zagmag.net - Entertainment Portal for Global Maharashtra Recent News
Recent News

पत्रकारदिन पुरस्कार सोहळा !

सर्वोत्कृष्ट चित्रपट

यंदा सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारासाठी कृती फिल्म्सच्या गैर’ या चित्रपटाची निवड महारष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने केली आहे. येत्या ६ जनेवारी २०१० रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी ५ वाजता हा पुरस्कार कृती फिल्म्स्‌, सतिश राजवाडे (दिग्दर्शक) आणि ’गैर’ चित्रपटाची संपूर्ण टीम यांस समारंभपूर्वक देण्याचे योजिले आहे.

उत्कृष्ट अभिनेता

उत्कृष्ट अभिनेता पुरस्कारासाठी मा. संदीप कुलकर्णी यांची निवड महारष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने केली असून येत्या ६ जनेवारी २०१० रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी ५ वाजता हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

 
मोतीलाल नेहरू ते राहुल गांधी : एक दृष्टीक्षेप

मुख्यमंत्र्यांना अभय

गुलाब नबी आझाद हे जम्मू काश्मीरचे काँग्रेसचे प्रमुख नेते होते. त्यांना तिथं अधिक प्रभावी असलेल्या फारूख अब्दुलांच्या नॅशनल कॉन्फरन्सशी सामना होता. राज्य सभेच्या निवडणुकीच्यावेळी (साडेपाच वर्षापूर्वी) फारूख यांनी आझाद यांना निवडून आणलं होतं. तेव्हापासून त्या दोघांचे घनिष्ट मैत्रीचे संबंध होते. आता त्यांच्याशीच टक्कर घ्यायची हा मोठाच प्रश्न आझाद यांच्यापुढं होता. जम्मू-काश्मीर हा प्रश्न राजकीय क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचा होता. म्हणून सोनियाजीना अत्यंत धोरणीपणं पाऊल उचलावं लागलं. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स या पक्षा खालोखाल काँग्रेसला मत मिळाली होती. त्यावेळी काँग्रेसच्या आमदारांचं असं समीकरणे होतं की, आझाद यांच्या नेतृत्वखाली तिथं आघाडीचं सरकार प्रस्थापित करणं शक्य होतं. पण सोनियाजीना आझादांची स्थानिक कुवत ठाऊक होती म्हणून त्यांनी पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते मुफ्ती महम्मद सई यांच्या नेतृत्वाखालील एका काश्मीर खोऱयात बहुत मिळवलेल्या स्थानिक पक्षाला प्राधान्य दिलं. काँग्रेसच्या वीस आमदारांची इच्छा त्यांनी बाजूला सारली. गंमत म्हणजे सोनियाजी पक्ष प्रमुख झाल्या त्यावेळी बंडखोरी करून मुफ्ती महंमद हे काँग्रेस सोडून गेलेले होते.

Read more...
 
टेरर नव्हे वर्ल्ड ट्रेडचा जमाना

टेरर नव्हे; वर्ल्ड ट्रेडचा जमाना!!

सद्यस्थितीत आंतराष्ट्रीय पातळीवर मोठा वाद निर्माण करणारे लोकर्बी बॉम्बहल्ला प्रकरण

कॅन्सरग्रस्त मॅकग्राही तीनच महिने जगणार असल्यामुळे त्याची मुक्‍तता करणे योग्य आहे?

आपल्याकडे भाजप आणि रा. स्व. संघाच्या नेत्यांचा जिनांविषयक निवेदनांनी राजकारण, इतिहास आणि मीडियांच्या रखवालदारांना एक गरमागरम विषय मिळाला आहे. बरोबर याच कालावधीच्या आसपास घडलेल्या एका महत्वाच्या आंतराष्ट्रीय घटनेची आपण विशेष नोंद घेतलेली नाही.

Read more...
 
