| संगीत नाटकांच्या पूर्वस्मृती जागृत करणारा नाट्यमहोत्सव |
नेहरू सेंटरने ऑगस्टच्या दुसर्या आठवड्यात संगीत नाट्यमहोत्सव साजरा केला.त्यात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बोरीवली शाखा व शुभश्री यांनी श्री. विद्याधर गोखलेलिखित ’सुवर्णतुला’ हे संगीत नाटक साहित्य संघाचे ’गोराकुंभार’ आणि पुण्याचे ’कट्यार काळ्जात घुसली’ ही तीन नाटके सादर करण्यात आली.तिन्ही नाटकांचे प्रयोग सुविहित झाले; संगीत नाटकप्रेमी श्रोत्यांना बर्याच दिवसांनी संगीत नाटकांची मेजवाणी मिळाली. पुण्याच्या ’कट्यार काळजात घुसली’ या नाटकाचा ९९ वा प्रयोग संगीत नाट्य महोत्सवात झाला. या नाटकाने आपला शतक महोत्सवी प्रयोग नाटकाच्या सुवर्ण महोत्सवीवर्षानिमित्त पुण्यात केला. सर्व कलाकारांनी आपल्या भूमिका चोख केल्या गाणीही तयारीने म्हटली, श्री. आफळे यांनी गाणीही दमदारपणे चोख म्हटली. तरीदेखील पं. वसंतराव देशपांडे यांच्या गाण्याची सर येणे शक्य नसले तरी या नाटकाने ’कट्यार’च्या गाण्याची स्मृती जागृत केली आणि रसिकांना समाधान दिले.
मराठी रंगभूमीवर संगीत नाटकाची दुसरी इनिंग सुरू केली. श्री.विद्याधर गोखले यांनी १९६०च्या सुमारास भालचंद्र पेंढारकर यांनी गोखल्यांचे ’पंडितराज जगन्नाथ’हे नाटक सादर करून पडद्याला टाळी घेतली. त्याच्या दुसर्याच दिवशी गोपीनाथ सावरकर यांनी ’सुवर्णतुला’हे गोखल्यांचे नाटक सादर केले.त्यांच्याच मुलीने शुभदा दादरकर यांनी नेहरू सेंटरच्या संगीत नाट्यमहोत्सवाचा प्रारंभ ’सुवर्णतुला’या नाटकानेच केला. संगीत नाटकाची परंपरा सुरू रहावी,तिला खंड पडू नये म्हणून शुभदा दादरकर यांनी नाट्य संगीताचे शिक्षण देऊन संगीताची गोडी नवीन पिढीला लावण्याचे महत्त्वाचे कार्य आपल्या ’शुभश्री’ संस्थेतर्फे सुरू केले आहे. नवीन पिढीने नुसते नाट्यसंगीतचेच कार्यक्रम न करता संगीत नाटकेच सादर करावीत असा त्यांचा हेतू आहे. बोरीवली नाट्यपरिषदेच्या शाखेच्या सहकार्याने त्यांनी नाट्यसंगीताचे पदविका अभ्यास वर्ग त्यासाठी सुरू केले असून प्रस्तुतच ’सुवर्णतुला’महोत्सवी वर्षानिमित्त केले आहे. नाटकाचे दिग्दर्शन शुभदा दादरकर यांनीच केले असून त्यात सचिन पाळेकर, ओंकार पाटील, हेमांगी पाखणीकर,प्राजक्ता जोशी,अंजली मायदेव,सतीश बोडस,संतोष सावंत,मयुर सुकाळे आणि सायली सोमण य्यंनी भूमिका केल्या होत्या.छोटा गंधर्व आणि पं.राम मराठे यांचं संगीत नाटकाला लाभले असून नेपथ्य प्रदिप पाटील यांचे होते.प्रकाश योजना हृषिकेश आमरे व संगीत साथ केदार भागवत (ऑर्गवा)हेमंत किरकिरे (तबला), श्रुती भावे (व्हायोलिन)यांनी केले. या महोत्सवात साहित्य संघाने यंदा व्यावसायिक रंगभूमीवर आणले. ’संगीत गोरा कुंभार’हे नाटकही सादर झाले. नेहरू सेंटरने सादर केलेल्या या तीन संगीत नाटकांनी नाट्यरसिकांच्या संगीत नाटकांच्या पूर्वस्मृती जागृत केल्या. चित्र-रंग - राजा कारळे |