zagmag.net - Entertainment Portal for Global Maharashtra आवाजच महत्वाचा

काय आपल्याला माहीत आहे की सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी आपले करिअर एक कलाकार म्हणून नव्हे तर एक वॉईस ओवर आर्टिस्ट म्हणून सुरु केले.
प्रत्येक फिल्म नंतर कलाकार, प्रोड्युसर्स, दिग्दर्शक यांची तर वाह वाह होते. पण तंत्रज्ञांची म्हणावी तशी वाह! वाह॒! होत नाही, खरंतर कोणी त्यांची दखलही घेत नाही. अशीच एक फिल्ड आहे, ’साऊंड रेकॉरडींगची’. रसुल पक्कुट्टीने भारतात ऑस्कर आणल्यापासून या क्षेत्राबद्दल लोकांना बरंच कुतुहल वाटु लागलंय! रसुलमुळे भारताच्या टेक्नीशियन्सचा आवाज अंतराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचलाय.

साऊंड असोसीयेशनने नुकतच रसूल यांचा सत्कार योजला होता. सत्कारमुर्ती रसुल यांचा सत्कार करायला आणि त्यांचं भरभरुन कौतुक करायला अमिताभ बच्चन आपलं शूटिंग अर्धवट टाकून आले होते. त्यांना बघून रसुलच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आलं.
अमितजींनी तोंड भरून रसूलचं कौतुक केलं आणि असंही म्हणाले की लोकांना आता पर्यंत माहीत असेल की, ’सात हिंदुस्तानी’ हाच त्यांचा पहिला चित्रपट आहे, पण तांत्रीक दृष्ट्या ’भुवन शोम’ हा बंगाली चित्रपट त्यांचा पहिला चित्रपट आहे. त्यासाठी त्यांनी आपला आवाज दिला होता. नंतर ते म्हणाले साऊंड डिपार्टमेंटला आधी कोणीही महत्वपूर्ण मानत नसे पण आता त्यांच्या सम्मती शिवाय एकही टेक पुढे जाऊ शकत नाही.
रसूल यांनीही अमितजींचे आभार मानले आणि हेही आवर्जुन सांगितले की, अमितजींनीच रसूल यांना भारतीय साऊंड लायब्ररी स्थापन करण्यास प्रवृत्‍त केले. आणखीही बरीच मंडळी रसूल यांचं अभिनंदन करण्यासाठी आले होते. त्यात गुल पनांग आणि उदीत नारायण यांचा समावेश होता. विशेष ! या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं रझा मुराद यांनी.

 
Zagmag Bazzar
Your Cart is currently empty.

Our partners



Transaction Processing
Terms and Conditions