zagmag.net - Entertainment Portal for Global Maharashtra abhijeetsatam

पावसाळ्यात बॉक्स ऑफिसवर 'हापूस'चा सुगंध...!

Abhijeet Satam   पावसाळा मस्त सुरू झालाय आणि 'हापूस' आलाय...! खरंतर हा काही 'हापूस'चा सिझन आहे का? नाहीच. तरीही 'हापूस' तर आलाय. आता पाहूया या 'हापूस'चा मस्त सुगंध बॉक्स ऑफिसवर कसा दरवळतोय...

हा 'हापूस' अभिजित साटमचा. आणि हो, आपल्या शिवाजी साटम यांचा हा मुलगा. त्यांनी अभियनाने गेली दोन दशके मराठी पडदा गाजवला. आता अभिजित मराठीसाठी एक दणकेबाज चित्रपट घेऊन आलाय. मुंबईत गुरूवारी (24 जून) 'हापूस'चा प्रिमियर झाला आणि त्यानिमित्ताने अभिजितशी 'Zagmag' ने संवाद साधला.

कोकणचा राजा 'हापूस'वर मुव्ही काढायची कल्पना कशी सुचली, हा पहिला आणि स्वाभाविक प्रश्न. अभिजित म्हणतो, 'एखादी गोष्ट बघा आपल्याला येत नाही तर आपण तीच करायचा प्रयत्न करतो ना? तसेच माझेही. मला आंबा अजिबात आवडत नाही. म्हणून हाच विषय घेऊन चित्रपट काढायचे ठरवले...!'

अभिजितला 'हापूस' एेन सिझनमध्ये, म्हणजे मे महिन्यात आणायचा होता. 'खरेतर मे हा पर्फेक्ट सिझन होता 'हापूस'च्या रिलिज् ला. पण, काही तांत्रिक अडचणींमुळं रिलिज् एक महिना पुढं ढकललं...'

अभिजितसाठी हा सिनेमा खूप काही आहे. त्याची बायको, मधुरा वेलणकर-साटम हीचा डबल रोल. बाबा, शिवाजी साटम यांची भन्नाट भूमिका. अभिजित म्हणतो, 'मधुरा जरी माझी बायको असली तरी त्यामुळं काही डबल रोलच्या भूमिकेचं आव्हान कमी होणार नव्हतं. तिनं तिच्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिलाय.'

शिवाजी साटम यांनी साकारलेला 'अण्णा' अफलातून. झुपकेदार मिशांचा अस्सल कोकणी अण्णा शिवाजी साटमांपेक्षा कोणाला शोभलाच नसता. अशा झुपकेदार मिश्यांसाठी त्यांनी आपल्या खऱया मिश्या काढून टाकल्यात. मानलं शिवाजीराव तुम्हाला...! पुत्रप्रेमासाठी मिशांनाही चाट...!!

प्रत्यक्षात सून आणि सासरे असलेले मधुरा आणि शिवाजी साटम आपल्याला 'हापूस'मध्ये मुलगी आणि वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

'हापूस'मध्ये अॅक्शन आहे. ड्रामा आहे. कॉमेडी आहे. इमोशन्स आहेत. थोडक्यात या कथेतला नायक जसा संशोधन करून आणि १२ जातीतल्या आंब्यांचे गुण एकत्र करून कलिंगडासारखा आंबा बनवतो, तसा आपल्याला एका तिकिटावर पुरेपूर धम्माल बघयला मिळणार आहे.

'जाब चाहे पिओ और आम की प्यास बुझाओ' या All Year Round MAAZA सारखा 'हापूस' पण बॉक्स ऑफिसवर टिकावा, अशा आमच्या शुभेच्छा 'हापूस'च्या टीमला.
 



 
Zagmag Bazzar
Your Cart is currently empty.

event ticket

Our partners






Transaction Processing
Terms and Conditions