zagmag.net - Entertainment Portal for Global Maharashtra नाना पाटेकर
नाना पाटेकर

नाना पाटेकर यांचा जन्म १ जानेवारी १९५१ साली मुरुड-जंजिरा, महाराष्ट्र येथे झाला. नाना पाटेकरांचे मुळ नाव विश्वनाथ पाटेकर. त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांत प्रमुख भूमिका केल्या आहेत.

नाना पाटेकर यांनी अभिनय केलेला माफीचा साक्षीदार हा मराठी चित्रपट त्यांच्या अभिनयामुळे इतका गाजला की या चित्रपटाची हिन्दी आवृत्‍ती ’फांसी का फंदा’ ही सुद्धा खुप गाजली. मोहरे (१९८७) आणि सलाम बॉम्बे (१९८८) या चित्रपटांमध्ये अभिनय केलानंतर त्यांना हिन्दी फिल्म इंडस्ट्रीमध्ये खलनायकाचे काम मिळाले. १९८९ साली ’परिंदा’ मध्ये केलेल्या खलनायकाच्या भुमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्म फेअर पारितोषिक मिळाले. तसेच १९९२ साली ’अंगार’ या चित्रपटातील खलनायकाच्या भुमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायक चा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९९४ साली ’क्रांतिवीर’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

नाना पाटेकर यांनी खलनायकाबरोबर अनेक चित्रपटांमध्ये नायकाची भुमिकासुद्धा केली आहे. क्रांतिवीर (१९९४), अग्नी साक्षी (१९९६), खामोशी (१९९६), वजुद (१९९८) हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. त्यांनी वेलकम (२००७) या चित्रपटामध्ये विनोदी भुमिका केली आहे. अपहरण (२००५) या चित्रपटातील त्यांच्या खलनायकाच्या भुमिकेला सर्वोत्कृष्ट खलनायक फिल्मफेअर पुरस्कार आणि स्टार स्क्रीन पुरस्कार मिळाले.

मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकाराने स्वता:च्या अभिनयाच्या जोरावर हिन्दी चित्रपट सृष्टीत स्वता:चे पक्के स्थान निर्माण केले. याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे आपले ’नाना पाटेकर’ होय.

पुरस्कार
वर्षपुरस्कारभूमिकाचित्रपट
१९९०फिल्मफेअर पुरस्कारसर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेतापरिंदा
१९९२फिल्मफेअर पुरस्कारसर्वोत्कृष्ट खलनायकअंगार
१९९५फिल्मफेअर पुरस्कारसर्वोत्कृष्ट अभिनेताक्रांतिवीर
१९९५राष्ट्रीय पुरस्कारसर्वोत्कृष्ट अभिनेताक्रांतिवीर
१९९५स्टार स्क्रीन पुरस्कारसर्वोत्कृष्ट अभिनेताक्रांतिवीर
२००५फिल्मफेअर पुरस्कारसर्वोत्कृष्ट खलनायकअपहरण
२००५स्टार स्क्रीन पुरस्कारसर्वोत्कृष्ट खलनायकअपहरण

 
Zagmag Bazzar
Your Cart is currently empty.

Our partners






Transaction Processing
Terms and Conditions