यक्तींच्या मुलाखतींचा कार्यक्रम आखला होता. Read More...
लागले मन परतीच्या वाटेवरती मराठी अभिमान गीत प्रकाशित झाल्यानंतर त्यावर कौतुकाचा वर्षाव झाला आणि तो अखंडित सुरू आहे. किंबहुना वाढतोय. अगदी कविवर्य शंकर वैद्यांपासून संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे यांच्यापर्यंत, लोकसत्तेचे संपादक कुमार केतकर ते जाहिरात क्षेत्रातले तज्ज्ञ प्रशांत गोडबोले यांच्यापर्यंत, Read More...
आपल्याला पाय आहेत ही जाणीव आपल्याला सर्वात अधिक कधी होते? खूप चालून पाय दुखू लागले की जशी पायांच्या अस्तित्त्वाची आपल्याला जाणीव होते तशी एरवी कधीच होत नाही! पडसं झालं की नाकाच्या अस्तित्त्वाची जाणीव, बोट चिमटलं की बोटाच्या अस्तित्त्वाची जाणीव! तसंच जेव्हां माझी अस्मिता दुखावली गेली तेव्हां मी एक मराठी माणूस, एक मराठी संगीतकार असल्याची जाणीव मला झाली.... Read More...
मी पहिल्यांदा ना.धों.महानोरांना भेटलो, ते १२ वर्षांआधी श्री.रामदास भटकळ यांच्या घरी. तेव्हा माझा ‘रात्र भिजली’ हा दुसरा अल्बम बाजारात आला होता. त्यावेळी रामदासजी यांच्या घरी आम्ही जमलो होतो.... Read More...
मी ‘अजिंठा’ लेण्यांबद्दल सर्वात आधी १९९४ साली ऐकलं. एक महान पटकथाकार, दिग्दर्शक स्व. चेतन दातार यांच्या प्रयत्नाने मी नाट्यक्षेत्रात पदार्पण केलं. Read More...
On the 10th of July, I had a programme in Nagpur. Renuka Deshkar, the compere from Nagpur interviewed three personalities from various fields. Rani Bang, the famous social worker, Devendra Phadnavis, the young BJP MLA from Nagpur and I were the three judges. Nitin Dada had planned a trip to Ajintha on the 12th of July. On the 11th of July I took a cab from Nagpur to Ajintha. It was an Innova and it was booked for me by Shri Mhaisalkar of the Vidarbha Sahitya Parishad, whose library I had gone to see that morning.
I started in the evening with a halt at one of my relatives' places in Nagpur and reached Ajintha at 2:30 AM. Mandar Joshi was asleep in the room and I too slipped into the bed as I was dead tired after the hectic travel.
We got up in the morning and were joined by Na. Dho. who took us to the Ajintha caves. Imagine having the poet himself as a guide to the scenario in which the story of the film takes place. We were also joined by producer-actor, Trupti Bhoir.
Ajintha has been declared as a world heritage sight. No vehicles are allowed to the foothills of the caves except those buses approved by Maharashtra Tourism. So we all took a bus and reached the foothills of the caves. There was an uphill walk after that but when the caves were revealed to us, it was nothing short of breathtaking!
The Waghura river was subdued, but Mahanor assured us that by September the river would start roaring like a Tigress!
We went inside the first cave and I was so mesmerised by the sculptures and the temperas that it did not occur to me to click pictures of the place. Anyway, I have reached the conclusion, that photographs reveal not even a fragment of what the mind clicks!
I remember having spent a quiet time in each of the caves, trying to listen to the silence inside. The feeling seems surreal and also bears the risk of sounding pretentious... but after a while I could hear the caves sing. Whether it was the caves or was it my heart responding to the silence, I don't know, but there was music in there. Take one look at the picture and you can see why Mahanor begins the poetry with Dolyanna dasale pahaad ithale (डोळ्यांना डसले पहाड इथले). Literal translation of which would be - The mountains here stung the eyes. Mostly, the music comes from the verbs - that word डसले (stung) got to me and that is how faint waves of music slowly started approaching. It is always a word or an image that gets me started on to a tune. Making music is actually a translation of what is perceived by the senses. I know that sounds like a quote by somebody else, but I just made it up.
