zagmag.net - Entertainment Portal for Global Maharashtra ’बे दुणे साडे चार’ चे चित्रीकरण अंतिम टप्प्यात
E-mail

’व्हिडीओ पॅलेस’ चे नानूभाई जयसिंघानीया आता मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरले आहेत. मनोरंजन चिश्वात गेली अनेक वर्ष नानूभाई जयसिंघानी यांनी उल्लेखनीय कामाने स्वता:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजवर त्यांनी मराठीतील अनेक सुपरहिट चित्रपटांचे डिव्हीडी, व्हिसीडी प्रेक्षपणाचे हक्क मिळविले असून ते चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहचविले आहेत. ’व्हिडीओ पॅलेस’ बॅनरखाली आकारास येत असलेल्या त्यांच्या पहिल्या मराठी चित्रपटाचे नाव आहे... ’बे दुणे साडे चार’. या धमाल मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मोहिते करीत आहेत. मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरीत या चित्रपटाचे चित्रीकरण वेगात सुरु झाले आहे.
’बे दुणे साडे चार’ चित्रपटाची कथा अनंत कित्‍तूरकरच्या आयुष्यात घडते. अनंत तसा सर्वसामान्य, पण त्याने असं एक असामान्य काम केलं आहे. तो एकाच शहरात दोन संसार चालवतो आहे... तेही कुणाच्या नकळत... तेही गेली अनेक वर्ष. एका घरात मनोरमा आणि मुलगी रश्मी तर दुस-या घरात अंजली आणि मुलगा राहुल. या दोन संसारात नियतीने एक मोठा योगायोग निर्माण केला आहे. राहुल आणि रश्मीत एका वर्षाचं अंतर असलं तरी दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. गेली अनेक वर्ष अनंतने ही गोष्ट फार हुशारीने सांभाळली आहे, पण एक दिवशी धोडपकरमुळे अनंतची लपवाछपवी उघड होण्याची वेळ येते. अनेक मजेशीर प्रसंगांनी खुलत जाणारी ’बे दुणे साडे चार’ या धमाल चित्रपटाची कथा-पटकथा अनिरुद्ध पोतदार व अभय दरवणे यांनी लिहिली आहे.
गिरीश मोहिते दिग्दर्शित ’बे दुणे साडे चार’ चित्रपटात संजय नार्वेकर, मोहन जोशी, सतीश पुळेकर, वंदना गुप्‍ते, अतुल परचुरे, सुशांत शेलार, सई ताम्हणकर, रेशम टिपणीस, मुग्धा शहा, उदय सबनीस, स्नेहा वाघ, अनंत जोग, मृणाली मयुरेश, संजीवनी जाधव या मराठीतील लोकप्रिय कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. यातील ’ये इश्क इश्क....’ हे आयटम सॉंग रेशम टिपणीस, संजय नार्वेकर आणि चार रशियन नृत्यांगनांवर चित्रीत करण्यात आलं आहे. श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेल्या या गीताचा बाज अरेबिक पध्दतीचा आहे. या गाण्याला संगीत देणा-या संगीतकार आनंद मेनन यांनीच हे गाणं निहारिका जोशीसोबत गायलं आहे.
’बे दुणे साडे चार’ चित्रपटाचे चित्रीकरण अंतिम टप्प्यात आले असून लवकरच प्रेक्षकांना निखळ करमणूक करणारा धमाल चित्रपट पाहायला मिळणार आहे.

 
Zagmag Bazzar
Your Cart is currently empty.

Our partners






Transaction Processing
Terms and Conditions