zagmag.net - Entertainment Portal for Global Maharashtra तु माझा जीव नाबाद ५०
E-mail

माणूस जिद्दीने पेटून उठला की तो इच्छीत ध्येय साध्य करतोच, असेच घडले आहे एका साध्या फोटोग्राफरच्या बाबतीत. त्यांचे नाव नेल्सन पटेल. घर चालवण्यासाठी फोटोग्राफिचा व्यवसाय करणारे नेल्सन पटेल, ते स्वता:मुळचे East Indian समाजाचे. म्हणजे पूर्वीपासून मुंबईच्या गावठाण भागात राहणारे लोक. यामध्ये येतात ते भंडारी, कोळी, कुणबी, आगरी लोक. आपल्या समाजासाठी काही तरी करावे जे आपल्याच field शी related असेल अशी जिद्द मनात त्यानी बाळगली. आपल्या समाजासाठी आपल्या भाषेतला म्हणजे East Indian Language मधला चित्रपट काढण्याचे त्यांनी ठरवले. East Indian Language म्हणजे कोकणीचा flavor असलेली कोळी लोकांची भाषा.

चित्रपट बनवण्यासाठी लागणा-या आर्थिक संकटांचा सामना करत त्यांनी ’तु माझा जीव’ हा पहिला East Indian Language मधील चित्रपट बनवला. फिल्म Industry चा थोडा फार अनुभव असल्यामुळे येणा-या संकटांवर मात करत, कधी स्वता:च्या समाजातील लोकांची मदत घेत, तर कधी स्वत:कडचे पैसे उभे करुन त्यांनी चित्रपट प्रदर्शित केला. आता या चित्रपटाला ५० दिवस झाले आहेत. आपण समाजाचे काही देणे लागतो. या गोष्टींचे भान ठेवून जर आपण कोणती गोष्ट केली तर आपला समाज सुद्धा आपल्या पाठीशी उभा राहतो याचा प्रत्यय त्यांना आला व त्यामुळेच ते पुढील चित्रपटाच्या निर्मितीत गुंतले आहेत. नेल्सन पटेल यांच्या या उदाहरणावरून हे स्पष्ट होते की ’इच्छा तेथे मार्ग’ हा आहेच.

 
Zagmag Bazzar
Your Cart is currently empty.

Our partners






Transaction Processing
Terms and Conditions