zagmag.net - Entertainment Portal for Global Maharashtra कॉन्स्टेबल कामना कामतेकर
E-mail

कॉन्स्टेबल कामना कामतेकर. वय वर्षे ४०. शिक्षण एस. एस. सी. पास. मुंबई पोलिस दलात दाखल झाली तीच एका ध्यासाने, वेडाने! वडील काशिनाथ कामतेकर हेही पोलिस दलात प्रामाणिक पोलिस म्हणून नाव कमवून होते. पण एका गैरसमजातून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आणि त्यानंतर अत्यंत अपमानित आणि हलाखीत जीवन जगलेल्या कामनाने पोलिस दलात दाखल होऊन वडलांवर झालेल्या अन्यायाची परतफेड अत्यंत प्रामाणिकपणे सेवा देत करण्याचा विडा उचलला. दुष्टांचा सामना करुन समाजातील विघातक वृत्‍तींचा समूळ नायनाट करण्याच्या इराद्याने कॉन्स्टेबल कामना कामतेकर पोलिस दलात दाखल झाली परंतु या वेडाने तिला खूप काही सोसावे लागते. मात्र त्याची तमा न बाळगता कामना कायद्याच्या चौकटीमुळे निकालात न निघणारे प्रश्न आपल्या पध्दतीने सोडवते. अर्थात ड्युटी संपल्यावर... वेषांतर करुन. तिच्या या कामात तिला मदत मिळते ती जूजूची. कॉन्स्टेबल कामना कामतेकरच्या भूमिकेत निर्मिती सावंत यांनी कमाल केलीय तर जूजूच्या भूमिकेत त्यांना साथ केलीय पॅडी अर्थात सर्वांचा लाडका विनोदवीर पंढरीनाथ कांबळे याने! कॉन्स्टेबल कामना कामतेकरचे कारनामे शनिवार ११ जुलै पासून झी मराठीवर दर शनिवारी रात्री साडे नऊ वाजता प्रेक्षकांना बघता येणार आहेत.
कॉन्स्टेबल कामना कामतेकर या मालिकेची निर्मिती अष्टविनायक प्रॉडक्शन्सने केली असून मालिकेचे दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केल आहे..

 
Zagmag Bazzar
Your Cart is currently empty.

Our partners






Transaction Processing
Terms and Conditions