|
माधुरी दीक्षित  माधुरी दीक्षित ह्या हिन्दी चित्रपट सुष्टीतल्या एक आघाडीच्या अभिनेत्री आहेत. माधुरीचा जन्म १५ मे १९६७ रोजी मुंबई मध्ये झाला. माधुरी एक प्रशिक्षित कत्थक नृत्यागंना आहे. माधुरी दीक्षितने १९८६ साली ’अबोध’ या चित्रपटापासुन आपल्या करियला सुरुवात केली. तेव्हा ती १९ वर्षाची होती. १९८८ साली न. चंद्रा यांचा ’तेजाब’ हा माधुरीचा पहिला सुपरहिट चित्रपट. ह्या चित्रपटातील तिच्या मादक अदाकारीसाठी तिला पहिले फिल्म फेअर नामांकन मिळाले. त्यानंतर तिने एका पेक्षा एक असे अनेक हिट-सुपरहिट चित्रपट दिले, जसे राम लखन (१९८९), परिंदा (१९८९), त्रिदेव (१९८९) आणि किशन कन्हैया(१९९०) हे त्याच वेळेचे तिचे हिट चित्रपट.
१९९० साली तिने अभिनय केलेला इंद्र कुमार यांचा ’दिल’ हा त्यावर्षीचा सर्वात हिट चित्रपट होता. त्यामध्ये तिने अमीर खान बरोबर काम केले होते. ह्या चित्रपटासाठी तिला तिचे पहिले सर्वत्कृष्ट अभिनेत्री म्हणुन फिल्म फेअर अवार्ड मिळाले. पुढे तिने साजन (१९९१), बेटा (१९९२), खलनायक (१९९३), हम आपके है कौन (१९९४), राजा (१९९५) या सारखे सुपरहिट चित्रपट केले. ह्यामध्ये ’बेटा’ मधील अभिनयाला तिला आपले दुसरे सर्वत्कृष्ट अभिनेत्रीचे फिल्म फेअर अवार्ड मिळाले. तर ’हम आपके है कौन’ साठी तिला तिसरे फिल्म फेअर अवार्ड मिळाले. हा चित्रपट हिन्दी चित्रपट सुष्ट्रीच्या इतिहासातील सर्वात सुपर हिट चित्रपट होता. ह्या चित्रपटाने भारतामध्ये ६५० करोडच्यावरती व्यवसाय केला तर भारताबाहेर १५० कोटीच्यावरती व्यवसाय केला. १९९७ साली तिला यश चोपराच्या ’दिल तो पागल है’ चित्रपटासाठी चौथे फिल्म फेअर अवार्ड मिळाले.
माधुरी फक्त एक अभिनेत्रीच नव्हे तर त्याबरोबर एक उत्कृष्ट डान्सर सुद्धा आहे. तिने एक दो तीन (तेजाब), बडा दुख दिना (राम लखन), धक धक (बेटा), चने के खेत मे (अनजाम), चोली के पिछे (खलनायक), अंखिया मिलाऊ (राजा), मेरा पिया घर आया (याराना), के सरा सरा (पुकार), मार डाला (देवदास) ह्या गाण्यामधुन आपला डान्सची किमया लोकांना दाखविली आहे.
२००२ साली तिने संजयलीला भन्साली यांच्या ’देवदास’ मध्ये शाहरुख खान आणि एश्वर्या राय यांच्याबरोबर केलेल्या अभिनयासाठी तिला सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला.
माधुरी दीक्षितचे लग्न १९९९ साली डॉ श्रीराम माधव नेने या अमेरिका स्थित डॉक्टरांशी झाले. त्यांना दोन मुल आहेत.
फ़िल्मफ़ेयर पुरस्कार * २००३ - फिल्मफेयर सर्वश्रेष्ठ सहय्यक अभिनेत्री पुरस्कार - देवदास * १९९८ - फिल्मफेयर सर्वश्रेष्ठ अभिनेत्री पुरस्कार - दिल तो पागल है * १९९५ - फिल्मफेयर सर्वश्रेष्ठ अभिनेत्री पुरस्कार - हम आपके हैं कौन * १९९३ - फिल्मफेयर सर्वश्रेष्ठ अभिनेत्री पुरस्कार - बेटा * १९९१ - फिल्मफेयर सर्वश्रेष्ठ अभिनेत्री पुरस्कार - दिल
|