  होळी एक लोकोत्सव . याला उत्तरेत होरी , महाराष्ट्रात होळी किंवा शिमगा आणि कोकण - गोमंतकात शिग्मा किंवा शिग्मो अशी संन्या आहे. शिमगा किंवा शिग्मा या शब्दाचा उगम सांगताना श्री. रा. चि. ढेरे लिहितात - देशीनाममालेत हेमचंद्राने या उत्सवाला ’ सुगिम्ह’ म्हणजे ’सुग्रीष्मक ’ असे नाव दिले आहे. या नावापासूनच कोकण गोमंतकातील मराठीत ’शिग्मा’ हा शब्द सिध्द झाला आहे आणि महाराष्टाच्या अन्य भागात वर्नविपत्ययाने शिमगा असे त्याचे रुप रुढ झाले आहे.
देशपरत्वे फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यतच्या ५- ६ दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो.आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास या पुस्तकात श्री. ऋग्वेदी या सणाविषयी थोडी वेगळी माहिती देतात - शालिवाहन शकाच्या मासगणनेप्रमाणे शेवटचा जो फाल्गुन महिना त्यात फाल्गनोत्सव करावा , असे भविष्यादी पुराणांत कथन केले आहे. सामान्यत; शुक्ल नवमीपासून पौर्णिमेपर्यंत हा उत्सव सर्व लहान- थोरांकडून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. स्थान-परत्वे यास शिमगा , होलिकादहन किंवा होळी , हुताशनीमहोत्सव दोलायात्रा अशी नावे आहेत. उ त्तरेत याला दोलायात्रा , कोकण - महाराष्ट्रात शिमगा व होळी व दक्षिणेत कामदहन अशा संन्या आहेत. हा उत्सव साजरा करण्याची त-हा सर्वत्र बहुतेक सारखीच असली , तरी त्याच्या उत्पत्तीसंबंधी मात्र एकवाक्यता नाही. याला वसंतोत्सव अथवा वसंतागमनोत्सव म्हणजे वसंतॠतूच्या आगमनासाठी साजरा करायचा उत्सव हे नाव देता येइल. या उत्सवात मुख्य विधान असते, ते म्हणजे होलिकादहनाचे किंवा होळी पेटवण्याचे. ही होळी पेटवयाच्या परंपरेचा उगम कोणी होलिका किंवा होलाका, ढूंढा , पूतना यांच्यासारख्या लहान मुलांना पीडा देणा-या राक्षसींच्या दहनाच्या पुराणोक्त कथेत शोधतात; तर कोणी तो मदनदहनाच्या कथेत शोधतात. काही विध्दानांच्या मते हा प्राचीन अग्निपूजकांच्या परंपरेचा विशिष्ट आविष्कार असावा.या उत्सवाचे धार्मिक विधि- विधान असे - भद्राविरहित फाल्गुनी पौर्णिमेच्या सायंकळी व्रतकर्त्याने शास्त्रपूत मार्गाने होळी पेटवावी . मात्र दिवसा होळी पेटवू नये. प्रथम कर्त्याने शुचिर्भूत होऊन व देशकालाचा उच्चार करुन " सकुटुम्बस्य मम ढुण्ढाराक्षसीप्रीत्यर्थ तत्पीडापरिहाराथं होलिका पूजनमहं करिष्ये ! " असा संकल्प करावा. मग लाकडे , ढेपल्या , गव-या यांचा ढीग रचून त्यात एरंड किंवा तत्सदृश झाडाची फांदी उभी करावी . नंतर ’ श्रीहोलिकाय नम: ’ असा प्रणाम - मंत्र उच्चारुन , होळीची षोडशोपचार पूजा करावी. पूजनोत्तर होलिकेची प्रार्थना करावी. वन्दितासि सुरेन्देण ब्रम्हाणा शड. करेण च अतस्त्वं पाहि नो देवि , भुते ! भूतिप्रदा यानंतर होळीला तीन प्रदक्षिणा करुन बोंब ठोकावी , अश्लील शब्द उच्चारावे, नाचावे व गावे भविष्यपुराणात या सणाची कथा दिली आहे, ती अशी - पूर्वी ढुंढा किंवा ढौंढा नामक एक राक्षसी गावात शिरुन लहान मुलांना पीडा देऊ लागली ; तेव्हा लोकांनी तिला बीबत्स शिव्या व शाप देऊन व सर्वत्र अग्नी पेटवून तिला भिवविले आणि पळवून लावले. या उत्सवाचे लौकिक विधि- विधान असे - होळिपौर्णिमेच्या आधी येणा-या पौर्णिमेच्या ( म्हणजे माघी पौर्णिमेच्या) दिवशी गावाच्या मध्यभागी अथवा चव्हाट्यावर एक एरंडाची फांदी पुरुन होळीची मुहर्तमेढ रोवतात. या पौर्णिमेला दांडीपौर्णिमा असे म्हणतात. नंतर फाल्गुन शुध्द पंचमीपासून होळीसाठी लाकडॆ , गव-या जमा करायला आरंभ होतो. लाकडे- गव-या चोरुन आणाव्या असा संकेत आहे. होळी पेटवण्यासाठी लागणारा विस्तव चांदाल न्यातीच्या एखाद्या माणसाकडून लहान मुलांच्या व्दारा आणावा , असे सांगितले आले. होळी पेटवल्यानंतर गावा बाहेर जाऊन अगर गाव मोठा असेल तर त्याच्या मोहल्ल्या - मोहल्ल्यात गटागटाने हिंडून , वाद्ये वाजवीत अश्लील शिवी - गाळी करीत किं वा अश्लील गाणी म्हणत , नाच करीत दिवसाचा सर्व वेळ काढावा . या प्रसंगी कुठे कुठे दाने करण्याचीही प्रथा आहे. होळी पूर्ण जळल्यानंतर ती दूध व तूप शिंपून शांत करावी व मग जमलेल्या लोकांना नारळ , पपनस यासारखी फळे वाटावी . त्या दिवशी सारी रात्र नृत्य - गायनात व्यतीत करावी . दुस-या दिवशी सकाळी खूप अश्लील बोलू होळीची रक्षा विसर्जित करावी . काही ठिकाणी ही रक्षा व शेण , चिखल यांसारखे पदार्थ अंगाला लावण्याची, माखीन नृत्य - गायन करण्याचीही प्रथा हे. या दिवशी चांडालाला स्पर्श करण्याचा प्रमुख विधी शास्त्रात सांगितलेला आहे. |