|
अतुल कुलकर्णी  अतुल कुलकर्णी यांचा जन्म १० सप्टेंबर १९६५ रोजी बेळगाव (कर्नाटक) मध्ये झाला. त्यांचे वडिल व्यावसायिक होते. ते नंतर सोलापुर मध्ये स्थायिक झाले, इथेच त्यांचे बालपण गेले. त्यांचे शिक्षण हरीभाई देवकरण विद्यालय, सोलापुर मध्ये झाले. त्यांचा रंगभूमीवरील प्रवेश हा शाळेत असतानाच झाला.
अतुल यांनी सोलापुर येथे नाट्य आराधना ग्रुप मध्ये प्रवेश केला. त्यांनी २ वर्षे पडद्यामागे कामे केली आणि त्यानंतर प्रत्यक्ष पडद्यावर काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी दिल्लील नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा मध्ये प्रवेश घेतला. १९९५ साली वयाच्या ३० वर्षी त्यांनी NSD पास झाले. ते एक प्रोफेशनल अभिनेता बनले.
हिन्दी मध्ये त्यांनी हे राम, चांदणी बार, दम, सत्ता, ८८ अन्टॉप हिल, खाकी, पेज ३, रंग दे बसंत्ती, दिल्ली ६ या सारख्या चित्रपटांतुन आपल्या कसदार अभिनयाची ओळख रसिकांना करुन दिली. मराठी मध्ये भेट, कैरी, वास्तु पुरुष, १० फ, छावा, देवराई असे चित्रपट केले आहेत. अभिनयाची उत्तम जाण असलेल्या अतुल कुलकर्णींनी काही इंग्रजी आणि कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनय केले आहेत.
१९९५ पासुन त्यांनी २६ चित्रपट ४ भाषांमध्ये केले आहेत. २ नॅशनल अवार्डसह इतर अनेक अवार्डस त्यांच्या खात्यावर जमा आहेत.
|