mpmsynopsis

Mumbai-Pune-Mumbai Overview and synopsis

Movie photos  Cast photos

Starring- swapnil joshi, Mukta Barve

Director- Satish Rajwade

Producer- Mirah Entertainment Private Limited

Complete cast and crew

 

Mumbai Pune Mumbai
Releasing date-11th June.

Runtime: 135 min
U/A Comedy

Every day comes with a new beginning... Every day has a new surprise... Every day has its own new story... The story has its own characters...sometimes these characters are known to each other or at times they are unknown absolute strangers. The story is about them, about what happens to them, with them, and things along with them...they might have a partnership... might have a fight... they might meet for a new beginning... or might meet to end a relationship. Read More

 

Movie Photos

moviephoto

 

moviephoto

moviephoto

 

 

Cast Photos

cast

cast

 

cast

movie details
moviedetails
reviews
cast&crew
प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात घेऊन येतो
कधीतरी एखादा दिवस आश्चर्याचा असतो...
तर कधीतरी...एखाद्या दिवसाची स्वतःची एक गोष्ट असते...
ह्या गोष्टीची स्वतःची...काही पात्र असतात...
जी एकमेकांना ओळखत असतात...किंवा...एकमेकांपासून अनोळखी असतात.
ही गोष्ट अश्याच दोन अनोळखी पात्रांची आहे... काय घडल असेल त्यांच्या सोबत?
त्यांच्यात मैत्री झाली असेल...!किंवा कदाचित...त्याचं एकमेकांशी पटलही नसेल...
एक नवीन सुरुवात करायला ते भेटले असतील...किंवा कदाचित...एक नात संपवायला ते एकत्र येणार असतील.
खरच...येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी काय घेऊन येतो...जाता जाता काय देऊन जातो...आणि येणारा प्रत्येक दिवड त्याच्या बंद मुठीत तुमच्यासाठी काय झाकून आणतो...हे फक्त त्या दिवसालाच माहित असत.
आपल्या चित्रपटाची गोष्ट मुठीत बंद करून ठेवलेल्या अश्याच काही मजेशीर क्षणांची आहे. हे क्षण दोन अनोळखी व्यक्तींच्या आयुष्यातले क्षण आहेत.
एक मुलगा आणि एक मुलगी...एके दिवशी भेटतात...भेटल्यानंतर त्यांच्या सोबत सुरु होतो...मजेशीर क्षणांचा हळुवार प्रवास...!
एकमेकांशी जुळवून घेण्यापर्यंत प्रत्येक क्षण ते दोघे जगतात..
हे सगळ तुम्हाला जेवढ सोप्प वाटतंय...तेवढ ते सोप्प नाहीये...कारण?
कारण...मुलगी मुंबईची असते आणि मुलगा...पुण्याचा...आणि तो तिला भेटतो...पुण्यातच.!
मुंबई-पुण्याच नात तसं जिव्हाळ्याच...तसच द्वेषाच...!
एकमेकांना पाण्यात पाहण्याची आणि आपापल्या शहरांच अस्तित्व सिद्ध करण्याची एकही संधी ते दोघे सोडत नाहीत.
परिस्थिती...त्यांना एकमेकांपासून वेगळ होऊ देत नाही...ते दोघ दिवसभर एकत्र राहण्याचं अजून एक अतिशय महत्वाच कारण असत...ते म्हणजे एकमेकांबद्दल त्यांना वाटणारा पराकोटीचा...अनादर...!
प्रत्येक मराठी मनाला गुदगुल्या करणारा असा हा मराठी चित्रपट आहे. ओठांवरच हास्य थांबत नाही...आठवणी ताज्या होऊ लागतात.
मुंबई-पुण्यातल्या नात्यांचा हा प्रवास...दिवस संपता-संपता एका वेगळ्याच वळणावर येऊन थांबतो...ते मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या प्रेमात पडतात...आणि मग...
प्रेम...! ह्या दिवसाची गोष्ट ही...प्रेमाची गोष्ट आहे...!
गोष्टीतल्या त्या दोघांनाही समजत नाही...ते कसे भेटले? का भेटले?...आणि प्रेम कसं झाल?
एक गोष्ट...एका दिवसाची...एका अश्या प्रवासाची...जो तुम्हाला आणि गोष्टीतल्या "त्या" दोघांना...आपल्या सोबत घेऊन जातो...आणि प्रेमात पडायला भाग पडतो.