zagmag.net - Entertainment Portal for Global Maharashtra ’रेडिमेड पंडित’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न
’रेडिमेड पंडित’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

द ग्रेड बंजारा या बॅनरखाली रेडिमेड पंडित या मराठी चित्रपटाची निर्मिती होत असून याचा शुभारंभ लावणी नृत्याने भाईंदर येथे नुकताच मा.रूटीव्हवन मेंडोसा, उपमहापौर मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी ओमप्रकाश खरात, कस्टम डिपार्टमेंट सुप्रिटेंडंट, भगवती शर्मा-नगरसेवक मीरा भाईंदर मनपा, रविंद्र बेर्डे, किशोर पवार, दिग्दर्शक प्रभाकर केदार व चित्रपटातील अन्य कलाकार हजर होते.

कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करतात. अशा एका विदर्भातील गरीब शेतकरी कुटुंबातील सत्यकथेवर आधारित या चित्रपटाची निर्मिती किशोर पवार यांनी केली आहे. गरीब शेतकर्‍याला तीन मुलगे असतात. मुलांच्या शिक्षणासाठी त्या शेतकर्‍याकडे पैसे

नसतात, त्यात तो आणखी शेतीच्या कर्जापायी संकटात येऊन आत्महत्या करतो. त्यानंतर मोठा मुलगा विचार करतो की या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपण खुप शिकून मोठे झाले पाहिजे. पुढे तो शिकून मोठा प्रसिध्द वकील होतो व आपल्या मागच्या दोन लहान भावांना सांभाळून आपले कुटुंब सुखी करतो.या चित्रपटाद्वारे निर्माता दिग्दर्शक यांना आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांना सांगायचे आहे की, आत्महत्या करून तसेच बुवाबाजी म्हणजे रेडिमेड पंडित लाला करून प्रश्न सुटणार नाही; गांभीर्याने विचार करून त्यावर तोडगा काढला पाहिजे . समाजात एकप्रकारे जनजागृती करण्याचे कार्य या चित्रपटाद्वारे होईल अशी अपेक्षा निर्माता किशोर पवार बाळगून आहे.

चित्रपटात सहा गाणी असून ती गीते किशोर पवार यांनी रचली आहे. गाण्यात नवीन कलाकार कु. प्रतिक्षा कापडनीस हिने नृत्याचे अप्रतिम काम केले आहे. चित्रपट सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होऊन ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होईल असे निर्मात्यांनी सांगितले.

या चित्रपटात सयाजी शिंदे, मोहन जोशी, रविंद्र बेर्डे, किशोर पवार यांच्यासोबत नवीन कलाकार प्रविण पाटील, नम्रता मिसाळ, प्रतिक्षा कापडनीस व मोहिनी यांनी काम केले आहे. चित्रपट प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल याची खात्री निर्माते/दिग्दर्शक यांना वाटते.

 
Zagmag Bazzar
Your Cart is currently empty.

Our partners




Transaction Processing
Terms and Conditions