 भरत जाधव हे मराठी चित्रपट सृष्टीतील एक आघाडीचे विनोदी कलाकार आहेत. भरत जाधव यांनी आपली कारकिर्द १९८५ साली शाहीर साबळेंच्या मार्गदर्शनाखाली ’महाराष्ट्राची लोकधारा’ पासुन सुरु केली.
१९९९ साली ’वास्तव’ या चित्रपटामध्ये भरतने छोटीशी भुमिका करुन हिन्दी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी काही हिन्दी चित्रपटांमध्ये छोट्या भुमिका केल्या.
मराठी मध्ये भरत यांनी अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत जसे खतरनाक, बाप रे बाप, नव-याची कमाल बायकोची धमाल, सरीवर सर, पछाडलेला, खबरदार, नाना मामा, चालू नवरा भोळी बायको, जत्रा, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, भरत आला परत, माझा नवरा तुझी बायको, बकुळा नामदेव घोटाळे, मुक्काम पोस्ट लंडन, मुंबईचा डबेवाला, गोंद्या मारतयं तंगड, साडे माडे तीन, गलगले निघाले हे काही भरतचे चित्रपट आहेत.
भरतची खरी ओळख ही नाटकांपासुन झाली. ऑल द बेस्ट, श्रीमंत दामोदर पंत, आमच्या सारखे आम्हीच यांसारखी सुपरहिट नाटके भरतने केली आहेत. भरत जाधवचे ’सही रे सही’ हे नाटक आजवरच्या मराठी नाटकांमधील सर्वात यशस्वी नाटक म्हणता येईल. केदार शिंदे दिग्दर्शित सही रे सहीचे सर्व शो तिकीट खिडकी उघडल्यावर फक्त १५ मिनिटांमध्ये हाऊस फुल होतात. कदाचित मराठी नाटकांच्या इतिहासात पहिल्यांदा असे घडले की, सही रे सहीची तिकीटे ब्लॅकने विकली जात होती. मध्यमवर्गीय मराठी माणसाला मराठी चित्रपट व नाटकांकडे परत खेचुन आणण्याची अभिनयातली जी ताकद कै. शाहीर दादा कोंडके यांच्याकडे होती तीच ताकद भरत जाधवयांच्या ही अभिनयात दिसून येते.
|