Actually, the landscape where the caves are located is an inspiration in itself. The Waghura carries with it an atmosphere and your heart starts flowing in it. On the one hand Nature with its impeccable beauty and on the other the caves representing the human power to turn Nature more beautiful makes you surrender. You stop thinking of yourself as a creator and you just want to be part of Existence. You want to drink in the present moment and you want it to last as long as eternity.
While the assistants of Nitin Dada kept clicking unlimited photos of the caves for their research work I was trying to feel the atmosphere in the caves and also think of what music I remembered on seeing each picture and each sculpture.
The obvious music that I recollected was from films based on the Buddha era or the Buddhist philosophy. The song that stuck in my mind was Man re tu kaahe na dheer dhare.
We had lunch at the foothills of Ajintha and then spent some time at the curio shop where the smart salesman sold us a lot of stuff.
At night over dinner, at the MTDC resort where we had stayed, Mahanor recited the songs from Ajintha in his own imitable style. I recorded them in my mobile phone. When a poet sings his own poem, the music composer feels that this is the inevitable tune!
We retired to bed after the poetry session, but Mahanor's recitation kept ringing in my ears. I wondered - If the poet's tune continue to haunt me, how am I going to compose my own?
www.zagmag.net or www.Bombilfryday.com
लागले मन परतीच्या वाटेवरती मराठी अभिमान गीत प्रकाशित झाल्यानंतर त्यावर कौतुकाचा वर्षाव झाला आणि तो अखंडित सुरू आहे. किंबहुना वाढतोय. अगदी कविवर्य शंकर वैद्यांपासून संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे यांच्यापर्यंत, लोकसत्तेचे संपादक कुमार केतकर ते जाहिरात क्षेत्रातले तज्ज्ञ प्रशांत गोडबोले यांच्यापर्यंत,
Read More...
आपल्याला पाय आहेत ही जाणीव आपल्याला सर्वात अधिक कधी होते? खूप चालून पाय दुखू लागले की जशी पायांच्या अस्तित्त्वाची आपल्याला जाणीव होते तशी एरवी कधीच होत नाही! पडसं झालं की नाकाच्या अस्तित्त्वाची जाणीव, बोट चिमटलं की बोटाच्या अस्तित्त्वाची जाणीव! तसंच जेव्हां माझी अस्मिता दुखावली गेली तेव्हां मी एक मराठी माणूस, एक मराठी संगीतकार असल्याची जाणीव मला झाली....
Read More...
I first heard of AJINTHA in the year 1994. I was initiated into theatre by Late Chetan Datar, the prolific playwright and director and it was a time I was bursting with opinions.
Read More...
अतिशय ओघवती भाषा व कमालीचे जिव्हाळ्याचे लिहिणे.वाटत होत तू समोर बसून त्या मैफिलीची गोष्ट सांगतोयेस.आणखी येवू दे,असलं निर्भेळ कुणी हल्ली लिहित नाही रे कौशल दा
खरच कौशलजी, आपले लिखाण,आपली भाषा यात फारच आपलेपणा आणि अतिशय प्रामाणीकपणा जाणवतो. वाचताना जणू तुम्ही न्हवे तर आम्ही वाचकच आपले अनुभव चक्क अनुभवतो. मलाही आपल्यासारखीच आशादीदी, श्री सुरेश वाडकरजी आणि आत्ता आपण ..यासर्वांची actual रियाझ पहायची फार फार इच्छा आहे. न जाणो असा योग येईल कि नाही, तुम्ही खरोखरच फार भाग्यवान आहात. Touch wood !!! Always be the same. GBU. ) At least through your experinces we can live our dreams. Thanks for sharing.:)
Comments
dasdsa