वेगवेगळ्या शहरांमध्ये होणा-या प्रसिद्ध आणि दर्जेदार सोहळ्यांचा, कार्यक्रमांचा आनंद विविध शहरातील आणि देशाबाहेरील प्रेक्षकांनाही घेता यावा, सोबतच या कार्यक्रमांना प्रसिद्धी मिळावी या दोन्हीही उद्देशाने झगमग डॉट नेट हा मनोरंजनाचा खजाना सतत तुमच्यासाठी घेऊन येतं असतं. यामाध्यमातून भारतातील आणि भारताबाहेरील सर्वच रसिकांना या कार्यक्रमांचा श्राव्य, लेखी आनंद घेता येतो. आत्तापर्यंत झगमगवर प्रेक्षकांसाठी संगीतकार संमेलन, बीएमएम अधिवेशन, मिफ्ता सोहळा, गजल संमेलन अशा अनेक लज्जतदार कार्यक्रमांचा ऑनलाईन आनंद घेतलाय. यापुढेही अशी मनोरंजनाची दारे आम्ही प्रेक्षकांसाठी उघडी करून देणार आहोत.