तनुजा पंचमी यांच्या स्वरांनी सजला ’स्वरपंचमी’चा सोहळा
तनुजा पंचमी यांच्या स्वरांनी सजला ’स्वरपंचमी’चा सोहळा

तनुजा पंचमी यांच्या गीतांचा ’स्वरपंचमी’ या आल्बमचे प्रकाशन नुकतेच यशवंत नाट्यगृहात महाराष्ट्राचे माजी महासंचालक अरविंद इनामदार यांच्या हस्ते संपन्न झाले.

या आल्बममध्ये यशवंत देव यांनी स्वरबध्द केलेली तनुजा पंचमी यांची गाणी आहेत. कविवर्य वि.दा.करंदीकर यांची गझल, वसंत निनावे यांची लावणी, पाडगांकर यांचं भक्तीरसपूर्ण गीत,दिलीप पांढरपट्टे यांचं कोळीगीत,इत्यादी गीते असून त्यांचा आस्वाद श्रोत्यांसह माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार कविवर्य शंकर वैद्य,रामदास कामत,पं.शंकर अभ्यंकर,

Read more...
 
संगीत नाटकांच्या पूर्वस्मृती जागृत करणारा नाट्यमहोत्सव
नेहरू सेंटरने ऑगस्टच्या दुसर्‍या आठवड्यात संगीत नाट्यमहोत्सव साजरा केला.त्यात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बोरीवली शाखा व शुभश्री यांनी श्री. विद्याधर गोखलेलिखित ’सुवर्णतुला’ हे संगीत नाटक साहित्य संघाचे ’गोराकुंभार’ आणि पुण्याचे ’कट्यार काळ्जात घुसली’ ही तीन नाटके सादर करण्यात आली.

तिन्ही नाटकांचे प्रयोग सुविहित झाले; संगीत नाटकप्रेमी श्रोत्यांना बर्‍याच दिवसांनी संगीत नाटकांची मेजवाणी मिळाली. पुण्याच्या ’कट्यार काळजात घुसली’ या नाटकाचा ९९ वा प्रयोग संगीत नाट्य महोत्सवात झाला. या

Read more...
 
’रेडिमेड पंडित’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

द ग्रेड बंजारा या बॅनरखाली रेडिमेड पंडित या मराठी चित्रपटाची निर्मिती होत असून याचा शुभारंभ लावणी नृत्याने भाईंदर येथे नुकताच मा.रूटीव्हवन मेंडोसा, उपमहापौर मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी ओमप्रकाश खरात, कस्टम डिपार्टमेंट सुप्रिटेंडंट, भगवती शर्मा-नगरसेवक मीरा भाईंदर मनपा, रविंद्र बेर्डे, किशोर पवार, दिग्दर्शक प्रभाकर केदार व चित्रपटातील अन्य कलाकार हजर होते.

कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करतात. अशा एका विदर्भातील गरीब शेतकरी कुटुंबातील सत्यकथेवर आधारित या चित्रपटाची निर्मिती किशोर पवार यांनी केली आहे. गरीब शेतकर्‍याला तीन मुलगे असतात. मुलांच्या शिक्षणासाठी त्या शेतकर्‍याकडे पैसे

Read more...
 
C I D Gallantry Awards
शिवाजी साटम यांनी भूमिका केलेला ’सीआयडी’ हा गुन्हा शोधक कार्यक्रम गेली अनेक वर्षे चालू आहे. त्याच धर्तीचा कार्यक्रम सादर करणार्‍या चमूला सोनी टीव्हीतर्फे पारितोषिके देण्यात येणार असल्याची घोषणा सोनी टीव्हीचे सी.ओ.ओ.ए.नी.सिंग यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत केली.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून नुकतेच २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे यांच्या पत्‍नी कविता करकरे, ख्यातनाम साहित्यक गोखले, आयबीएनचे संचालक आशुतोश आणि लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि कलाकार गरसन डी कुन्हा हे परीक्षक म्हणून काम करणार आहेत.

Read more...
 
Zagmag Bazzar
Your Cart is currently empty.

Our partners



Transaction Processing
Terms and Conditions